#स्वप्नातलं गाव गाव तुटत चाललंय एका एका श्वासागणिक अंतर मनांचं मनांशी वाढत चाललंय एका एका पावलागणिक मिटत चालल्या पाऊलवाटा पुसून पाऊलखुणा अरे माणसा तुझ्या हातून घडला असा कोणता गुन्हा पोखरलेल्या घरात उरले नात्यांचे अवशेष सोयरसुतकाइतकेच राहिले भावकीचे लवलेश नावापुरतं फक्त उरलं गाव फक्त आठवणी लिहीलेल्या डायरीच्या पानांवर नाती गोती विरत गेली हल्ली मन नसतं थाऱ्यावर घरासहित माणसंदेखील पुसट होत गेली मनामध्ये आठवणींची तुफान गर्दी झाली उरल्या सुरल्या आठवणींचं बांधुन गाठोडं रोज मी जगून घेतो गाव थोडं थोडं @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #हरवलेला_गाव