Nojoto: Largest Storytelling Platform
viratpatil7021
  • 40Stories
  • 6Followers
  • 484Love
    0Views

शब्दवेडा किशोर

  • Popular
  • Latest
  • Video
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White अभ्यासाचा शेवट..
शब्दवेडा किशोर 
शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित होतो
Answers लिहिताना party चं planning करत होतो
Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं सांगितलं 
अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं    ||१||
घड्याळाचे काटे उलटे फिरले College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले
कसे हे दिवस भराभर निघून गेले काहीच नाही कधी कळलं
सगळं नकळत घडलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||२||
उद्यापासून Lectures व attendance ची कटकट नसणार होती
पण lectures bunk करून picture बघण्याची मजाही काही औरच होती
त्या दिवशी मात्र १००% attendance पाहून सरांना सुद्धा नवल वाटलं
आता सगळं संपलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं  ||३||
मित्रांसोबत केलेली मजा व त्या तासंतास केलेल्या गप्पा आठवतात party ची केलेली plannings
आणि bike वरच्या ट्रिप्स आठवतात आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगवेगळं 
यार....आपलं College Life संपलं..उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे
अन् Office मध्ये जाऊन सगळेच काम करणार आहेत
Casual जीवन संपून आता Formal जीवन सुरु झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं                ||४||
उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं लागणार खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च
करावा लागणार महिन्याच्या पगाराचं Saving आता सुरु झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं                      ||५||
आता ते presentations आणि assignments नसणार
ग्रुप प्रोजेक्टच्या नावाखाली केलेली भटकंती नसणार Important Notes चं 
गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं miss u my lovely XEROX Machine..हेच आता नशिबी आलं..
अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं           ||६||
बघता बघता दिवस निघून गेले...
काहीच नाही कळलं गेल्या महिन्यातच Admission झालं जणू
असंच मला तेव्हा वाटलं
चांगलं वाईट असं सगळं काही मी अनुभवलं
का लवकर मोठे झालो आणि आता
जबाबदारी हाताळायचं ते जिणं नशिबी आलं..
अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं ||७||
जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार होती
नव्या कोऱ्या पाटीवर आता कर्तबगारी कोरायची होती
यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं
अन् जे नको होतं तेचं झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं    ||८||
या सगळ्या विचारांनी डोळ्यात आपसूक पाणी आलं
पेपर उडून गेला आणि हातातलं पेनही गळून पडलं
वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं
थोडा Extra Time मिळेल का ??
कारण
नियतीने एक अघटीत घडवलं..अन् मला कळलं..अरे आपलं
College Life तर आता संपलं                ||९||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White दोन लाकडं ठेऊन जा..
शब्दवेडा किशोर
मी सरणावर असतानाही त्या मेलेल्या मनास हळव्या
जरासा धीर देऊन जा
कुणी काही म्हणो एकदा माझ्याकडे येऊन जा
वाटेल तुलाही अवघड मला अचानक पाहुन गं 
सखे शेवटची एक इच्छा आहे मनी माझ्या
रचलेल्या माझ्या त्या सरणावर दोन लाकडं ठेवून जा

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White मी एक शापित जोकर..नाव माझे शब्दवेडा किशोर
शब्दवेडा किशोर 
मी एक शापित जोकर..नाव माझे शब्दवेडा किशोर
भावनांची विक्री करायला मज जमलं असतं तर
मीही पैशाच्या जगात स्वतःला खेळवलं असतं 
असे छक्के पंजे नाही जमलं म्हणून तर
शापित जीणं उराशी निखाऱ्यागत धरून जगतोच आहे मी
त्या निखाऱ्याला जर बाजूला फेकलं असतं
अन् जन्माने मिळालेल्या स्वभावाच्या विरुद्ध
स्वतःला वळवलं असतं तर
केव्हाच श्रीमंताच्या लिस्टला माझं सुद्धा
नाव लिहिलं गेलेलं असतं

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White *काय असतो हा बलात्कार..??*
शब्दवेडा किशोर 
घरचा अभ्यास पूर्ण करूनच मी खाली खेळायला
गेले सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय हे गाणं न चुकता म्हणून दाखवल्याने आई तू आज मला बक्षिसही दिले
मी अन् सायली दिवाळीसाठी किल्ले बनवत होतो आमचे कपडे हात आणि छोटंस नाकही मातीने भरवत होतो तेवढ्यातसंजय काका तेथे आले व हसतच मला म्हणाले..काय बर चाललंय ?मी म्हणाले काका किल्ले बनवतोय माझ्यासहित तुमच्या सायलीचे पण अंग चिखलानेच मळलंय ते म्हणाले सायलीला की सायली तू थांब..तू चॉकलेट खाल्लंस आता मी छकुलीला देतो अन् चॉकलेट बरोबर तिला किल्ल्यासाठी छान छान मातीचे सैनिक पण देतो
असं म्हणून मला घरी घेवून गेले आणि मी घरात शिरल्यावर पटकन दारही बंद केले मी चॉकलेट खाण्यात गुंग असताना माझ्या छाती-पाठी वरून ते हात फिरवत होते मी म्हणाले काका चॉकलेट संपलं काका आता मी घरी जाते पण तुला नवीन ड्रेस देतो म्हणून माझ्या अंगावरचे कपडेही काढले अन् अचानक माझे तोंड दाबून मला जमिनीवरही पाडले......आई तू आणि बाबा गालावरच पापा घ्यायचे पण काका संपूर्ण अंगावर घेत होते त्यांच्या शरीराचा दाब माझ्या अंगावर पडल्याने माझे पोटही दुखत होते काका अहो काका सोडा ना मला म्हणून मी खुप रडत होते गप्प बस नाही तर मारेन म्हणून ते माझ्यावरंच ओरडत होते......अचानक झालेल्या वेदना सहन झाल्या नाहीत तेव्हा मला आई तुझीच आठवण येत होती अन् आता आई त्यांचा प्रतिकार करण्याची माझी ताकदही संपली होती अचानक मग संजय काकांनी माझ्या नाका-तोंडावर उशी दाबली आई सर्दी घ्यायला कसा त्रास होतो तसच वाटत होत गं घरातल्या भिंतही पंख्यासारख्या माझ्या डोळ्याभोवती फिरत होती शेवटी मी उशीच्या आतंच हंबरडा फोडला आणि तुझाच चेहरा डोळ्यांसमोर ठेवून शेवटचा श्वास सोडला आई संजय काकांनी असं का केलं ग..?? मी तर त्यांच्या सायलीचे फटाकेही नाही घेतले..तिच्या वाटेचे चॉकलेटही नाही खाल्ले मग का बरं ते माझ्याबरोबर असं विचित्र वागले 
आठवतंय का तुला आई एकदा कढईतल्या गरम तेलाचा थेंब माझ्या हातावर पडला होता तेव्हा तूही माझ्या बरोबर रडली होतीपण आज तर माझं संपूर्ण शरीरंच जळालं पण तू माझी हाकसुद्धा नाही ऐकलीस आता आई दोन दिवस झाले तू आणि बाबा,संत्या मामा,रज्जु ताई,आजीआजोबा सगळे-सगळे रडताये मी तुम्हाला हाक मारतेय पण तुम्ही लक्ष्यच देत नाहीये गं आई बर्थ-डेला तू माझ्या गळ्यात हार घालायचीस पण आजvमाझ्या फोटोला तो चंदनफुलाचा हार का घातला आहेस गं..?आज तर माझा बर्थ-डे ही नाही व सगळेजण तुला म्हणतात तुमची मुलगी देवाघरी गेली पण आई देवाघरी जायला संजय काकांसारख्यांच्या वेदना सहन कराव्या लागतात का गं आई मी तुला कधीपासून ओरडून-ओरडून सांगतेय पण तू काही ऐकतच नाहीस फक्त रडत बसलीयेस आता माझा घसा पण सुखलाय मला थोडं पाणी देशील का गं ग्लासात नको माझ्या waterbag मध्येच दे......आई आता मी तुझ्याकडे येऊ शकत नाही पण माझी सगळी खेळणी सायलीला दे आणि हो तिला सांग संजय काका म्हणजे तिच्या पप्पांकडून चॉकलेट नको घेवू हं..नाहीतर ते तिला पण दुखवतील आणि उशीने तोंड दाबून देवाघरी पाठवतील आई शेजारच्या काकू बघ ना,
आप-आपसात बोलत असतात याच बाईच्या मुलीवर "बलात्कार" झालाय
सांग ना ग आई..काय असतो हा बलात्कार..??

©शब्दवेडा किशोर #sad_shayari
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White एकवेळ शरीर थकलं तर
त्याला सावरता येतं...
पण
मन थकलं की मग
सगळ्याच वाटा बंद 
होऊन जातात.
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्याशर्यतीत
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

आज जिंदा हूँ कल गुजर जाऊंगा
कौन जाने कब मैं सबसे बिछड़ जाऊंगा
नाराज ना होना मेरी शरारतों से ऐ मेरे दोस्तों
ये वो पल हैं ज्यों कल
तुम्हें बहुत ज्यादा याद आएगा
शब्दभेदी किशोर

©शब्दवेडा किशोर #samay
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White भेद
शब्दवेडा किशोर 
नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा
तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१||
तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला 
पेशी एक एक असे नियमात बांधलेला  ||२||
त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक 
तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक  ||३||
मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे 
तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने  ||४||
त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ 
शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ   ||५||
रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव
तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव    ||६||

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White भेद
शब्दवेडा किशोर 
नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा
तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१||
तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला 
पेशी एक एक असे नियमात बांधलेला  ||२||
त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक 
तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक  ||३||
मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे 
तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने  ||४||
त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ 
शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ   ||५||
रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव
तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव ||६||

