Nojoto: Largest Storytelling Platform
ashwinilike2138
  • 9Stories
  • 33Followers
  • 67Love
    0Views

Ashwini Like

My writing belongs to me. It comes through my personal experiences. When I write, I mean it. l love to live every moment of life...

www.instagram.com/ashwinilike

  • Popular
  • Latest
  • Video
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

"नसणाऱ्या प्रकाशात..."
काव्य✍️: © अश्विनी लिके 🌾
ही अस्वस्थता
हे तगमगणे
नसणाऱ्या प्रकाशात 
असे झगमगणे....

न संपणारे प्रश्न 
सोडवण्याचा अट्टाहास!
कॉन्ट्रॅक्ट बेसिस जगण्यावर
जसा भाडे तत्वाचा प्रकाश!

शापासारखे प्रामाणिकपण
करते भणंग जिणे.
मिरवावे प्रामाणिक भणंगपण
की व्हावे साऱ्यातून उणे!?

तहानेला नसते विष
श्वासाला नसतो फास.
या अस्थिर जगण्याला,
असते कसली आस??

शोधण्याचे हजार प्रयत्न
तरी हरवलेली वाट!
हरलेल्या जीवाने तेव्हा
शोधावी का पळवाट??

त्यावरून चालणेही आता
का वाटते अप्रामाणिक?
प्रामाणिकपण घालावे खड्ड्यात?
त्याला ना घाली कोणी भिक!!

विकावे सारे आदर्श,
व्यवहाराच्या दुनियेत.
स्वतःच्या दुनियेतून होऊन बाद,
घेता येईल स्थिरता कवेत!!?? 

ही अस्वस्थता 
हे तगमगणे
नसणाऱ्या प्रकाशात
असेच राहते झगमगणे...

©Ashwini Like #kavita #marathi #aswsthta

#moonlight
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

अंतर्वेध
लेखन ✍️: ©अश्विनी लिके🌾
लहानपणी समुद्रात येथेच्छ डुंबून झाल्यानंतर बोटांवर आलेल्या विशेष रेषांच्या नक्षीचे कौतुक वाटायचे. किनार्‍यावर धावत-पळत धिंगाणा घालून जरासेच टेकायचे आणि मग त्या विशेष रेषांच्या नक्षींचं कौतुक सोडून उकरत राहायची वाळू... वाळूखालून पाणी झिरपून खड्ड्यात यायचे आणि खड्डा भरायचा आणि मग अजून कल्ला.. माझ्या विहिरीला पाणी लागलं! माझ्या विहिरीला पाणी लागलं! माझी विहीर भरली! मग माझ्याकडे एवढं... तुझ्याकडे तेवढं... त्यानंतर मोठी विहीर बनविण्यासाठीच्या खलबती! सार्‍यांच्या विहीरी‌ जोडल्यानंतरचे पाणी पाहून समुद्र बनवल्याचे समाधान! आता फतकल मांडून बसता येईल जेमतेम तेवढ्या आकाराच्या खड्ड्यात आळीपाळीने उड्या मारण्याचा, पाणी उडवण्याचा कार्यक्रम तोपर्यंत चालू रहायचा जोपर्यंत कोणी मोठे ओरडत, बोलवत नाही...
आपण सारे आयुष्यरुपी समुद्राच्या किनारी आहोत. कधी पाण्यात तर  कधी वाळूवर! या समुद्राला चिकटून असणारा भावनांचा किनारा भरती-ओहोटी नुसार बदल राहतो... किनाऱ्यावर असताना थंड पाण्याची ओढ आणि पाण्यात असताना वाळूची ऊब हवी असते आपल्याला. आपण सारे पाण्यातून किनाऱ्याकडे आणि किनाऱ्याकडून पाण्यात धावणारे जीव!! आपण मोठे झालो, बालपण विसरलो आणि विसरलो की पाण्याच्या तळाशी स्थिरत्वाची ऊब देणारी वाळू असते आणि दूरपर्यंत पसरलेल्या किनार्‍याच्या वाळूखाली अविरतपणे गाजणारा अथांग समुद्र असतो.
या वाढलेल्या शरीराला आणि इतरत्र उत्तरे शोधणाऱ्या मनाला बालपण जगण्याची सवय जाणीवपूर्वक लावावी लागते.
दिनांक: २८/११/२०२०

©Ashwini Like

255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

Remember me with...
                      Poem✍️: Ashwini S. Like.

After facing many stones,
It stood friendly; not wicked.
Giving sweetness of it's heart,
No stones were transmitted.

                                        It knows the way to life,
                                        No storm can be omitted.
                                        This made it more stronger
                                        Gloominess never submitted.

Shedding all the leaves
Now, tree is all naked.
It is prepared to deliver
Tiny leaves self-motivated.

                                          Remember me with it,
                                          I am paused; not outdated.
                                          I am getting rare colours,
                                          To stay calm and unfaded.

©Ashwini Like #ashwinilike #temembermewith #poem
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

सुखही नाही, दुःखही नाही...
           काव्य ✍️: ©अश्विनी लिके🌾🌾

सुखही नाही दुःखही नाही,
उरी तरी सारखे सलते सलते.
जगणे होते विवंचना अन्
प्रेत पाण्यावर तरते तरते...
                                तळ नाही गाठला दुःखाचा,
                                दुःख किती गुणी हसते हसते.
                                या हसण्याने सुख तळाचे,
                                रुसून खोलवर बसते बसते...
जीवघेणा अलवार प्रवास हा,
पाठलाग कुणी करते करते.
हृदय मागे मन पुढल्या वळणावर,
तन अडवून कोणी धरते धरते...
                                   अडवणूक ही सुटतच नाही,
                                   सोडवणूक अवघड नसते नसते.
                                   कोणाच्या रडण्यात कोणाचे हसणे,
                                   किनाऱ्यांचे हेच गाणे असते असते...
अजून खोलवर जाताना मग,
हळूहळू वाळू सुटते सुटते.
मुक्त होता कोंदाटले क्रंदन,
सुख-दुःख तटातट तुटते तुटते...
                                                 दिनांक: १६/११/२०२०

©Ashwini Like #ashwinilike #sukh_dukh #सुखही_नाही_दुखही_नाही #marathi #मराठीकविता #MarathiKavita
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

Sometimes momentary things,
I mistook to be lifelong.
I deserted myself,
Going more and more long.

                          These distances with myself,
                           Built me beautiful hell.
                           Anger, anxiousness set up,
                          Their house in me very well.

My life became haunted,
People came and went.
"I should be with me",
This message my mind sent.

                        After travelling through,
                        Dark woods of loneliness,
                        Finally I saw the rays,
                        Ending all hopelessness.

Setting my priorities,
I am with me on a walk.
No crowd is ever needed,
When one walks without flock!

                           Now I am all done, so,
                           There's no turning back.
                           With all the greatest lessons,
                           I have packed my sack!

                       ✍️Ashwini S. Like #ashwinilike  #profoundwriters  #no_turning_back
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

"प्रेमाचा परीसस्पर्श"
काव्य ✍️: अश्र्विनी लिके ©

लॉकडाऊन मध्ये दिलीस,
वेटिंग मधली गुड न्यूज! 
पुरवता येतील का लाड?
अशा प्रश्नांचा आता 'नो यूज'!!

ऑनलाईन पहातेय तुला,
महिन्या-महिन्याला बहरताना, 
तुझ्या स्पेशल हसण्याला,
मातृत्वाची स्निग्धता पांघरताना...

तुला जाणवू लागलेय, 
जीवाचे कोमल अंकुरणे...
मनातल्या मनात तुझे, 
न पाहिल्या जीवास बिलगणे!

पाहणाऱ्यांना फारतर दिसते, 
वाढलेले तुझे पोट... 
पोटातल्या जीवाला बोलण्यास, 
लागतात का गं ओठ?!

आता दिवस-रात्र तुमचे,
संवाद सुरू असतील. 
पोटावर हात फिरवत तू,
नेमके काय बोलत असशील??

अशा सार्‍या प्रश्नांना तू,
स्मितहास्याने देशील उत्तर! 
प्रेमाच्या या परिसस्पर्शाचा,
आनंद बहरत राहो निरंतर!!

सप्रेम,
केतूला वैदूकडून...
स्वातीला आशूकडून... #ashwinilike 

#motherslove

#maa
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

Castle in the clouds
✍️ Ashwini S. Like.

Have you ever seen
Any castle in the clouds?
It vanishes within a moment,
Leaving you lonely in crowds.

If you've built such castle,
You know it is so pleasing.
The warmth you get in it,
Is actually more than freezing.

With twinkling eyes,
Everyone builds it for ones.
With it's predestined fall,
Many lessons one learns!!

Lessons are important...
So the castles in the clouds.
To reach to the height,
Some falls are allowed. #Castle #clouds #ashwinilike 
#feather
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

लुट गया दोस्त बनके कभी मैं,
कोई मुझ पर भी अपनी दोस्ती लुटा दे।
क्या नीलाम हो गई है वो बाज़ारों में,
आकर कोई कीमत मुझको भी बता दे ।
✍️ : © अश्र्विनी लिके #दोस्त #लुट #ashwinilike

#Dreams
255599e448bfa9c58e40ec11faa6609b

Ashwini Like

मागे ठेउन केवळ
अबोल पाऊलखुणा
जायचे ठरलेले तुझे
तरी अट्टहास वेडा 
असा तू धरला...
रडता न आले
चालता न आले
तुझ्यासवे कधीही...
जगता कधी आले...
 माझे मलाही...??
काव्य© : अश्विनी लिके. #पाऊलखुणा  #ashwinilike

#DesertWalk


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile