Nojoto: Largest Storytelling Platform

#माझा सखा श्रीकृष्ण @शब्दवेडा किशोर पाहीले नाही रा

#माझा सखा श्रीकृष्ण
@शब्दवेडा किशोर
पाहीले नाही राधेनं कधीच श्रीकृष्णाचं विराट रूप
नाही बघितला तिने विश्वंभर द्वारकाधीश
अन् नाही बघितले द्वारकेतले सुख
नाही अनुभवलं तिने राजवैभव अन् क्वचितच होते
तिच्या नजरेत हे वैभवरूपी श्रीकृष्णाचं मुख
तिने फक्त आपल्या सख्यावर निरपेक्ष प्रेम केले
तिने फक्त आपल्या मनमोहनासोबतचे सौख्य अनुभवले
राधेच्या मनीचे निर्मळ प्रेम श्रीकृष्णानं हेरले होते
म्हणून स्वतःच्या नावाआधी तिचे नाव जोडून
"राधा-कृष्ण" म्हटले जाईल असे अमरत्वाचे वरदान तिजला दिले होते
श्रीकृष्णाची रूक्मिणी व राधेच्या आयुष्यातील
ही दोन्ही रूपं परस्पराविरोधाभासी आगळीवेगळी अशी भासे
एका बाजूला राधेच्या आयुष्यातला शांत सुकुमार श्रीकृष्ण तर
दुसऱ्या बाजूला रूक्मिणीसोबत कणखरतेनं राज्य चालवतानाही
हाच श्रीकृष्ण आपणास दिसे
हीच दोन रूप राधारूक्मिणीच्या नशिबी आली अन्
दोघींनीही ही रूपं वेगवेगळ्या रीतीनं अनुभवली
एकदा अनाहुतपणे या राधा रूक्मिणीची भेट श्रीकृष्ण
आपल्या लीलेनं घडवी तेव्हा एकमेकींना बघुन
त्यांच्या मनीची अवस्था काय वर्णावी
राधेच्या सुंदर नयनातुनच रूक्मिणी साऱ्या
गोकुळभर नांदलेला श्रीकृष्ण अनुभवत होती
अन् तिने लावलेल्या अत्तरातुनही दही - लोण्याचा सुगंध घेत होती
रूक्मिणीलाही बघण्यात राधा पुरती गुंगली
रूक्मिणीच्या रूपतेजातुन झळकणारे द्वारकेच्या वैभवाचे सुख
बघत जणु ती श्रीकृष्णाच्या तिने न पाहिलेल्या रूपात दंगली
दोघींच्याही कणाकणात लपलेला साठलेला नंदकुमार
श्रीकृष्ण हे बघत होता अन् दोघींचीही एकमेकींशी भेट होऊन
स्वतः न अनुभवलेला श्रीकृष्ण तोच श्रीपती जगाला दाखवत होता
हेच अभिनव श्रीकृष्णाचे मनोहरी ते रूपलावण्य
जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा माझा आत्मा
लीन होऊनी श्रीकृष्णातंच होई धन्य 
देई मज सदा आत्मबल तो सखा श्रीकृष्ण
राही हृदयी सदा माझा प्राण बनुनी तो माझा सखा श्रीकृष्ण 
सौख्याचे स्वरूप मज हरवेळी दावतो तो माझा सखा श्रीकृष्ण 
हरूनी माझे दुःख दैन्य देई मज सौख्यता समृद्धता तो माझा सखा श्रीकृष्ण 
राही सदा माझी सावली बनुनी तो माझा सखा श्रीकृष्ण
असे सदा मजसोबत माझे अस्तित्व बनुनी तो माझा सखा श्रीकृष्ण

©शब्दवेडा किशोर #माझा_सखा_श्रीकृष्ण