रिमझिम पाऊस थारा गगनी आनंद दरवळला सारा येता सर पावसाची मातीचा कस्तुरी सुगंध वारा ओलीचिंब झाली धरती बळीराजा तिफन पकडती हास्य लहरी उमटत साऱ्या पक्षी ही पावसाचे गीत गाती सुसाट वारा पाऊस थारा कधी आकाशी वीज पसारा धरती वनराई हिरवी झाली जणू निसर्गाचा तो हिरवा सोहळा आनंदाचे गीत घेऊन आला पाऊसाचा रिमझिम वारा हलक्या हलक्या सरीमध्ये हिरवळ शोधून दिसे नजारा #विशाखा समाधान बोरकर