Nojoto: Largest Storytelling Platform
kiransuryawanshi5940
  • 79Stories
  • 8Followers
  • 682Love
    20Views

rayansh

Ray of hope

  • Popular
  • Latest
  • Video
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

तुझ्या जगण्यiतला
श्वास श्वासातला
घास हातातला
ओवाळुन टाकते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई
          
शब्द बोबड्या जिभेतला
थेंब ओघळता डोळ्यातला
नाठाळ हट्टiला
झेलून पुरविते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई
     
बंध रेशमातला
गुंफुण प्रेमातला
 जीव जिवाभावाला
धाग्यiत बांधते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई

©rayansh #rayofhope 

#RakshaBandhan2021
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

स्वातंत्र्यास्तव समर जाहलें
देह त्यागुनी अमर जाहलें
असें हुतात्मे माझ्या देशीं
ईथे जन्मणे धन्य जाहलें

हीच धन्यता सार्थ कराया
मनी अन मनगटी समर्थ व्हाया
छत्रपतींचा वारसा अन क्रांतीवीरांची थोरवी गाया
पुनःपुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास द्याया

मायभू म्हणोनी आजन्म पुज्यता
कर्मभू अनुकरणी भारतीय संहिता
देव मानुनी देह त्यागने तत्सम अस्मिता
लाघवी विश्वव्यापिनी वात्सल्य मुर्तता

तद विश्वरूपी नतमस्तक राहावे 
जमेल त्याला जमेल त्याने जमेल तितुके राष्ट्रार्थ करावे
हीच सदभावना अखंडीत अर्पित
"भारत माता की जय" नित्य उदघोषावें

#rayofhope #RashtraPratham #NationFirst #JAIHIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍🙌❤️

©rayansh #rayofhope 

#IndependenceDay
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

और कितनी दुरिया माऊली सहू मै
 तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै   ll

तू है कणकण मे, हर मन मे तूही
तेरा जयघोष मुख मे, सुनले अनकही
हरी नाम सुबह शाम, विठ्ठला हमराही
रुहदारियोसे चलता रहु, राह दुरिया जितनी भी
मेरी हर सiस, जिंदगी ए एहसास, मोहताज हू मै 
 तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै   ll

मिलने की आस लिए, संग चले संग रुके, की तेरी वारी
तुझ तक आते आते मन मंदिर हुवा, ये देह बना सवारी
तेरा अधिवास मन मे, मर्माभास अर्पण मे, जीवन है पंढरी
एक बारी दर्शन को तरसु, समा लू दिल मैं जिंदगी पुरी
हर सफ़र का अंजाम तुम हो, आगाज भी तुमसे चाहु मै
 तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै   ll

Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞
#rayofhope #वारी  #journeyoflife

©rayansh Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞
#rayofhope #वारी  #JourneyOfLife

Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞 #rayofhope #वारी #JourneyOfLife

6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

उंच उंच बावरलेलं मन
रोज इंच इंच सावरतय
ख नाही त्याच्या भाळी
क्षितिजा पाहुन गहिवरतय

पंख नसले तरी भरारी
जिद्दी मन आजमावतय
पडलो जरी कित्येकदा
उडण्याची आस नादावतय

ठाऊक आहे की मनाला
कुठवर त्याची झेप
"होऊन जाऊदे की", सांग स्वत:ला
अजुन एकदा झेपावण्याची खेप

खग सांगतील, रग मातीत रांगडया
तशी धडपड करत रांगायचय
थांबायच नाही गडया
इतकंच मनानं मनाला सांगायचय

©rayansh #rayofhope #Life #Nature #rain
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल
हम अनचाहा बोझ लेके मंडरा रहे है
टकरानेवाले बादलोकी आस लिये
चलो मिल जाए किसी हमसाये बादलसे
थोडा टकराना होगा
थोडा अंजान होके अपनाना होगा
फिर बरसना होगा साथ, एक बरसात बिनबादल
बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल

उमड आती है सब दिल की
कुछ सुख की कुछ दुख की
संचित का ही संचय है यादे खट्टी मिठी
दिल भर गया तो बस खाली करना है बाकी 
हवाए आतीजाती रहेंगी अनुरागसे झुलना
बादलोसा होगा दिल बैराग समझ बरसना
फिर श्वेत छबीसे हर अनुभव ले संभल
बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल

©rayansh #rayofhope #Life #clouds #rain ❤️
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

सुर्याचा अस्तोदय म्हणजे एक दिवसाची परिक्रमा
दिवस आला अन गेल्याची आठवण 
आणि साठवणीतला समा
चांगलं चांगलं सगळं साठवायचं
वाईट साईट घडलेलं क्षणात विसरायचं
आला क्षण गेला क्षण 
एवढंच काय ते जगायचं

सगळेच दिवस सारखे नसतील
काही अगदीच पोरके भासतील
ग्रहण सुध्दा येईल अवचित  
कधी सूर्य कधी चंद्रतारे रुसतील
तेही अंधाराचं सावट आपलंसं करायचं
एवढंच काय ते जगायचं

प्रत्येक उदयाला उभारीच असेल असं काही नाही
प्रत्येक अस्ताला दीप मालवतीलच असं काही नाही
असतील स्वयंप्रकाशी तारे आकाशगंगेत सुप्त काही
ज्यानं त्यानं आपला अस्तोउदय ठरवायचा 
हीच अस्तित्वाची ग्वाही
उगवत्या मावळत्या दोन्हीस नमन करायचं
एवढंच काय ते जगायचं

©rayansh
  #rayofhope #life #sunrise #sunset
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

"सगळं ठिके ना?"

