Nojoto: Largest Storytelling Platform
archanadeshpande7064
  • 83Stories
  • 108Followers
  • 517Love
    1.8KViews

Archana Deshpande-Pol

  • Popular
  • Latest
  • Video
56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

आठवणीचे बंध रेशमी
मनात हळव्या दाटुन येती.

सान सानुले रूप गोजिरे
माथ्यावरती जावळ कुरळे
ओठ गुलाबी इवले इवले
लोभस डोळे लुकलुकणारे

गालावरती तीट लावता
खळी पाडुनी खुदकन हसते
रूप साजिरे बघता बघता
आनंदाने भान हरवते.

पाळण्यातले लोभस रुपडे
जवळी घेता माया झरते
सानकोवळ्या मिठीत इवल्या
सुखस्वप्नांना भरते येते.

बोल बोबडे बोलत बोलत
विश्वच अवघे व्यापून घेते
गुडघ्यावरती रांगत रांगत
नटखट खोड्या वेड लावते.

सौख्यक्षणांचे रंग सोहळे
मनात माझ्या दाटून येती
गेला सरून काळ तरीही
बंध रेशमी मने उजळती

बालपणाचे तरंग गंधित
काळजात मी अलगद जपते
'आई ' म्हणुनी हाक ऐकता
मातृत्वाचे सार्थक होते.

©अर्चना देशपांडे पोळ. बंध रेशमी..

बंध रेशमी.. #Shayari

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

ती उदास होते थोडी
परि पुन्हा नव्याने हसते
आशेच्या किरणांसंगे
ती स्वप्नं उद्याचे बघते.

ती होते उधाण वारा
ती होते लुकलुक तारा
ओठात माळूनी गाणे
पसरवते गंध पसारा.

रंगात रंगुनी जाते
स्वप्नांना कवेत घेते
ती लहरत वाऱ्यावरती
आभाळी विहरुन येते.

काळोख्या काजळ रात्री
ती लख्ख काजवा होते
मिणमिणत्या अंधाराला
ती तेजाळत मग जाते.

ती स्वप्न उद्याचे जगते.
ओठावर हसरे गाणे
काळाच्या पडद्यावरती
ती भविष्य रेखत जाते.

राखेतुन पेटुन उठते
ती होते भगवी ठिणगी
ती विझल्या डोळ्यांमधल्या
स्वप्नांना फुलवत जाते.

सांजेला मावळताना
ती मशाल घेते हाती
ती आशा.. स्वप्न उद्याचे..
भाळावर मिरवत येते.

©अर्चना देशपांडे पोळ. ती..

ती.. #Shayari

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

रात्र धुंद मंतरली
आठवात रमलेली
चांदण्यात फिरताना
सय हलके ओघळली.

रोमांचित तनु ओली
शब्दधून मोहरली
स्पर्शफुले हळवेली
गात्रातून पाझरली

फुललेल्या धुंद कळ्या
मोहविते चंद्रकळा
नभांगणी चंद्रझुला
पांघरते स्वप्नफुला

शुभ्र चंद्र पुनवेचा
भाववेडी प्रित खुळी
चांदण्यात लखलखत्या
रंगलेली रात्र निळी

चांदण्यात गंधसडा
तळमळतो मौन चुडा
चांदण्यात फिरताना
पापण्यात कुंद हवा..

©अर्चू.. चंद्रसडा

चंद्रसडा #Shayari

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

रात आलीया भरात
मन गारुड गारुड..
काळ्याशार अंगणात
चंद्र चांदण्यांची झड..

रात रुतली उरात
घर करी काळजात..
मन चांदण्या उन्हात
स्वप्नं जपते डोळ्यात..

रात पुनवेची ओली
लख्ख चांदणं भरली..
तुझ्या आठवांची सय
गच्च मनी ओथंबली..

रात काजळ काजळी
अवसेची रंगकळा..
कशी सरता सरेना..
नभ डोळ्यात माईना..

रात भरुन वाहते
मन सैरभैर आत..
फडफडते पाखरू
लख्ख कळ काळजात..

©अर्चू.

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

#काही तुझे काही माझे..

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol



चाळ बांधून पायात
घन नाचले रानात..
मोरपिसारा मनाचा
थुईथुई अंगणात..

पावा मंद राऊळात
देई शांतता मनात.
ज्योत दिव्याची तेवते,
तेजोमयी अंतरात.. 

ज्योत तेवते आशेची
समाधान उजळते.
माझ्या घामाच्या कष्टाला
धान मोत्याचे लाभते.

मोतीयाचा रानवारा
दाट आनंद शहारा
रंग हिरवा पारवा 
मन भिजवी गारवा.

मोती भरल्या लोंब्यांनी,
शेत शिवार सजले.
सये सुखाच्या सरींनी
डोळे अश्रूंनी भिजले.

©अर्चना देशपांडे पोळ.












 रानवारा

रानवारा

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

तुझ्या माझ्या गं दुःखाची 
जात वेगळी गं बाई..
तुझ्या ओटीत चांदणे
माझ्या निखारे गं सई..

तुझ्या पायी मखमल 
मऊ मऊ रेशमाची..
माझ्या पायी काटेकुटे
माझी वाट गं उन्हाची..

तुझ्या वेगळ्या जाणीवा 
त्याला झालर सोनेरी..
माझ्या जाणीवांची बयो 
सय डोळ्यात उन्हेरी..

तुझ्या दुःखाला रंगीत 
असे आरसा बिलोरी.
संग उन्हाचाच सारा 
वाट बोचरी काटेरी..

तुझ्या सोनेरी दुःखाला
सोन्या रुप्याचे कोंदण..
माझे दुःख माझ्या उरी
डोळी सुखाचे गोंदण..

माझ्या दुखऱ्या सलांना,
तळघरात कोंडते.
सुख स्वप्नांची पहाट
रोज नव्याने पाहते..

©अर्चू..
56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

तुझ्या माझ्या गं दुःखाची 
जात वेगळी गं बाई..
तुझ्या ओटीत चांदणे
माझ्या निखारे गं सई..

तुझ्या पायी मखमल 
मऊ मऊ रेशमाची..
माझ्या पायी काटेकुटे
माझी वाट गं उन्हाची..

तुझे दुःख मखमली 
त्याला फुंकरीचे गाणे..
माझे दुःख काळजात 
त्याचे अश्रूंत भिजणे.

तुझ्या वेगळ्या जाणीवा 
त्याला झालर सोनेरी..
माझ्या जाणीवांची बयो 
सय डोळ्यात उन्हेरी..

तुझ्या दुःखाच्या सोबत 
गार फुंकरीचा वारा..
माझ्या सोबतीला सये 
संग उन्हाचाच सारा.. हसरे दुःख

हसरे दुःख #poem

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

मातृत्वाचे लेणे तीला..
वात्सल्याची कास तीला..
देवत्वाचा भास तीला..
परंपरांचा जाच तीला..

क्षितीजाची आस तीला..
पूर्णत्वाचा ध्यास तीला..
पुर्णत्व साकारताना..
वादळांचा त्रास तीला..

नभांगणाचे स्वप्न तीचे..
घरट्याचेही भान तीला..
स्वप्न उरी जगताना..
बंधनांचा शाप तीला..

कर्तृत्वाची मशाल घेता..
चाकोरीची आच तीला..
ध्येयासक्त नजर तीची..
सक्तीची काच तीला..

वर्तुळात बंधीत ती..
लक्ष्मणरेषेचा बांध तीला..
सौंदर्याचे लेणे तीचे..
भोगदासी नाव तीला..

वासनांची शिकार ती..
शीलत्वाचा फास तीला..
विटंबनेचे हार घालूनी.. 
व्याभिचारीत्व बहाल तीला..

सुकुमार मुग्ध कळी 
वेदनांचा भार तीला.
गर्भातच मरण्याचा
आजही शाप तीला..

तेजोमय पणती ती..
प्रकाशाचा ध्यास तीला.
प्रेरणेची दीपमाळ ती
वंदनीय स्थान तीला.

वंशवेल वाढवण्याचे..
स्रीत्वाचे वाण तीला..
प्रसववेणा साहून ती..
कृतकृत्य करी मातृत्वाला..

©अर्चना देशपांडे पोळ.















ऐ स्त्री..

स्त्री..

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

चित्रामधूनी दिसतो आहे रस्ता  केविलवाणा
रयाच गेली भग्न जाहल्या साऱ्या पाऊलखुणा
बंद वाहने, बंद दुकाने कळकटलेल्या भिंती.
फलकांवरती नाव पुसटसे काजळलेली
बत्ती.

कचराकुंडी विखुरलेली रस्त्यावरती साऱ्या
धुळ वेढूनी बसला आहे सारा रंग पसारा
धुरकटलेल्या तारांवरती घुसमटलेला वारा
 काळोख्या रात्रीस वेढतो शांत मग्न पहारा

भयाण गल्ल्या, भकास रस्ते भीषण दिसते सारे
सुन्न कोरड्या आकाशातून मावळलेले तारे
जागोजागी विखुरलेली ओंगळवाणी नक्षी
धूसरलेले भयाण सारे भेदरलेले पक्षी

गूढ शांतता नांदत आहे मनामनातुन येथे
भुतकाळाच्या आठवणींशी जोडत जाते नाते
उध्वस्थ मने, उध्वस्थ चरे, उध्वस्थ पोकळी आहे
चित्रामध्ये वसणारे ते शहर हरवले आहे.

रंग फिकूटले, नभ कोंदटले तरी उजळते आहे
उगवत्या सुर्यास उद्याचे दान मागते आहे.

अर्चू.. #चित्रकविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile