Nojoto: Largest Storytelling Platform

°अश्रू° कितीही जरी विसरलेस तू मला पण मी कशी विस

°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...
°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...