Nojoto: Largest Storytelling Platform
ramdasnarwade3954
  • 29Stories
  • 30Followers
  • 222Love
    21Views

Ramdas Narwade

  • Popular
  • Latest
  • Video
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

गुढी

फुल तोरण बांधून घरा-दारावरती
आनंदाची गुढी उंच उभारू आकाशझेपी
सजवू तिला घालून सुंदर रेशीम साडी
नववार्षाची करू सुरवात वाटून गोड गाठी 
स्नेहबंधात येइल अनोखी लाडी-गोडी 

ब्राम्हदेवाने निर्मिले विश्व याचदिनी 
चौदा वर्ष वनवासानंतर श्रीराम राजें जाहले याचदिनी
शालिवाहन शकाचा प्रारंभ याचदिनी 
वसंत ऋतूही पल्लावेल नवीन पर्णाकूर वृक्षावर आजपासूनी 
साडेतीन मुहूर्तापैकी एक, सुख द्विगुणित करू या सणी

®रामदास नरवाडे

©Ramdas Narwade #Gudi_Padwa #MarathiKavita #marathi #celebration #maharashtra #India
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

होळी 

होलिकेच्या क्रूर हेतुत दहन झाले 
तिच्यासह ब्रह्मदेवाचे पावन वरदान 
श्रीविष्णूच्या मनोभावे भक्तीत 
भक्त प्रल्हादाला मिळाले पुन्हा एकदा जीवदान 
ना धरती ना आकाश ना पशु ना देवमानव 
अजब ते हिरण्यकक्षापाचे मरणासाठीचे प्रावधान 
पण गर्व आणि पापकर्मात 
नर्सिंम्हाने केले तयाचे नरसंहार 

या प्रसंगाने सुरु झाली 
होलिका दहणाची प्रथा 
सांगण्या सत्याचा अंतिम विजय 
आणि सत्कर्माची होईल सदैव पूजा 

गर्व आणि क्रूरतेची 
तिरस्कार आणि आपसी द्वेषाची 
अधर्म असत्य आणि अनिष्ठ प्रथाची 
चला पेटऊया आज ही होळी 
सप्त रंगात हसी ख़ुशी नाहुनी 
प्रेमात खेळूया ही आनंदी धुली

©Ramdas Narwade #Happy_holi #Holi #India #Culture #festival #celibration #marathi #kavita #holi2022
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

जननी

आई स्वरूपात प्रथम मातृत्वाचे देवदर्शन झाले
आजी च्या स्वरूपात स्त्रीत्वाचे महानपण कळाले
बहिणीच्या रूपात ही तेच प्रांजळ प्रेम मिळाले
तर मैत्रिणीच्या रूपात पूर्णत्वाचे स्नेहबंध जुळाले

पत्नी स्वरूपात जीवनाची झाली अतूट अर्धांगिनी
मुलीच्या रूपात मिळाली सुखाची अमाप देणगी
वाहिनी पुतणी काकू आत्या मावशी मामी भाची
नवदुर्गेपेशाही अनेक अवतारात स्त्री साकारली

आदिशक्तीचा अवतार घेऊन हे सुंदर जग दाखवणारी जननी तू आहे
असीम प्रेम त्याग समर्पण अश्या लाखो गुणांची सोनेरी खाण तू आहे 
निःस्वार्थ प्रेमाचा झरा बनून जीवनाला पूर्णत्व देणारी स्त्री स्वरूपात ईश्वरी शक्ती तू आहे 
परमेश्वरालाही अभिमान वाटावा अश्या विविध रूपात जीवनाचा अविभाज्य भाग तू आहे

®रामदास नरवाडे

©Ramdas Narwade #जननी #मराठी #womenday
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

सजदा 

निगाहोसे बाते होने लगी 
अब इशारो मे सब समज आया 

नजरे अब तेरा ही सजदा करने लगी 
जाने कैसा यह जादू तुने चलाया 

हर ख़ुशी अब तेरे नाम कर दी 
तुने भी तो उतनाही दिल लगाया 

उपर वाले की है यह माया 
जिसने हमे तुझसे है मिलाया

®Ramdas #Love #story #Pyar 
#India
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

उम्मीदोकी दिवाली 

इस बार दिवाली पहली बार घर से कोसो दूर है 
त्योहारो के दोर मे चढा खुशियो का हसीन नूर है 
एक परिवार से अलग दोस्तो बीच हम यहा भी खूब है 
जोरो शोरो के माहोल मे बस उदास आपनोके सूर है 


गुजर जाएगा यह वक्त भी 
हमेशा थोडी ना सक्त है 
पलट जाएगा कोरोना का तक्त भी 
यह कोनसा भगवान का भक्त है 


लोट आयेंगे वो दिन बस कुछ समय की है जरुरी दुरी 
छे फीट की दुरी को काट देगी कोसो फीट की मिठी सूरी 
त्योहारो के हसीन पलो मे कोई बात रात ना होगी अकेली 
जलेंगे उम्मीदोके दीप हर जगह रोशन होगी रात काली 
अपनोके बीच होगे जल्द सारे मिल बाट लेंगे खुशिया सारी 

Wish you all a very happy and prosperous 2020 Deepawali 🙏
®रामदास नरवाडे #festival #diwali #celebration #India
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

सोच 

रावण की सोच रखने वाले 
वाल्किमी का ज्ञान दे रहे है 
राम का मंदिर जहाँ बन रहा है 
वहा सिता सुरक्षित नही कह रहे है 
बेटी कैसे वस्त्र पेहणे 
किस वक्त घर पोहचे 
इस पर बेहस चल रही है 
जो खुद बुरी नज़ारो से गिरे है 

सरकार क्या करे क्या ना करे 
पुलिस पहारा दे ना दे 
यह सोचने से अच्छा है 
क्युना हर बेटे मे हम राम जैसी सोच डाले
हर नजर मे इज्जत का दिया जले 
हर माँ बेहन बेटी बेखौफ चल पडे 
कपडोसे ज्यादा सोच से शराफत देखे 
मंदिर जहाँ बना वहा तो क्या लंका मे भी सिता सुरक्षित रहै 
 
®रामदास #Soch #Thinking #Women #RESPECT
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

माणुसकी 

प्रेम आणी प्रीती अडकली 
जात धर्म पंथाच्या बेडीत 

न्याय आणी नीती जखडली 
अनीतीच्या जबडीत 

समाज आणी लोक काय म्हणतील 
याचाच होतो डंका 

श्रीरामाने ही सीतेला सुनावली होती 
याच समाजासाठी एक कठोर सजा 

गरज आज भासती श्रीकृष्ण नीतीची 
सत्याच्या विजयी सर्वस्व अर्पणाची 

नको भीष्म पितामह जरी असती इमानी विश्वासू 
सत्य आणी नीतीची बाजू घेणारी हवी युयुत्सु

जात धर्म पंथा हुनी श्रेष्ठ माणुसकी 
प्रांजल प्रेम प्रीती न्याय आणी नीती 

®रामदास नरवाडे #manusaki #Love #marathi #kavita
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

नवजीवन 

कसा जीवाचा करून आटापिटा 
मज दाविल्या नवजीवन वाटा 
किती जीवाला खाऊन खस्ता 
मज दाविल्या नवजीवन वाटा ||धृ ||

किती राबून.. शेती दिनरात 
किती लपून.. गरिबी मन 
मज द्यावया.. हो हे ज्ञान 
काही जीवाला न खातापिता 
मज दाविल्या नवजीवन वाटा ||1||

किती करुनी.. हाडाची झीज 
पैका पैका हो.. जोडुनी दिला तो नीट 
आता कराया.. त्या कष्टाचे चीज 
रक्ता रक्तात उसळती आज तुफानी लाटा
मज दाविल्या नवजीवन वाटा ||2||

®रामदास नरवाडे #मराठी #कविता #farmer #Education
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

टोकाई 
सह्याद्री देवराई गडावर वसे माता टोकाई 
प्रसन्न होत असे त्यासी जो करे कर्माने पुण्याई 
भक्त-शरनार्था इच्छित कृपाशिर्वाद देई 
आदिशक्तीचा अवतार मन दर्शनाने तृप्त होई
 
श्रमदानातून फुलणार हिरवीगार वनराई 
भक्तांसह पर्यटकांची पूर्ण होणार दुहाई 
सह्याद्रीच्या साजश्रुंगारात लाखमोलाची नवलाई 
 पंचकोशीत प्रसिद्ध असे  निसर्गरम्य गड देवराई

जय जय टोकाई... जय जय टोकाई 🙏🙏

©रामदास नरवाडे (कोठारी) #टोकादेवी #मराठी #कविता #God #Bhagwan #plantation #India #maharashtra 

#LightsInHand
8868da6fceb73baacc031ca870129d0c

Ramdas Narwade

भंक्तांची आषाढी 

कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी 
टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी 
कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची 
विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी 
हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी 

विठूनामाचा गजर करणारे वारकरी 
माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी 
घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी 
भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली 
विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली  
दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी 

माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी 
#corona #lockdown
loader
Home
Explore
Events
Notification
Profile