Nojoto: Largest Storytelling Platform

आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महि

आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज थोडी तशी चिडलेलीच होती मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते.
येताच पाऊस वाटतं
सोबत त्याच्या तूही यावस
चिंब भिजलेली तू
अलगद माझ्या मिठीत शिरावस
_अक्षय #ती #प्रेम #पहिलापाऊस

ashu2154012350090

Ashu

New Creator