Nojoto: Largest Storytelling Platform
sachinvalanju3253
  • 18Stories
  • 1.4KFollowers
  • 752Love
    1.5LacViews

Sachin Valanju

Marathi theatre Actor..

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

एकटेपणा 😢 #marathiquotes #philosophy #truthoflife #marathikavita #breakup 

#Emotional
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

व्यक्त होण केव्हाही चांगलच मित्रा
जसा तिच्या पोस्ट वर व्यक्त होतोस
तसा मित्राच्या एका पोस्ट वर व्यक्त हो..
एकंदरीत काय तर समतोल साध...
भावनेच्या भरात भरभरून लिहून 
होतोस निःशब्द तिच्या एका पोस्ट साठी
तसाच भरभरून व्यक्त हो
मित्राच्या एका कलाकृती साठी..
पण खर सांगु, निःशब्द होण्यासाठी
काहीतरी घडल पाहिजे आतून
तस घडतं का..? मुळात हाच प्रश्न 
घडत फक्त तुझ्या एका बाजूने.. 
दुसर्‍या बाजूला त्याची फक्त कीव असते
तिच्यावर बरसणार्‍या निरर्थक कमेन्टसची... 
अश्याने काय साध्य करशील
तीच प्रेम की तुझ्या मनाची समजूत
पण खर सांगु तुला..
ही अशी चुतीयागीरी करण्यापेक्षा 
( ही विद्रोहाची भाषा बर का..)
उचल तुझी लेखणी
आणि भरभरून लिही काहीतरी
जे असेल कमाल आणि निःशब्द ही...

-सचिन वळंजु व्यक्त ❤️#marathiquotes #marathikavita #prem #philosophy #truth #life #lifequotes #sachinvalanjuquotes #sadquotespage #alone
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

बाप❤️

#Flute #baap #marathikavita #marathiquotes #prem #alone #FathersDay
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

बाप कुठे असतो....
घेत असलेल्या श्वासात बाप असतो
लिहायला वाचायला शिकवणार्‍या
 प्रत्येक अक्षरात बाप असतो..
शाळेच्या भरलेल्या प्रवेश फी मध्ये बाप असतो...
पाठीवरील दप्तरात बाप असतो..
कर्जासाठी पसरलेल्या हातात बाप असतो...
वर्षानुवर्ष वापरून झिजलेल्या चपलेत बाप असतो..
शर्टाच्या फाटलेल्या खिशात बाप असतो..
पोरीला सासरी पाठवताना 
भरलेल्या डोळ्यात बाप असतो..
घरीच दाढी करणार्‍या साबणात बाप असतो..
ऊन पावसापासून वाचवणार्‍या छपरात बाप असतो..
दगड फोडणाऱ्या कणखर हातात बाप असतो..
रस्त्यावरची घाण साफ करणार्‍या झाडुत बाप असतो..
गटारात उतरण्याआधी घेतलेल्या 
दारूच्या घोटात बाप असतो...
गिळणार्‍या प्रत्येक घासात बाप असतो..
चार पैसे अधिक मिळावे म्हणून 
केलेल्या ओव्हर टाइम मध्ये बाप असतो..
मोलमजुरी करून खंगलेल्या शरीरात बाप असतो..
मेल्यानंतर रिकाम्या घरात 
जाणवणार्‍या भासात बाप असतो...
बापानंतर घराची जबाबदारी घेणार्‍या 
प्रत्येक आई, भाऊ आणि बहिणीत बाप असतो..

-सचिन वळंजु #FathersDay #baap
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

#Flute #elephant #MarathiKavita
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

शाळेच्या गेटवर येताच
आवाज आला....
आलास बाळा ये...
ओळखल की नाहीस..
कसा ओळखणार.
सातवी पास झाल्यानंतर गेलास
तो आता येतोयस
ते ही क्वारंटाईनच्या निमित्ताने...
सुट्टीच्या दिवसात कित्येक वेळा गावात आलास
पण एकदाही नाही वाटलं का रे
की मला येवून भेटाव, वर्गात बसावं
आता गावातल्या घरात कोणी ठेवत नाही म्हटल्यावर
माझी आठवण झाली...
पण खर सांगु...
कोरोना आलाय पण सगळ भकास झालय रे
वर्गातील बडबड, गोंधळ सगळ शांत झालाय..
प्रार्थना, कविता, धडे सगळ मूक झालय
फळा ही कोरा झालाय
एकटक बघत असतो वर्गातल्या बाकांकडे
मैदानातील दगड, माती निपचित पडून आहेत
टाकीचा नळ ही कोरडा पडलाय..
एखादा जुना वाडा असतो तशीच अवस्था झालीय
घुसमट होतेय रे माझी...
निर्जीव असले म्हणून काय झाल
कित्येक जीव घडवले आहेत मी..
आता तू ही पंधरा दिवस राहून जाशील
पण जायच्या आधी एक कर..
या पंधरा दिवसात 
मागील पंधरा वर्षाच आयुष्य जगून जा..
वर्गातला फळा रंगव,
मातीत खेळ, लहान मुलासारखा बेभान हो
भिंतीवरून मायेचा हात फिरव,
झाडावर चढ, फांदीवर झोके घे
वाटलच तर मुतारीच्या भिंतीवर 
वर्गातल्या आवडणार्‍या मुलीच नाव कोर..
बाकावर बस आणि आठव सगळया शिक्षकांना..
मिळालाच एखादा खडू
तर तो हळूच बॅग मध्ये टाक
शाळेच्या स्टेज वर जाऊन एखादा नाच कर
आणि हो.. आठवत असेल तर
एखादी प्रार्थनाही म्हण... #darkness #School #memories
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

माय...
चुकलच तुझ..
तू नको यायला हव होतस
तुझ भरलेल रान सोडून...
अग, गर्भाला पोटातच मारणारी
नीच जमात आमची
तिथ तुझ्यासारख्या मुक्या जनावराला
कस सोडतील.....?
सत्ताधाऱ्यांसारख तुलाही लालच देवून
स्फोटाने भरलेले अननस चारलेच की
तू ही आम्हा सामान्य माणसांसारखीच
भुकेसाठी बळी पडलीस...
पण तू माणूस नाही ना
की पेटून उठशील आणि बंड करशील
वाटलच तर चार डोकी गोळा करून
 दंगल करशील....
तू मात्र निश्चल, शांतपणे चालत राहिलीस
पाण्याच्या घोटासाठी...
ना कोणाला त्रास, ना कसली इजा
पोटातल्या गर्भाला घेऊन गाठलास नदीचा तळ ...
पण तुझ चुकलच, 
राणी लक्ष्मी सारख गर्भाला सोबत घेवून 
लढायला हव होतस... 
माणसाच्या नीच जमातीला, त्याच्या क्रुरतेला
पायी तुडवायला हव होतस... 
पण तू मूक जनावर ना ग.. 
तुझी भाषा कळली असती तर आज 
तुझ्या गर्भाची नाळ पेटून उठली असती... 
माफ कर माय........ 

-sachin valanju माय... माफ कर.. 
#elephant #justice #MarathiKavita #Poetry #Truth #philosophy
6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

अच्छा हुआ
 लॉकडाऊन का बहाना मिला
वरना फुरसत ही कहा थी
मुझसे मिलने की....

          - Sachin valanju #waiting #sadquotes #lovequotes #selflove #sadquotes #alonebuthappy #prem
loader
Home
Explore
Events
Notification
Profile