भांडणे होऊ देत नाही कधी कुणात, इतके छान ती सारी नाती सावरते. संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते. नाराजी नसते कधी,चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते, कितीही कठीण प्रसंग येऊ,बिनदिक्कत सामोरे जात असते. उसंत अशी कधीच तिला मिळत नाही, जरी मिळाली,हातात कुठलं काम घेतल्याशिवाय बसवत नाही. अशी ही अर्धांगिनी माझी,छान घर सांभाळते, अति ताण झाला की अधून मधून माझ्यावर चिडते. मी ही घेतो सांभाळून,जाणतो ही किती राबते आई,मुलांसोबत घर सांभाळताना तिची ही दमछाक होते. काल थोडी चिडली होती.. म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे.. #अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी #बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण .भांडणे होऊ देत नाही कधी कुणात, इतके छान ती सारी नाती सावरते. संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.