Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5571782748
  • 165Stories
  • 224Followers
  • 1.1KLove
    5.7KViews

निशब्द देव

तिरे लिए जाना ये भी कर सकता हूँ तिरे लिए तुझे छोड कर जा सकता हूँ देव

  • Popular
  • Latest
  • Video
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि या प्रेमावर फक्त माझा हक्क आहे .. तुझा ही नाही.. माझी ही एक सुंदर भावना आहे ,आणि ती माझीच राहावी हीच माझी इच्छा. तुझा होकार/नकार हे सर्व त्या भावनेसमोर गौण आहे
बस बाकी काही नाही

©निशब्द देव #betrayal
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

#Strings
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

बारीश

#ShamBhiKoi

बारीश #ShamBhiKoi

7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

तुमची समजूत काढणारा खरंच बोलत असेल
असे गृहीत धरू नका.
तुम्हाला समजवून कसे सांगायचे हे त्याला
कळलेले असते .
आणि समजवून कसे सांगायचे, हे ज्याला कळते,
तो तुम्हाला कुठलीही खोटी गोष्ट खरी म्हणून
पटवून देऊ शकतो.
इतकंच 
बस बाकी काही नाही
नि:शब्द देव #feather
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

जेंव्हा कुणी व्यक्ती नात्यांवर आणि 
नात्यातील बारकाव्यांवर ,
अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण 
भाष्य करायला लागते.

तेंव्हा समजून जायचे की ती व्यक्ती
 स्वतःच्या आयुष्यातफार निराश आहे.
आणि ती निराशा  मिटवायला
ती व्यक्ती स्वतःचे तुटलेले स्वप्न
दुसर्यांनीही पाहावे, आणि ते दुःख अनुभवावे
या प्रयत्नात नकळत स्वतःला गुंतवते

त्या व्यक्तीला समजून घ्या, 
पण त्या व्यक्तीने दिलेले स्वप्न पाहू नका
ते तुटेलेले होते, आणि तुटेल म्हणूनच दिलेले असते
इतकच
बस बाकी काही नाही
नि:शब्द देव #leftalone
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

सुख किंवा दुःख 
खरेतर यांचं आयुष्य एका क्षणात संपतं.
त्यानंतर नवीन येणार क्षण,
 हा कोराकरकरित असतो.

आपण मात्र, नवीन येणाऱ्या प्रत्येक क्षणात,
त्या सुखाचे किंवा दुःखाचे शव उचलून फिरत बसतो.
आयुष्यभर  हेच ....

येणारा प्रत्येक क्षण हा संपतोच,आणि त्या सोबत
घडलेल्या गोष्टीही...

गोष्टी संपवायच्या की आपले आयुष्य आपल्या हातात
नि:शब्द देव #shadesoflife
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

वाईट याचं वाटत नसतं की,
 आपली काळजी घेणारं आपल्याकडे कुणी नाही.

वाईट याचं वाटत असतं, की
ज्या व्यक्तीने आपली काळजी घ्यावी,
असे आपल्याला वाटत असतं,
ती व्यक्ती मुळात आपली काळजी घेत नसते.

आपण उगीच एकटे पडल्याचा आव आणत बसतो
इतकंच 
बस बाकी काही नाही
नि:शब्द देव #LookingDeep
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

प्रेम म्हणजे त्याग. हे एक फसवं वाक्य आहे. त्याग करणे ही भावना कुणा एकाला मोठं आणि एकाला छोटं करणारी असते..
आणि प्रेमात मोठं छोटं नसतं..
प्रेमात त्याग नसावा, प्रेमात प्रेम असावं.
 इतकंच
बस बाकी काही नाही
नि:शब्द देव #sunlight
7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

ज्या व्यक्तीचं ,
 तुमच्या आयुष्यात असणे ,
तुम्ही सहन करू शकला नाहीत.
 नेमकं त्याच व्यक्तीचं नसणं,
 खूप त्रासदायक ठरतं .

कुणाची आठवण येण्याचं हेच ते कारण.
इतकंच ,
बस बाकी काही नाही 
नि:शब्द देव #alonesoul
loader
Home
Explore
Events
Notification
Profile