रक्त झटकत वर्दीवरचे जरा देशात पाहिले त्याने आसार देशाच्या गर्दीवरचे धर्मवेशात पाहिले त्याने ही दंगल कसली जातनारेबाजी मला विचारले त्याने नक्सलवादी की आतंकवादी शोकात उच्चारले त्याने मी म्हटले तू सीमेवरती जेव्हा बाहू लढवत होता तेव्हा मंदीर-मस्जिदचा नारा इथे दंगल घडवत होता मंत्रीजंत्री आश्वासनांची तो आठवण काढत होता लोकशाहीवर निडर सैनिक आज अश्रू गाळत होता तो म्हटला मग शवास माझ्या तिरंग्यात का आणले तुम्ही जातीवादी असूनही स्वतःला भारतीय का मानले तुम्ही धर्मनिरपेक्ष गणराज्याचे पाठीवरचे दफ्तर काढले तुम्ही जातीवादी नाळेपायी माणुसकीचे लक्त्तर फाडले तुम्ही मग जाता जाता त्याने संपूर्ण भारतीयांना विनंती केली सर्वास सुरक्षित जागा देऊन त्याने बेवारस भ्रमंती केली - गोविंद अनिल पोलाड