Nojoto: Largest Storytelling Platform
vaibhavpadmakard8092
  • 6Stories
  • 26Followers
  • 29Love
    0Views

vaibhav padmakar Dharmadhikari

लेखक , कवी , व्याख्याता

  • Popular
  • Latest
  • Video
30e50f7ae363a25c022ba6fd14d01255

vaibhav padmakar Dharmadhikari

रामायणातील एक स्त्री जी इतिहासात कायम 
दुर्लक्षित राहिली नव्हे इतिहासाने तिची नोंद कधी 
घेतलीच नाही त्याच स्त्री ला वास्तवात आणण्याचा
हा छोटासा प्रयत्न....

30e50f7ae363a25c022ba6fd14d01255

vaibhav padmakar Dharmadhikari

जगणं त्याच्या भरवश्यावर सोडून द्यायचं आणि 
प्रयत्न आपण करायचे तेंव्हा तोच त्या 
प्रयत्नांच्या रूपाने जवळ येऊन
आपलं यश बनून जातो....

                  - वैभव

30e50f7ae363a25c022ba6fd14d01255

vaibhav padmakar Dharmadhikari

मन...

मन नदीचा किनारा !
मन सागराचं पाणी !
मन माळावरचा वारा !
मन आठवणींची गाणी !!

मन आभाळ आभाळ !
मन पाखरांचा थवा !
मन स्वतःची खुण !
मन क्षणाचा विसावा !!

मन आठवणींचा पाऊस !
मन ओढ्याची खळखळ !
मन झाडाची सावली !
मन पानातली सळसळ !!

मन स्वप्नांचा तो गाव !
मन डोळ्यांची ती धार !
मन उन्हाचा पहारा !
मन मनाचा आधार !!

मन चाहूल थंडीची !
मन आळवावरचा थेंब !
मन ग्रीष्माचा उन्हाळा !
मन खडकातला कोंब !!

वैभव धर्माधिकारी ©

30e50f7ae363a25c022ba6fd14d01255

vaibhav padmakar Dharmadhikari

तू मुक्त आहेस....

भावनांचं गाठोडं घेऊन जातांना
कधी थकली तर विसावा घे
त्या आठवणींच्या झुल्यावर
बघ मन शांत होईल....
दुरावलेल्या वाटा शोधतांना होतेच
दमछाक तर कधी येतं नैराश्य
तेंव्हा तो अस्ताला गेलेला सूर्य बघ
 उद्या  उगवण्यासाठी बुडालेला 
क्षणात दूर होईल ते मळभ अन 
पेटशील तू नव्याने त्या निरागस पण
संपण्यासाठी पेटलेल्या दिव्यासारखं...
सुखाला शोधावं वाटलंच कधी तर 
तो नभात हरवलेला चंद्र बघ 
म्हणजे तुला तुझ्या दुःखाची 
खंत वाटणार नाही ....
तू मुक्त आहेस त्या हरणी सारखी
चपळ अन चाणाक्ष सुद्धा
तेंव्हा विसावा घेऊन उठली ना 
तर उधळू दे तुझ्या भावनांचे वारू
चौफेर अन घुमूदे तो जल्लोष
जो तुला बंधनात ठेऊ पाहत होता....

वैभव धर्माधिकारी

30e50f7ae363a25c022ba6fd14d01255

vaibhav padmakar Dharmadhikari

नक्षत्रात स्वातीच्या थेंबांचा मोती झाला !

अनमोल असुनी त्याचे जगणे बंधीस्त झाले !
 
        - वैभव

30e50f7ae363a25c022ba6fd14d01255

vaibhav padmakar Dharmadhikari

प्रत्येकवेळी केला जाणारा तह, ही माघार नसते तर ती सुरुवात असते एका नव्या वादळाची...
                   -वैभव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile