हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची, 25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा. दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची. दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची. हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा. कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती. मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली, जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले. काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,