Nojoto: Largest Storytelling Platform
hritikgajanancho7045
  • 2Stories
  • 11Followers
  • 141Love
    63Views

Hritik Choudhari

Author

  • Popular
  • Latest
  • Video
29e224a85ee057ae4ef358bb8f543183

Hritik Choudhari

White                       हे असे फुलु दे 

शब्दांचा या रौद्र अर्थ , कळूदे त्या शांत मनाला ,
शांत मनातील सार क्रांतीचा , कळूदे त्या धूर्तपणाला

कर्मकांडचे धडे जाणतो , तरी कुकर्म तुझ्या तयाला ,
माणुसकीचा घात करतो नि् तरी लावतो सारंग मनाला ?

लय सुरांचा शब्द अर्थांचा , कळूदे त्या सुप्त कणांना ,
भाव प्रितीचे अश्रू कीर्तीचे , कळूदे त्या हीन जनांना

वेडे असो वा् वाकडे , जीव लाव त्या रत्न वणांना ,
डोक्यामधले ज्ञान वाट अन् फुलु दे त्या अन्य फुलांना...
                                                   - हृतिक चौधरी

©Hritik Choudhari #nightthoughts
29e224a85ee057ae4ef358bb8f543183

Hritik Choudhari

White  एकदा काय झाले की , स्नेहल आणि मिनू या दोघांमध्ये धावण्याची शर्यत लावली . दोघेही उत्तम धावले आणि त्या शर्यतीत स्नेहल जिंकला . पण , आम्हाला स्त्रोतांकडून अशी माहिती मिळाली की स्नेहल ज्या ट्रॅकवरून धावत होता तो ट्रॅक , अतिशय गुळगुळीत (धावण्यायोग्य) आहे आणि मिनू ज्या ट्रॅकवरून धावत होता तो  ट्रॅक अतिशय खडबडीत आहे . आता तुम्हाला असे विचारले की विजेता कोण तर तुम्ही म्हणाल मिनू .
                 पण , आम्ही त्या शर्यतीबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा असे कळले की ,स्नेहलचे वजन ५० kg आहे आणि मिनूचे वजन १२० kg आहे . आता तुम्हाला विचारले की विजेता कोण ?? तर तुमचे उत्त्तर आता काही वेगळे असेल . आम्ही अधिक माहिती काढता असे लक्षात आले की , स्नेहल चे वय ३० वर्ष आहे आणि मिनुचे वय ८० वर्ष आहे . आता तुमचे उत्तर काहीसे वेगळे असेल .
                                     एक गोष्ट इथे लक्षात घ्या. आपण जशी - जशी नवनवीन माहिती गोळा करत गेलो तसे - तसे , त्या व्यक्तीबद्दल आपली मतं बदलत गेली . साहजिकच आपला त्या दोन्ही व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला . आपल्या आयुष्यातही अश्याच गोष्टी घडत असतात . 
                        आपण बऱ्याचदा आपली तुलना इतरांशी करतो पण पुढच्या व्यक्तीच्या आणि आपल्या  वाटेत येणारी संकटे , अडथळे सर्वकाही वेगवेगळे आहे . प्रत्येकाची स्पर्धा वेगळी आहे . त्यामुळे , स्वतःची तुलना कुणाशी करायची झाली तर ती स्वतःशीच करा आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवा , बदल घडवा आणि स्वताला सर्वोत्तम बनवा .

©Hritik Choudhari #Road


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile