Nojoto: Largest Storytelling Platform

नभ भरुन आले,उरी दाटले काहूर रिमझिम डोळ्यातून, बरसत

नभ भरुन आले,उरी दाटले काहूर
रिमझिम डोळ्यातून, बरसतो अश्रूपूर
सरसर बरसते,अशी आभाळाची माया
प्रेमजल धारेने ह्या,बहरली धरणी माया
अंकुर हे उगवले,लवलवते तृण पाती
जन्मदात्री वसुंधरेची, कशी उजळली कांती
हिरवा शालू ल्याली धरती,अंगी दागिने घातले
नटली ही नवरीपरी,अंगी रोमांच दाटले
कोमेजल्या फुलाचेही,ताटवे हे बहरले
मिटलेल्या कळीच्याही,ओठी बघ गीत आले #कविता मराठी
नभ भरुन आले,उरी दाटले काहूर
रिमझिम डोळ्यातून, बरसतो अश्रूपूर
सरसर बरसते,अशी आभाळाची माया
प्रेमजल धारेने ह्या,बहरली धरणी माया
अंकुर हे उगवले,लवलवते तृण पाती
जन्मदात्री वसुंधरेची, कशी उजळली कांती
हिरवा शालू ल्याली धरती,अंगी दागिने घातले
नटली ही नवरीपरी,अंगी रोमांच दाटले
कोमेजल्या फुलाचेही,ताटवे हे बहरले
मिटलेल्या कळीच्याही,ओठी बघ गीत आले #कविता मराठी