आजकाल संवाद कमी पडत चाललाय
शब्द माणसांच्या कपडयाप्रमाणें तोकडे व्हायला लागलेत
चेहरयावरचे हावभाव खुप काही बोलुन जायचे
आता चेहरे blank झालेत आणि 
मोबाईल Emoji'sनी Fulllll व्हायला लागलेत
चला मान्य जिभेलाही शब्द वळनी पडणार नाही
पण हे तीन Magic Words बोलायला
 NetPack इतके पैसे पडणार नाही
तुम्ही फक्त म्हणा
"सगळं ठिके ना?"

 Best नसेल कुणाचच या घडीला
Smart Watch असुन का वेळ लागतोय EmoSmart व्हायला
तुमचा एक Q? पण पुरेसा आहे Smit Talk चा Queue दयायला
बोटांवर नाचणारया शब्दांचा Smooth Talk नको T.P. वाला
चला मान्य TECHNOSAVY NEXT GEN ला
 कसं काय, बरंय का? हा असा Chat चालणार नाही
GM GN Waassupp TTYL शिवाय 
कुणी कुणाशी बोलणार नाही
But still try तुम्ही फक्त म्हणा
"सगळं ठिके ना?"

एक विचारपुस हवी माणसाला माणसाची
दोन क्षण हवेत खात्री माणूसकी असल्याची
तीन शब्द हवेत "सगळं ठिके ना?" आपुलकी संवादाची
चार खांदे हवेत निश्चिंतता चितेवर जाण्याच्या प्रवासाची
पाच खायला, पाचावर धारण बसेल तेव्हा 
शपथ उरल्यासुरल्या मैत्रीची
हया पंचसुत्रीनं सहानुभूती नकोय 
पण भूतदया काय असते हे तरी कळेल ना
म्हणून तरी तुम्ही फक्त म्हणा
"सगळं ठिके ना?"

©rayansh #rayofhope #HUmanity #Life #alliswell 

#CalmingNature
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

तो चहा आठवतो मला एकटा
पावसाचे घोट घेणारा
अहहाहा म्हणत, थरथरणारा ओठ, ओठात दाबणारा
गोडवा नक्की कुणाचा, कोण चाखणारा
मला चहा अन चहाला पाऊस झिंग चढवणारा
गारव्यातली ऊब, वाफाळलेला चहा आसावतो उत्कंठा
तो चहा आठवतो मला एकटा....

आजतागायत एकच प्याला आजमावला
दुसरा हात येऊन तोही भांबावला
चहा मात्र तसाच कपात, लाटेसम उसळला
विसरला नाही तोेही त्या उसळत्या लाटा,
 काही कपातल्या, काही अंतरातल्या
एकटाच जरी असला आज, वाफाळुन गंधाळला 
पावसातले शहारे, थंडीतली कंपणे,
 कडक उन्हात सुद्धा तोच साक्षी होता
तो चहा आठवतो मला एकटा ....

अजुनही आहेत कपावर आठवणींचे व्रण
ह्रदयातील व्रण अज्ञेय, तेच साठवणीतले मौलिक क्षण
जाणता अजाणता जखमाच होत गेल्या गहन,
 प्रत्येक प्याल्यागणिक 
धपल्या काढुन राहिलेले व्रण मात्र जाणतात, 
चहा अन तू अमृतासम राजसिक
हर एक निशाणी, एक एक आठवणी पुन्हापुन्हा पाहता
तो चहा आठवतो मला एकटा ...

#rayofhope #TeaDay #चहा #पाऊस #naturelovers

©rayansh #rayofhope #Tea chaha paus #life #Nature
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

*साहेब*

साहेब तुमचं घर भरलंय
गरिबाच आता फक्त घरच उरलंय
तुमचं काही संपता संपेना 
नाकीनऊ आलंय गरिबांच्या, पुरता पुरेना
तुमच्या दहा पिढ्या खातील ओ, एवढं साचवलंय
गरिबांच्या आहे त्या पिढीला डाएट का काय ते, उपवास करायचं शिकवलंय
तुमच्या घरात, अंगणात करताय स्वछंद विहार
गरिबांच्या खुराड्यात पसरता येईना म्हणून होतोय पसार
AC फॅन कूलर किती सुखसोयींमध्ये साहेबांचं जगणं
गरिबांच्या वाट्याला तप्त भूमी, संतप्त भानू आणि रोजचं तेच जगणं
साहेबांना फुल परवानगी, फिरायला कार आणि बिनकामी पगार
इथं सामान्यांची कायमची रवानगी (from job)
 मोकाट वारी (for job) आणि बिनपगारी बेकार (being jobless)
साहेबांची झोळी अहा तिजोरी, ओव्हरफ्लो तरी चालूच आय (income)
गरिबांच्या झोळ्या फाटक्या, ठिगळं लावुन तरी काय फायदा, येणी काहीच नाय
साहेब तुमच्या पोटाचा घेर, सगळं काही सांगतो 
गरिबांच्या पोटाची खळगी, हाडांनी भरलेली, कशीबशी दडवितो 
साहेब तुम्हाला पगार, भत्ता, पेन्शन किती ऐशोराम 
गरीब-मजूर बेजार, त्यात नियतीचा रट्टा, उद्याचं टेन्शन, 'मिळेल का हाताला काम?'
साहेब तुमच्या शुभ्र कपडयांची रोजच दिसतीय चमक
गरिबाला जाळीदार बनियान, आलटून पालटून बदलायला 
दोन चड्ड्या, अंग लपवायची तगमग
साहेब तुमचा पगार ६ आकडी, भत्ता आणि पेन्शन ५ आकडी, 
वर अवास्तव खर्च करणारी सरकारी तिजोरी
गरीब, मजूर, नोकरदार, हातावर पोट असणाऱ्यांनी,
 मिडल क्लासवाल्यांनी कितीही कमाई केली तरी ती तोकडी
साहेब निवडणुकीच्या वेळेला तुमच्या संपत्तीचा वरवर कळतो आकडा 
गरीबाच मत आमचं, एखादी नोट, एखादी भेट
 फक्त तेव्हाच मिळते, आता मिळेना भाकरतुकडा
उमेदवारीच्या फॉर्मात ह्यांची, कोटींच्या कोटी उड्डाणे
'गरज सरो वैद्य मरो', असंच, गरिबांच्या आशा अपेक्षांना पायदळी तुडविणे
साहेब, अहो समुद्रच की तुमचा, किमान तळ्याएवढं,
 अअा निदान डबक्याएवढं मन करा
गरिबाला नको नदी ना तळं, फक्त ओंजळ तेवढी पुरेपूर भरा
नावाचे "साहेब" नको गरिबाला, कर्माने *साहेब* आहात करा आता सिद्ध 
श्रीमंत गरीब अशी लईच मोठी अर्थाची दरी आहे,
 ती कमी झाली तर खऱ्या अर्थानं, देश होईल समृद्ध
साहेब बरंच काही बोललोय तरी बर्रररचं काही राहिलंय,
तरी बरंय गरिबांचं हाल, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहिलंय
सहानुभूती नको साहेब मदतीचा हात दया 
निष्पक्ष, निस्वार्थ सेवेनं प्रत्येक समस्येला मात दया

©rayansh #rayofhope #Life #poor #Nojoto 

#Politics
6856210ff5ebc50e8b6cd6c42d8773ac

rayansh

कार्य किती मोठे आहे ठाऊक होते खारुटीला
तिने तिचा वाटा अगदी निरागसपणे उचलला
भक्ती शक्ती संगमाने रामसेतु घडविला
लहानथोर सारयाच हातांनी महासागर दडविला
अखंड यत्नाना रुखू न शकल्या लाटा
आज ही ध्यानीमनी इवल्याशा *खारुटीचा वाटा*

सद्यस्थितीत कोरोना महासुरानं श्वास धरलाय वेठीला
तरीही श्वासाला श्वास, हाताला हात देतं,
 माणसानं जगवलंय माणुसकीला
कुणी अन्नपूर्णा, कुणी आधारवड, कुणी कोवळं 
पिंपळपान तर कुणी कडवे सेवेकरी, प्रणाम हर एक योध्याला 
अन्नपूर्णा ती पोटाची भूक क्षमवेल,
 चिमुकल्यानं "खुश रहा" या प्रेमसंदेशानं क्षमविलं अंतर्मनाला
त्याच्या स्मितहास्यानं दुखरं काळीज रमेल काही क्षण, 
क्षणभराचा आडोसा दुखाला
विसर नाही पडणार पण सुखावणारी फूंकर
 नक्कीच भासेल धास्तावल्या जिवाला
अशा भाबडया यत्नांचे स्फुरण थोपवतील कोरोनाच्या लाटा
जिव्हाळयाचे दोन शब्द "खुश रहा" आणि एक स्मित  😍
  त्याचाही अनोखा *खारुटीचा वाटा*

©rayansh #rayofhope #Life #IndiaFightsCorona
loader
Home
Explore
Events
Notification
Profile