माझी गुडीया किती छान इवले डोळे.. इवले कान.. चेहरा जणू भरलेला फुगा घातलाय तिने मस्त झगा झग्यावरची बुट्टी छान इवले डोळे.. इवले कान.. ओठ गुलाबी, डोळे लाल शोभून दिसते गोबरे गाल गालावरची खळी छान इवले डोळे.. इवले कान.. उंच टाचेची घातली सँण्डल पसरला सोनेरी केश मंडल केसांवरती मुकूट छान इवले डोळे.. इवले कान छोटीशी पर्स, छोटासा हार चाबी दिली की पळते फार पळतांना ती हसते छान इवले डोळे.. इवले कान शुभ संध्या माझ्या मीत्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बडबड गीत.. #बडबडगीत कुठल्याही विषयावर लिहीलं तरी चालेल पण हँशटँग मात्र विसरु नका. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai