गाव ते गाव असतं, आयुष्याचे ते एक पान असतं, गावाने दिलेले ते एक नाव असतं, हक्काचे ते एक मानाचे स्थान असतं गाव ते गाव असतं, शेती मातीत रमण्यासाठी तिथे एक मळं असतं, वाडिवस्तीचं ते एक रमणीय स्थळ असतं, सवंगडी भेटण्याचं ते एक ठिकाण असतं गाव ते गाव असतं, राजकारण, समाजकारणाचं ते एक मूळ असतं, जन्मस्थळाचं ते एक कूळ असतं, वाडवडिलांचे चिरंतन स्मृतीस्थळ असतं गाव ते गाव असतं, अनेक बाबीचं ते साग्रसंगीत असतं, आपल्या माणसाचं ते वस्तीस्थान असतं, आेळख देणारे ते प्राप्तिस्थान असतं...... गाव ते गाव असतं..... ©Dr. Mangesh Kankonkar गाव ते गाव असत...