आमची महानगरपालिका खूप भेदभाव करते,आम्हाला खड्डेमय रस्ते ठेवते, मात्र कुणी मंत्री येणार असेल तर लगेच डांबरीकरण करते. सरकारी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल्स मध्ये घाणीचे साम्राज्य ठेवते, मंत्री येण्याच्या वेळेस मात्र स्वच्छ साफसफाई करते. आमची महानगरपालिका खूप गडबड करते, कुठल्याही कामास हजार चकरा मारायला लावते, वशिला असल्यास मात्र एका दिवसात काम करते. पावसाळी स्वच्छता तर खूपच सुंदर करते, नाल्यातील कचरा बाहेर काढून पुन्हा नाल्याजवळच ठेवते, येता पाऊस गाळ पुन्हा नाल्यात जातो, आवाज उठवता कुणी राहिलेला गाळ उचलला जातो. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तर पार तीन तेरा वाजलेले असतात, नियम मोडून सर्रास वाहने चालविली जातात. जाग येते जेव्हा RTO ला तेव्हा मात्र रस्त्यावर कर्फ्यु लागल्या सारखे दृश्य असते, कुठे गायब होतात वाहने काही समजत नसते. आमच्या नशिबी नेहमीच वाहतूक कोंडी असते, मंत्र्यांचे येणे होत असताना मात्र शहरातील रस्ते ओस पडले असते. आमची महानगरपालिका #collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #महानगर #municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर आमची महानगरपालिका खूप भेदभाव करते, आम्हाला खड्डेमय रस्ते ठेवते,मात्र कुणी मंत्री येणार असेल तर लगेच डांबरीकरण करते. सरकारी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल्स मध्ये घाणीचे साम्राज्य ठेवते, मंत्री येण्याच्या वेळेस मात्र स्वच्छ साफसफाई करते. आमची महानगरपालिका खूप गडबड करते,