#चित्रकविता... डोईवर संसाराचा सुर्य घेतला निखारा, तरी गालात रे हसु त्यास तुझाच सहारा. दिस येतील जातील खेळ उन्ह-सावलीचा, बाळा नको तु भिऊस तु बी लखलखत्या तेजाचा. आज घेतलं मी उन्हं उद्या छत्रछाया तुझी, बाळा शिकुन मोठा व्हयं पाटी अडाणी रे माझी. माय तुझी मी दयाळु तुला लावते रे जीव, बाप तुझा रे कष्टाळु जरा उपकार ठेव. आम्हा दोघांसाठी बाळा तुच आहे तेज-तारा, तुझ्या तेजाच्याही पुढे सुर्य वाटतो अधुरा. डोईवर संसाराचा सुर्य घेतला निखारा, तरी गालात रे हसु त्यास तुझाच सहारा. ©Dinesh Chaudhari