Nojoto: Largest Storytelling Platform
atharvajayantgok3454
  • 36Stories
  • 42Followers
  • 364Love
    82Views

Atharva Jayant Gokhale

In search Of real Life .. follow me on Instagram ( atharva_go_02) what's app no_ 9307404903

  • Popular
  • Latest
  • Video
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

नातं..

सरळ सोप्या गुंतवणूकीचं,
माप म्हणजे नातं,
विरळ खोट्या पैलुंनी,
सहज वेढलं जातं,

दाट खऱ्या भावनांनी,
सहज जोडता येतं,
नातं म्हणजे विश्वास,
नेहमी सोबत राहतं,

अवघड अश्या वळनावरुनी,
वळण घेत बनतं,
मदतीच्या दोन हातांचं,
संकटात दर्शन घडतं,

विश्वासाच्या थोडया स्पर्शाने,
अजून घट्ट होतं,
लोभाच्या हलक्या माराने,
क्षणात अधिक ताणतं,

शब्दांच व अर्थाचं सुद्धा,
खूप वेळाने जुळतं,
रोज रोज नव्याने,
नवं नातं जन्म घेतं,

                            - अथर्व. ज. गोखले
                           ( मो. नं - 7558404903)

©Atharva Jayant Gokhale #desert
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

नातं..

सरळ सोप्या गुंतवणूकीचं,
माप म्हणजे नातं,
विरळ खोट्या पैलुंनी,
सहज वेढलं जातं,

दाट खऱ्या भावनांनी,
सहज जोडता येतं,
नातं म्हणजे विश्वास,
नेहमी सोबत राहतं,

अवघड अश्या वळनावरुनी,
वळण घेत बनतं,
मदतीच्या दोन हातांचं,
संकटात दर्शन घडतं,

विश्वासाच्या थोडया स्पर्शाने,
अजून घट्ट होतं,
लोभाच्या हलक्या माराने,
क्षणात अधिक ताणतं,

शब्दांच व अर्थाचं सुद्धा,
खूप वेळाने जुळतं,
रोज रोज नव्याने,
नवं नातं जन्म घेतं,

                            - अथर्व. ज. गोखले
                           ( मो. नं - 7558404903)

©Atharva Jayant Gokhale
  #nightsky
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

ओढ 

ओढ खुणावते जीवाला, 
अन, गालावर हसू येतं, 
गोड नाजूक खळीचं दर्शन, 
केव्हा केव्हा च घडतं, 

जेव्हा जेव्हा सुखाचं, 
सुखाने मिळतं वरदान, 
मनं वावरत असतं, 
पण मोकळं असतं रान, 

रानात चालता चालता, 
होते दिवसाआधीची पहाट, 
अंधुक प्रकाशात दिसते, 
जीवनाची एक वाट, 

वाटेवर पुढे जातांना, 
वेळेची मर्यादा येते, 
यशाची ओढ मज, 
पुन्हा पुन्हा खुणावते, 

यशाची ओढ मज, 
पुन्हा पुन्हा खुणावते, 

                   -अथर्व. ज. गोखले 
          (मो. नं -7558404903)
             (यवतमाळ, महाराष्ट्र )

©Atharva Jayant Gokhale
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

आप मेरे अपने है,

आप मेरे अपने है, 
सबके कुछ कुछ सपने है, 
दिखाते नही कि हम यार है, 
घरवालों का पहिला प्यार है, 

संसार के हम विविध अंग है, 
घर से दूर हम संग है, 
चोट पैर को भी लगे, 
तो पानी आँखो मे आता है, 

कुछ पल कि ही तो बात है, 
मिलकर उन्हे सजाते है, 
सुख -दुःख मे जो साथ हो, 
वो ही तो दोस्त केहेलाते है, 

साथ जुडकर आगे बढ़नेको, 
अब हम तैयार है, 
विद्यार्थी हम और शिक्षक सभी, 
ये भी हमारा परिवार है, 

हम सब अपने है, 
तो डरने कि क्या बात है, 
रास्ते मे अगर थंड लगे, 
तो जलने वाले भी हजार है, 

रास्ते मे अगर थंड लगे, 
तो जलने वाले भी हजार है, 

             -अथर्व. ज. गोखले

©Atharva Jayant Gokhale #realization
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

पाऊस 

        नवा भाव मुरतो,                     
          श्रावण सरींत भिजतांना,
ओल्याचिंब मनात माझ्या, 
     रम्य निसर्ग फुलतो, 


रिमझिम पाऊस आम्हा, 
      काय भुरळ घालतो!
खरं मूल्य असलेला, 
    पैसा खोटा ठरतो, 


खोटा ठरला अंदाज, 
                कि मोठा अनर्थ घडतो, 
निःस्वार्थ कष्टाळू शेतकरी, 
              पुन्हा पुन्हा झिजतो,


रोज बरसणाऱ्या थेंबांमध्ये, 
        फारसा फरक नसतो, 
ती झाडी, अन त्या डोंगरावर, 
          नवा घाव असतो, 

ती झाडी, अन त्या डोंगरावर, 
         नवा घाव असतो, 

            -अथर्व. ज. गोखले 
             (यवतमाळ, महाराष्ट्र )
             (मो. नं -7558404903)

©Atharva Jayant Gokhale #bestfrnds
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

आयुष्यचं पान, 

ओल्याचिंब झोळीत टिकतंय, 
माझं आयुष्यचं पान, 
दिवसेंदिवस तरुण होतं, 
अन, अजुनचं  दिसतं छान, 

लांब -समांतर रेषांवरुनी, 
झटपट पुढे सरकायचं, 
सारं रान मोकळं असतांना, 
त्या कोपऱ्यातच का रमायचं? 

सुखाचा  वर्षाव होईल फार, 
दुःखाचा कधी येईल भार, 
रात्रीचा तो चंद्र बघावा, 
न मोजता तारे हजार, 

सारं जिवन जगून होईल, 
पानावरच्या काही ओळींत, 
भविष्यातही मला इथेच रहायचंय, 
याच ओल्याचिंब झोळीत, 

                  -अथर्व. ज. गोखले 
               (यवतमाळ, महाराष्ट्र )
          (मो. नं -7558404903)

©Atharva Jayant Gokhale #SunSet
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

बंध 

शब्द -अर्थाच्या  गुंतवणुकीची, 
नसावी कोणती खंत, 
हा दरवळणारा गंध, 
त्यास नको कोणते बंध, 

तप्त धर्तीवर तळमळतांना, 
बघणारे लोकं चार, 
ते नाटकातले अंध, 
त्यास नको कोणते बंध, 

सुख -सरींची वाट बघता, 
वाट वाटे अफाट सागर, 
काळाची ही गतीचं मंद, 
तिस नको कोणते बंध, 

संकुचिततेचे बंध सुटावे, 
मोकळं होईल जग सारं, 
आज आहे जे माझं, 
ते कधी होईल आपलं? 

                -अथर्व. ज. गोखले 
         (मो. नं -7558404903)
            (यवतमाळ, महाराष्ट्र )

©Atharva Jayant Gokhale #LostInSky
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

शीर्षक 

मत प्रवाहांचे वार झेलितो, 
प्रारंभाचा हा अंक,  
तीन अक्षरी संगम हा, 
नाव याच शीर्षक, 

शिराची जागा जपणारा, 
बोलका हा तर्क, 
शब्दांची साथ वगळता, 
पोरका तो अर्क, 

एकेरी ओळीत वसत, 
समृद्ध रान हे सारं, 
नाकारात्मकतेच्या शीर्षकाचं, 
बोलकं रूपं हे युद्ध, 

युद्ध घडतंय दूर, 
जळतंय मनं फार, 
माझा देश ठरतोय रक्षक, 
त्यास नको कोणतं शीर्षक, 

त्यास नको कोणतं शीर्षक, 

                 -अथर्व. ज. गोखले 
             (यवतमाळ, महाराष्ट्र )
          (मो. नं -7558404903)

©Atharva Jayant Gokhale #BookLife
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

लिहावं

स्थिर शांत मनात, 
दाट हिरव्यागर्द वनात, 
पटला जर भाव, 
तर क्षणात लिहून घ्यावं, 

वाचकांचे प्रश्न अनेक, 
उत्तर सोपं मांडावं, 
कोणी म्हणेल, `` व्वा ´´ !!
सुचलं तसं लिहावं, 

विषयाच्या मापाने नेहमी, 
अर्थाचं दान द्यावं, 
गोडवा असो वा कटूता, 
सर्व चवीनुसार असावं, 

दिव्याची वात पेटवून, 
अंधारात तेज पाहावं, 
दुःखाची गाथा संपवून, 
सुख आपणच लिहावं, 

                -अथर्व. ज. गोखले 
               (यवतमाळ, महाराष्ट्र )
         (मो. नं - 7558404903)

©Atharva Jayant Gokhale #hills
5fb13cf2ecc023e1860263baedae56cf

Atharva Jayant Gokhale

एक 


विझले अंक कितीही, 
तरीही दिसतो तोच एक, 
जीवनाची पंगत ही, 
मोहाचे पंख अनेक, 

निजले जग जरीही, 
उजळतो तोच एक, 
आज - उद्याची  रंगत ही, 
स्वप्नांचा भार अधिक, 

सरले संकट तरीही, 
सावध तोच एक, 
शांततेची दश रूपं, 
तिचे अर्थ अनेक, 

उरले क्षण काही, 
वसतो तोच एक, 
सुख -दुःखाची पैज ही, 
जिंकणार तुम्हीच एक, 

                - अथर्व. ज. गोखले 
             (यवतमाळ, महाराष्ट्र )
         (मो. नं -7558404903)

©Atharva Jayant Gokhale #Hope
loader
Home
Explore
Events
Notification
Profile