तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती त्या मुळे याच्याकडे फोटॊ काढले तर मुलीचं लग्न लगेच जमतं असाही समज पसरला होता, अर्थात हा समज त्याच्या पथ्यावरच पडला होता , कुठून कुठून याचा पत्ता शोधत मुलीकडचे याच्याकडॆ यायचे, याला स्वत:साठी मुलगी बघायला सवड नव्हतीआणि मुलींची रीघ त्याच्या स्टुडियोत लागलेली असायची पण आज आलेल्या मुलीची गोष्ट्च वेगळी होती तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पहात राहीलं तर खरच खूप काही खास होतं , खास करून तिचा बांधा आणि खोबणीत बसवल्या सारखे रेखीव पिंगट डोळे, ज्यात वेदनेशिवाय काही नव्हतं , केस पातळ पण सिल्की सरळ , मधे भांग आणि शेवटपर्यंत वेणी वळायची जुनी पद्धत त्यामुळे तिचा निमुळता चेहरा खूपच वेगळा भासत होता असा फेसकट इफेक्ट आणण्यासाठी नायिकाना वेगळा मेक अप करावा लागायचा तो हिला उपजत मिळाला होता केसाना लावलेली चांदीची नक्षीदार क्लीप खूप कलात्मक होती पण या कशाची ना तिला जाणीव होती ना घरच्याना कल्पना होती त्यांच्या मते अती सामान्य रूपामुळे हडकुळ्या अंगकाठीमुळे हिला वारंवार नकार येतो