©शब्दवेडा किशोर #love_shayari
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #अमर प्रेम
शब्दवेडा किशोर 
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..त्याचं जरा जास्तच..तिच्यासाठी काय करु- काय नको असं त्याला झालेलं..पण त्याचा खिसा कायम फाटलेला..बिचारा..पण भलताच रोमॅटीक..तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला वाटायचं पण द्यायचं काय ? कारण फाटका खिसा..शेवटी न राहवून त्याने तिला रंगीत कागदी फुलं वाढदिवसाला गिफ्ट केली..ती खुश होती..पण जास्त नाही. तशीही तिची त्याच्याकडुन फार मोठी अपेक्षा नव्हती.तो जे देत होता त्यात ती समाधानी नसतानाही समाधान मानत होती.तो सामान्य घरातलाच..जेमतेम नोकरी..भविष्यात काही करुन दाखवेल असं काहीही त्याच्यात तिला दिसत नव्हतं पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते..तिच्यापेक्षा तो जरा जास्त.. मात्र एक दिवस सगळा नुरच पलटला..तो तिला म्हणाला,"तुझ्याबरोबर आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडत कुढत जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..?सारं काय आहे तुझ्याकडे..पण तरी माझ्याबाबत सतत दुजाभाव वाटतो मला तुझ्या वागण्यातून ? त्यापेक्षा मी परदेशी जातो..पुन्हा कधी परतणार नाही..मला असं वाटतं तु मला विसरुन पुढे जावं..आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा-तुझा संबंध इथंच संपला."तो कायम निघुन गेला व ही जराशीच मोडून पडली..जणु सर्व काही संपले तिच्यासाठी..दिवस सरले व तिच्या मनातली दु:खाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..तिने ठरवलं..त्याने पैशासाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पैसे कमवुन दाखवायचे..इतके की आपल्या पुढे सारं जग त्याला थिटं दिसलं पाहीजे.पुढे या जिद्दीने पेटली ती व झोकुन दिलं स्वतःला..कष्ट केले..मित्रांनी मदत केली.अनेक चांगले वांगले लोक भेटले व तीचे दिवस पलटून ती खुप श्रीमत झाली..स्वतःची कंपनी, पैसा,नोकरचाकर,गाड्या,मान सर्व कमवलं.विरहाच्या आगीतुन व प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन ती बाहेर पडून जगण्यासाठी धडपडली व यशस्वीही झाली..पण तरी तिच्या मनात चुटपुट कायमच होती..तो सोडुन गेल्याची..त्यानं नकारल्याची व आपल्या अविचारी वागण्याची तसेच साधेपणा व गरीबीचा अपमान केल्याची..त्याच्यावरच्या प्रेमाची जागा कधीच तिरस्काराने घेतली होती.एक दिवस ती तिच्या आलिशान गाडीतुन जात असताना बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.गाडीच्या काचेतुन बाहेर पाहते तर म्हातारं जोडपं एकाच छत्रीत भिजत उभं होतं.भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.तीने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं तर ते त्याचेच आई-वडील निघाले.तीने गाडी थांबवून त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं तीला वाटत होतं पण लगेच मनातली सुडाची आग जागी झाली.त्यांनी आपली श्रींमती पाहावी..त्यांनी आपली गाडी पाहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकानं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं तीला मनोमन वाटतं होतं.त्याला धडा शिकवण्याच्या,अपमानाच्या घावांची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे तीला जाणवलं.ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहिले तसं ही सुद्धा गाडीतुन उतरुन त्यांच्यामागे गेली व तिथं जे काही पाहिलं त्यामुळं पूर्ण कोसळली..त्याचाच फोटो..तसाच हसरा चेहरा..कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली व तिने नकारलेली कागदांची फुलंसुद्धा तशीच..ही सुन्न झाली व धावतच कबरीकडे गेली.त्याच्या आईबाबांना विचारलं "काय झालं ते सांगा.." ते म्हणाले,"तो परदेशी कधीच गेला नाही.त्याला डॉक्टर लोकांच्या चुकीच्या उपचारामुळे कर्करोग झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते त्याच्या हातात..आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देऊन तो गेला..तू संतापुन उभी राहशील..यावर त्याचा विश्वास होता..म्हणुन त्यानं तुला सोडुन जाण्याचा नाटक केलं आणि तो दुसऱ्यासोबत पैसा व इतर गोष्टी भेटल्या म्हणून निघून गेल्याचं चित्र तुझ्यासमोर त्यानेच तर उभं केलं..आज त्याचं वर्षश्राद्ध.. म्हणून आम्ही इथं आलो".

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #मी..
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी 
इतरांना रित्या ओंजळीने
सदा सुखं वाटली 
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी 
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमौजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी

©शब्दवेडा किशोर #मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile