आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली