गेले ते दिवस गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी… पण का जाणे आज त्या दिवसांची आठवण का आली. केली होती खूप मजा ,केली होती मस्ती आठवतेय मला अभ्यास करताना आलेली सुस्ती . गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी... बारावीच्या अभ्यास करून आला होता खूप कंटाळा, स्वप्न पाहिली होती त्या सुट्टीची, पण कोण जाणे आज त्या अभ्यासाची आठवण का आली. गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी... शाळा संपली, कॉलेज संपल, क्लास आमचा संपला. मित्रांसवे रमण्याचा वेळ आमचा संपला कोण जाणे मित्र आता पुन्हा येऊन भेटतील का...? मैत्रीचा हा गोडवा अतूट टिकवून ठेवतील का ...? गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी... पुन्हा त्या क्लास मध्ये जाऊन बसावस वाटतंय हातातून गेलेले क्षण पुन्हा अनुभवाव वाटतय कोण जाणे पुन्हा त्या आठवणी आम्हाला त्या दुनियेत घेवून जातील का ? कारण, गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी...