प्रवाह जमाव जेंव्हा स्वार्थासाठी गोळा होतो... नीती मूल्यांचा पालापाचोळा होतो! राबराबती मायबाप ज्या पोरांसाठी ... त्याच मुलांचा तिकडे कानाडोळा होतो! केले काय असे ते सांगा आम्हासाठी... या प्रश्नाने मेंदू चोळामोळा होतो! कोंब कोवळे सडेपर्यंत कोसळल्यावर... आडमुठा पाऊस शेवटी भोळा होतो! कष्टाने खांदे झिजल्यावर मिळतो चारा... वर्षात एकदा स्नेहाचा पोळा होतो! भले असू द्या हुशार कोणी गरिबाघरचा... मार्ग यशाचा अखेरीस चिंचोळा होतो! सुखदुःखाच्या प्रवाहात मी पोहतोच पण... कधी ताठ तर कधी देह वेटोळा होतो! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade #Hope