Nojoto: Largest Storytelling Platform

एकदा गेलो असाच आरशाच्या बाजारात, वेग वेगळा दिसत हो

एकदा गेलो असाच आरशाच्या बाजारात,
वेग वेगळा दिसत होतो प्रत्येक आरशात,
होतो जरी एक मी जसाच्या तसा स्तब्ध,
प्रत्येक आरसा 'तू वेगळा' म्हणत करे द्वंद्व,
दोष त्याचा त्यास, काही केल्या कळेना,
सांगणे सांगून त्याचे, त्यास तरी ही पटेना,
कळले मग मज एक त्रिवार सत्य...
आपण आपल्या मार्गी चालावे,
फुका जगाचे ओझे न वहावे...
गुणदोष असे जसे ज्याचे त्याचे अंगी,
त्याच नजरेने पाही तसे जग वरपांगी.. #mirror #image #najar #Yq_gns