आज सकाळ पासून सरी झिम झिम बरसत होती । वातावरण पण धुकं धुकं पडल्यागत झालं होतं। या चीक चीक क ने थोडा चिखल पण घाण केला होता। अश्या अवस्थेत लोणावळा-पुणे लोकल पण 10-15 मिनिटे उशीरा येत होती वाट पाहण्या बरोबर गर्दी वाढत होती। आणि त्या अश्या गर्दि मध्ये 7-8 वर्षाचा एक मुलगा भीक मागताना दिसला। मनात विचार आला की आपण याच थोडं निरीक्षण कराव। मग तो मुलगा पैसे मागत मागग माझ्या जवळ आला । मी बसलेल्या ठिकाणी आणि कुजबुजल्या गत मला पैसे मागू लागला। त्याचे कपडे जुने फाटलेले, महिन्या भराचा मळ साचलेले, अंघोळ तर नाहीच केलेली आणि माझ्या हाताला हात लावत म्हणाला । तो लहान आवाजात म्हणत होता दादा,भैय्या मला थोडे पैसे द्या । खूप भूक लागली काल रात्री पासून काहीच खाल्लेले नाही ।अश्या शब्दात तो उत्तरला आणि पोटाला हात सतत हात लावतं चालत होता आणि विचित्र अशे त्याच्या चेहऱ्यावरील हावं भाव दिसू लागले । त्याला काही लोक हात दाखवत तर काही जण त्याचावर हात उगारत, तर काही जण पुढे जाऊन माग, डोळे मोठे करत । काही जण सुट्टे पैसे देत। आणि तो घाबल्यागत पुढे हात पसरवत असे । त्याला कदाचित लोकांच्या हिसकण्याने स्वतः चोरी केल्यागत वाटत असेल। माझं लक्ष त्या मूला कडे वेधल करण बरेच तरुण, वृद्ध, महिला पहिल्या होत्या भीक मागताना आणि मी काही वेळा देत असे तर काही वेळा माने नं नाही म्हणून सांगत असे। अगोदरच माझे निरिक्षण करून झाले होते। पैसे मागताच मनात विचार आला की आपण त्या मुलाला पैसे न देता काही तरी खाऊ घालूयात । आणि लोकल ला पण अजून 15 मिनिटे वेळ आहे आणि इथं जवळच जात येईल । मी त्याला विचार काय खाशील । तर त्याने उत्तर दिले दादा मी वडापाव खाईल । चल मग आपण दोघे पण खाऊया आणि पैसे नाही देत मी तुला, मग त्यावर त्याने उत्तर दिले, खायला नको तुमि पैसे द्या, खायला नको पैसे द्या । पण मी विचार केला की याच्या सोबतीनं मला खाता येईल आणि त्या च्या बरोबर थोडा वेळ संवाद साधता येईल, त्याची माहिती आनि त्याला थोडं काही तरी सांगण्याचा प्रयत्न करता येईल । पण परत तो मान हलवत नाही नाही म्हणत खायला नको, पैसे द्या म्हणत लहानश्या आवाज उत्तरऊ लागला । आणि पुढे निघू लागला त्यावढ्यात माझ्या फोन ची बेल वाजली आणि मी फोन वर पप्पांन सोबत बोलत काही क्षण व्यस्त झालो आणि तो मुलगा पुढे मागत-मागत निघू लागला। माझे आणि त्याचे बोलने आटपून गेले ।लगेच माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले हा मुलगा तर आताच बोल ला की भुक लागली आणि आता पैसे द्या म्हणतो का बरं अस। त्याला खरंच भूक लागली नसलं, का त्याला फक्त पैसे हवे असतील । का त्या मुलाचा वापर होत असेल एखाद्या दलालाकडून असच काही तरी असावं असं वाटू लागलं । कारण भारतात खूप सारे असे दलाल आहे की जे लहान मूलांचे अपहरण करून सामान्य लोकांचे आर्थिक शोषण करतात। आणि काही जण लहान मुलांचा वापर करून 1एक व 2दोन नंबर चा धंदा, व्यवसाय करतात, त्यांना भीक अन्य अशी काही कामे करायला सांगतात जस की दहशतवादयांन प्रमाणे प्रशिक्षण दिले जाते। या प्रवृत्तीचे लोक भारतात लाखांवरून जास्त आहेत। अश्या लोकांना सरकारने ताब्यात घेऊन यांचे असे चोरटे व्यवसाय कडकडीत बंद करायला पाहिजेत । त्यांच्या वर कठोर कारवाई केली पाहिजे आणि भ्रष्टाचार पण होयला नको । पण हे पहायला आपल्याला फक्त टी.