हिशोब करणे मला कधीच न जमले, आयुष्यात मी काय कमावले नि काय गमावले. बळ होते अंगी कष्ट करण्याचे,मी फक्त तेच केले, फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता,फक्त कर्म केले. मग जे मिळविले ते माझ्याच मेहनतीचे होते, त्यासाठी अंग माझे घामानी ओलेचिंब भिजले होते. अपेक्षा नव्हती कुणाच्या सहकार्याची नि मदतीची, पूर्ण विश्वास होता मला,साथ भेटेल मेहनतीची. प्रत्येकालाच अपेक्षा असते कुणाच्यातरी मदतीची, मला ही होती,पण फक्त स्वतःच्या मेहनतीची. लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.