समजून घे दोस्ता तूच स्वतःला सावरायला हवं अस्तित्व नव्याने उभारायलं हवं विचार कर समजून घे दोस्ता तुझं जग तूच उभार आता नवं ||१|| निसर्ग दोस्त तुझा दुश्मन कधी झाला महापूर होऊन मग तो गावात विसावला हद्द त्याची गिळंकृत तूच तर केली ना! तुझ्या सारखा मोकळा श्वास घेऊ दे त्याला ||२|| महामारी आली सांग तरी कशाने किती पशू संपवले अन्न म्हणून माणसाने तरीही मार्ग तुला थोडा काही ठेवला अस काय बिघडणार त्यांच्या जगण्याने ||३|| डोंगर जरा सैल झाले नेहमी प्रमाणे छोट्या टेकड्या सांभाळत होत्या पुर्वी त्यांचे अस्तित्व सांग कुठे गडप झाले जंगल झाडी त्यांची दाटी दाखव हिर्वी ||४|| तुझा विकास हवा तेवढा कर पण आमच्या जगण्याचं भान थोडं ठेव आरसा घेऊन आता तरी बघ स्वतःला तुझ्यातला जागा कर माणुसकीचा देव ||५|| विचार कर समजून घे दोस्ता विचार कर समजून घे दोस्ता कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #समजून_घे_दोस्ता, #पंडित_निंबाळकर #कविता