व्ही. मधेच पाहायला बार वाटतं । पण असं जात अस्तित्वात आणलं गेलं तर 2020 ऐवजी आजचं भारत महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहचेल। APJ कलामांचे स्वप्न पूर्ण पण होईल। पण असं लगेच होणं शक्य नाही ना । कारण इथं ठीक ठिकाणावर आपलं च सत्य या प्रवत्ती चे लोक आहेत । उदा, कब्बडी खेळा प्रमाणे आहेत जस की यशाची रेषाला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला की बाकीचे पाय ओढतात । असो। नंतर तो मुलगा पुन्हा माझ्या दिशेने येऊ लागला म्हटलं आपण त्याला काही तरि पैसे देऊ । तर तो तश्याच अवस्थेत माझ्याडे आला आणि उत्तरला दादा चला आपण वडापाव जाऊन खाऊया । त्याने घाबरत घाबरत म्हणला । लगेच आम्ही दोघेहि जवळच्या वडापाव च्या गाड्यावर गेलोत ।मी चालत चालत विचार करत होतो की हा मुलगा वापस का आला आणि आगोदर नको का म्हटला। नंतर 2 वडापाव मागितले वडापाव विकणारा चेहरा मोडत पाहून विचार करत असाल, थोडं स्मिथ हास्य करून 2वडापाव दिले। खाताना त्याला विचारल नको का म्हणलास रे मणाला न राहता ते निघून गेल। तर तो उत्तरला आता तर गर्दी आहे अजून कोणी देतील का ते पाहत होतो । आणि सफाई वाले व कर्मचारी इथं भीक मागू देत नाहीत ।म्हणून पुढे गेलो। कुठे राहतोस? Spine Road ला एक छोटी झोपडी आहे तिथेच राहतो। शाळेत का जात नाहीस?. असंच मागत पोट भरत हिंडाव लागत वाट नुघेल तिकडे। आणि मला शाळेत मास्तर नी येऊ दिल नाही, दाखला घेतला नाही। खरंच अश्या ह्या मुलांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे किंवा स्वतंत्र शाळा तरी ठीक ठिकाणी काढली पाहिजे। पिंपरी चिंचवड च्या महानगर पालिकेने अशी मोहीम चालू केली आहे ते खरंच उत्तम आहे दुसऱ्या पण महानगर पालिकने हे कार्य पुढे नयला पाहिजे, आदिवासी, अस्थायी अश्या लोकांसाठी शाळा उघडायला पाहिजे म्हणजे सर्वानाच नोकरी ची संधी लाभलं आणि शिक्षण ही पूर्ण होईल । करण कायमहित हेच उद्याचे उवा तरुण पिढीचे समर्थक, देश चालवणारे असतील तर। आईबाबा काय करतात? । बाबांना दिसत नाही आणि आई पण असंच मागते । आईला मदत म्हणून मी पण हेच काम हाती घेतल। उत्तर देत असताना खूप घाबरलेल्या अवस्थेत होता। आणि मला असे प्रश्न पडणं सहाजिकच होत। रात्री झोप काशी येत असेल त्याला। क्षणांत विचार येऊ लागले। माझा पण वडापाव मी त्याला देऊ केला। खूप भूकेलेल्या अवस्थेत होता तो। तो पण खुउन झाल्यावर म्हणलं, अजून घे तर नको पोट भरलं म्हणे। नंतर जाताना एक छान स्मित हास्य करून मला प्रश्नानाच्या कोड्यात सोडून, आनंदाने त्याच्या मार्गावर गेला। ✍✍✍ शिव दैवशला आत्माराम मुळे🙏🙏