आजकालच राजकारण आपल्याला काही कळना राव कुणाचा कमी तर कुणाचा रोजच वाढतोय भाव ।। कुणी म्हणत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तर कुणी म्हणत, मी 200 कोटींची वसुली घेईन ।। रोजच कुणाचे न कुणाचे लफडे बाहेर निघताय सर्व घाबरलेत, माझा राठोड किंवा मुंडे होतो की काय ।। तिकडे एकाचा होतो खून नि एकाच राजीनामा परमबीर नि वाझे चा नवीनच हा कारनामा ।। बाजूला राहिलेत सर्व जनतेचे मुद्दे एकमेकांच्या पोटात घालताय हे गुद्दे ।। ठेवावा कुणावर विश्वास सारा गोंधळ उडाला राव आता वाटायला लागलं, बर आपलं काम नि आपला गाव ।। -....©✍️ पूजा डोमाळे (राणू) #राजकारण #politics #मराठीकविता