Nojoto: Largest Storytelling Platform
shashitile8256
  • 20Stories
  • 59Followers
  • 91Love
    0Views

Shashi Tile

माणूस भेटला की, मी माणुसकी पेरत जातो.. ती उगो अगर ना उगो, ह्याची मला खंत नाही.. पेरण्याची सवय लागली, यातच आनंद आहे..

shashitile.wordpress.com

  • Popular
  • Latest
  • Video
50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

आपल्या वाट्याला नेहमी चांगलंच यावं असे आपल्याला वाटत असते,
पण आपल्याला जसे वाटते तसे कधी आयुष्यात घडत नसते..
आलेला क्षण जसा आहे तसा मोठ्या मनाने स्वीकारायचे असते,
आपल्या नशिबात काय वाढून ठेवले हे कधीच माहीत नसते..
सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करायचा असतो..

आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर करा..

मग पहा विचार करून,
  आपले आयुष्य सुंदर करता येते का ते ! !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

या जगात बिना चावीच असं कोणतेच कुलुप नाही, 
त्याचप्रमाणे बिना मार्गाची कोणतीच समस्या नाही..
प्रत्येक समस्येला मार्ग असतो तो शोधावा लागतो..
पलायन करण्यापेक्षा हिम्मतीने संकटाला सामोरे जाण्यात  
जास्त पुरुषार्थ असतो आणि हा पुरुषार्थ अनेक संकटाशी  
दोन हात केल्या नंतरच येतो..
हीच पुरुषार्थी व्यक्तिमत्व  
कालांतराने अजिंक्य ठरतात..
 
संकटांना सामोरे जा, लढा आणि जिंका..

मग पहा विचार करून, 
संकटांना कसे सामोरे जायचे ते !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

आपल्याला जे हवं, जे पाहिजे, जे मिळवायचं मग तेच करा..
उगाचंच इच्छा नसताना नको असलेल्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही..
वर्तमानाचा विचार करायला जाल तर भविष्य गमावून बसाल..
इतिहास साक्षी ज्यांनी हृदयाचं ऐकलं ती असामान्य ठरली  
आणि ज्यांनी दुसऱ्याचं ऐकलं ती सामान्य राहिली..

हृदयाचं ऐका आणि जाग जिंका..

मग पहा विचार करून, 
तुमच्या हृदयाला काय सांगायचं आहे ते !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

या जगात काही माणसं स्वत:चा मोठेपणा  
सिद्ध करण्यासाठी विविध महागड्या  
वस्तुंचा संग्रहाचा आधार घेतात. 
पण तीच माणसं तत्वांचा, सत्याचा, आदर्शाचा, 
चारित्राचा आधार घेणं टाळतात. 
मग त्यावेळेस जगाने त्यांच्याकडे दुर्लक्ष्य केलं तर  
त्यांना वाटतं हे जग माझ्या प्रगतीवर जळतं..
 मुळात तुमची किमंत याच्या वरून ठरते की, 'तुम्ही काय आहात.'
याच्या वरून नाही की, 'तुमच्या जवळ काय आहे.'

आयुष्यात मनाने, हृदयाने, चारित्र्याने मोठे व्हा..

मग पहा विचार करून, 
योग्य मार्गाने मोठेपणा मिळवता येतो का ते !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

ज्याने एक पाऊल टाकले 
तो एक पाऊलांनी ध्येयाच्या जवळ गेला, 
ज्याने दहा पाऊलं टाकले  
तो दहा पाऊलांनी ध्येयाच्या जवळ गेला, 
ज्याने शंभर पाऊलं टाकली  
तो शंभर पाऊलांनी ध्येयाच्या जवळ गेला, 
ज्याने चालून चालून संपूर्ण मार्ग संपवला  
 त्याने ध्येय गाठले..

आपलं टाकलेलं प्रत्येक पाऊलं हे ध्येयाच्या दिशेनेच टाका..

मग पहा विचार करून, 
तुम्ही किती पाऊलांनी ध्येया जवळ आहत ते !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

वादळं जेव्हा येतात  
तेव्हा ते आपल्या समोर कोण आहे? कोण नाही? 
हे न पाहता जे येईल ते नष्ट करतात, उद्धवस्त करतात..
पण त्याप्रसंगा नंतर पक्ष्यांकडून काही गोष्ट शिकण्यासारख्या आहे, 
वादळं गेल्या नंतर ते नशिबाला दोष न देता, 
पुन्हा उठतात, पुन्हा ऊडतात, पुन्हा भरारी घेतात, 
पुन्हा चांगलं गातात आणि पुन्हा घरटी बांधायला सुरवात करतात..

आयुष्यात असाच वादळ गेल्यानंतर  
पुन्हा उठा, पुन्हा उडा, पुन्हा भरारी घ्या  
आणि पुन्हा आनंदाने एक नवी सुरुवात करा..

मग पहा विचार करून, 
शुन्यातुन विश्व निर्माण करता येतं का ते ! #marathi #quotes #nojoto #fly #bharari
50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

आज माणूस माणसाशी माणूसकीने न वागता व्यवाहाराने वागतो..
कारण आज माणसाचा माणसावरचं प्रेम कमी झालं,
माणसावरची द्या, करुना कमी झाली म्हणून..
फक्त स्वत:चा विचार करायचा या सूत्राने
 हे सुंदर जगाचं रुपांतर स्वार्थी जगात केले आणि भोग पराधीन झाला..

आज स्वार्थ नको, परमार्थ हवा..
पुन्हा एकदा या जगाला बुद्ध हवा..

मग पहा विचार करून,
बुद्धांच्या जिवनातून काही उचलता येते का ते ! ! !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

आयुष्यात सगळ्याचं गोष्टींना चिकटून राहणं योग्य नाही,
योग्य वेळ आली की त्यापासून मुक्त होण्यातच शहाणपणा..
नको असलेल्या गोष्टी साठवणे म्हणजे सडक्या आंब्याला
साठवण्यासारखं म्हणजे तो बाकीच्या गोष्टी ही सडवंणार..
एखादं काही सोडलं तर दुसरं मिळतं,
नाहीतर हे ही भोगता येत नाही आणि ते ही..
मुक्त करण्यासाठी विसरावं लागतं,
मोठ्या मनाने माफ करावं लागतं,
तेव्हा कुठे दुसऱ्या गोष्टीचा आनंद घेता येतो..

         मग पहा विचार करून,
                आनंदी राहण्यासाठी काय मुक्त करायचं ते ! ! !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

क्षुद्रतेने मनाचे खच्चीकरण होते,
क्षुद्रतेने कमीपणाचा न्यूनगंड येतो,
क्षुद्रतेने आपल्या जीवनाचा विकास खुंटतो..
स्वतःला क्षुद्र समजणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे..
क्षुद्रतेवर विजय हा फक्त अन फक्त महानविचार, उच्चध्येय
आणि दृढसंकल्प स्वीकारल्याने होतो..

स्वतः क्षुद्रतेचे पाईक होण्यापेक्षा महानतेचे निमित्त व्हा..

मग पहा विचार करून,
क्षुद्रते कडून महानतेकडे प्रवास करता येतो का ते ! ! !

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

माणसाला जाग ही स्वप्न पाहायला नंतरच येते,
मग ते उघड्या डोळ्याने आसो किंवा बंद डोळ्याने..
प्रत्येकाने स्वप्न पाहिली पाहिजे,
ते जिवंत आणि ध्येयवान असण्याचे लक्षण..
पण दुर्दैवाने प्रत्येकजण आपली स्वप्न मारून
दुसऱ्याची स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करतो..
आपली स्वप्न ही आपल्यालाच पहावी लागतात आणि साकार करावी लागतात..

स्वप्न पहा, स्वप्न जगवा आणि स्वप्न सत्यात उतरवा..

            मग पहा विचार करून,
                         तुम्हाला तुमचं कोणतं स्वप्न सत्यात उतरवायचं ते ! ! ! #marathi #swapn #dream #quotes #nojoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile