Nojoto: Largest Storytelling Platform
marutisp9027
  • 220Stories
  • 993Followers
  • 4.3KLove
    21Views

Patil MS

known Marathi, Kannada, Hindi n English. Personality Development Trainer. Reading, Writing, teaching-guiding. Nature lover.

  • Popular
  • Latest
  • Video
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

एखाद्याच्या जवळ येऊन,
त्याची रोजची सवय बनून,
इतकही दूर कधी जाऊ नये
जीतून माघारी येने अशक्य होईल।

पाऊल खुणा पुसत जातात,
आठवणी मिटत जातात,
एखाद्याला इतकीही दुर्लक्ष करून नये,
ज्याने विसरणे एक सबब बनेल।

आठवणी विष बनतील,
भास बनून छळू लागतील,
मागारी यायला इतकाही वेळ लावू नये,
ती व्यक्ती आपला पर्याय शोधू लागेल।

वेळ सरत जातो,
जखम भरून येतो,
एखाधला विसरणे निमित्य बनून,
आपली जागा तिसरी व्यक्ती घेऊ लागेल।

पाटील एम.एस #Dreams
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

ओझरता तिचा एक स्पर्श;
अंगावर अगणिक शहारे।
जवळून टाकलेला तिचा एक चोरटा कटाक्ष, 
फुले मन मयूराचे रंगीत पिसारे।

ओठांवर उतरलेली तिची तारुण्य,
अतृप्त आणिक अधीर।
कमनीय ती, आणिक  मोहक तिची काया,
नसा-नसामधुनी सळसळे धारोष्ण रुधिर।

पाटील एम.एस। #स्पर्श
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

गुलाब माझ्या हृदयाचा;
श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा।
गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा;
झरणा बनून वाहतोय उत्साहाचा।
तुझ्या नजरेतील खोली, अथांग  सागराचा;
खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा।
हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा;
सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा।


पाटील एम.एस। #गुलाब
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

गुलाब माझ्या हृदयाचा;
श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा।
गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा;
झरणा बनून वाहतोय उत्साहाचा।
तुझ्या नजरेतील खोली, अथांग  सागराचा;
खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा।
हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा;
सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा।


पाटील एम.एस। #गुलाब
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

तुझ्या आठवणीत जेव्हा मी व्याकूळ होतो।
तुझे स्मृतीच मला सांत्वन देतात।
अंधकारात मी भरकटलो तर 
आठवांचे तुझ्या चांदनेच मला उजाळा देतात।
तू नसताना ही तुझे स्पर्श मला जाणीव देतात।
निघणारा प्रत्येक श्वास, स्पंदन म्हणून धडकत राहतात।
तू असून दूर, तुझ्या सोबतीची प्रत्येक क्षण फेर धरून नाचू लागतात।
"मी एकटा" भास की; 
तुझ्या सहवासाची ध्यास!! 
यातच रात्र-रात्र सारतात।

             पाटील एम.एस। #निरव ते रात्र

#निरव ते रात्र

8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

रोज तुज स्वप्नात येणं,
होत नाही प्रत्यक्षात मात्र भेटणं।
तुज्या आठवणीत रोज असतं जूरणं,
भेटीच्या तुझ्या आशेवर दिवस ढकल राहणं।

पाटील एम.एस। #चारोळी
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

आता कुठे तिच्या मनात,
प्रेमाचा फुल फुलू लागलाय।
आत्ताच कुठे तिच्या श्वासात,
तारुण्याचा सुगंध दरवळू लागलाय।

तिच्या गालावरती पडलेली खळी,
तिच्या ओठांवरी चढलेली लाली,
तिच्या मनाने मांडलेली प्रेमाची खेळी,
आता कुठे तिलाही जाणवू लागलाय।

आत्ताच कुठे तिचे,डोळेही बोलू लागलेत,
तास अन तास स्वप्न रंगवू लागलेत,
माझ्या वाटेकडे नजर लावून, 
तीचे आरक्त डोळेही जुरू लागलेत।

चाहुलाने माझ्या, तिचे हृदय ही धडधडू लागलाय,
बोलताना का बरे तिचा कंटही दाटू लागलाय?






पाटील एम.एस। #तारुण्य
8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

जायचं म्हणून निघतो घरून, 
पण पोहोचायचं कुठेच नसतं।
गाडीची आवळलेली मुट 
मन मात्र आवरू पाहत।
अस्थिर मनोअवस्था,
नजर मात्र शून्यात सामावलेलं असतं।
अस्वस्थ, दीर्घ निःश्वास कोंडल्यासारखं वाटतं।
एक अनामिक हुरहूर, 
मन मात्र दाही दिशा दौडत राहतं।
अनिश्चित या जगात,
निश्चित पण काहीच नसतं।
उझडलेले दिवस मावळत राहतात,
नाशिभी मात्र वाढलेली वयाची बेरीज येतं।
आपण निस्फळ की आपले जिवन निस्फळ,
या द्वंद्वातच आयुष्य सरूनही जातं।
भेटेल का मज सहारा,
निवारा मात्र शोधत राहतो।
पुरेशा, किरण एक आशेचा,
कीनारा फक्त शोधत असतो।
                   
                   पाटील एम.एस. #आश्वस्त मनाशी संवाद!!

#आश्वस्त मनाशी संवाद!! #poem

8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

तू रुसलीस की, आरक्त तुझे गाल; 
अनकीनच मोहक दिसू लागतात।

अबोल तू, अन बोलकी तुझी देहबोली;
टपोरे डोळे खूप काही सांगून जातात।

पाहून ही, न पाहणारे तुझी नजर;
माझ्या नजरेला भिडता, का बरे जुकतात??

माझ्या भेटीची आस मणी, स्वास तुझे;
मी भेटताच सैरभैर का बरं होतात? #I have questions for you..!!

#i have questions for you..!! #poem

8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

एक-दूसरे को कहते हुए जानवर; 
ख़ुद इंसान जानवर सा बन गया।
जानवरो में जो पाया इंसानियत; 
खुद जानवर बन, कहा हैं इंसानियत खोया??



                         Patil MS #elephant हम इंसान आज शर्मिंदा हैं।।
🏴🏴🏴🏴🏴

#elephant हम इंसान आज शर्मिंदा हैं।। 🏴🏴🏴🏴🏴 #बात

loader
Home
Explore
Events
Notification
Profile