Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilhuddar9772
  • 939Stories
  • 14Followers
  • 9.4KLove
    1.1KViews

Swapnil Huddar

  • Popular
  • Latest
  • Video
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

तू जाऊ नको सोडून, म्हणून कुणीच भांडत नाही,
आणि सुन्या मंडपाला पाहून, अश्रू ही थांबत नाही...

स्वप्नील हुद्दार













.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

निरोपाची वेळ का रे इतकी, चटका लावून जाणारी,
तुझ्या ही घरी आहे ना रे, आई वाट पाहणारी...

स्वप्नील हुद्दार













.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

पहात राहतो टक लावून, तू अस्तित्व ओतलेलं मखर,
काही दिवसांचा वावर तुझा, घर मनात आयुष्यभर...

स्वप्नील हुद्दार 













.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

मी फक्त त्याचे नाव घेता , आशीर्वाद मिळणार आहे,
त्याचं माझं नातं, जगाला कुठे कळणार आहे ?

स्वप्नील हुद्दार 








.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

त्याच्याकडे येतो मी, माझं मीपण हरवल्यावर,
तोच कसा सोडून जात नाही, साऱ्यांना मी गमवल्यावर...

स्वप्नील हुद्दार 













.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

त्याच्या डोळ्यांत पाहताना, पाणी अलगद तरळलं,
माझे डोळे भरून आले होते, त्याला कसं कळलं ?

स्वप्नील हुद्दार













.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White आपल्यात नसणाऱ्या प्रेमाचा, कायमचा भास मोडला,
तुझ्या हृदयात न शिरताच, माझ्या कवितेने श्वास सोडला...

स्वप्नील हुद्दार 

















.

©Swapnil Huddar #Sad_Status
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

अंधारावर त्याला थोडा जळताना पाहिला,
मी एक चंद्र त्या रात्री उजळताना पाहिला...

घायाळ होऊनही उभे रहावे लागले जगासमोर,
मी एकट्यात त्याला मग विव्हळताना पाहिला...

नभाने किती पार त्याचे सांत्वन केले,
तेव्हा कुठे गाली जरासा निखळताना पाहिला...

जरा त्याला छेडता त्याच्या चांदणीच्या नावे,
शरमेने तेव्हा ढगाआड पळताना पाहिला...

मला म्हंटला किती दुःख करत बसशील गड्या,
एक हसू गाली ठेऊन प्रश्नांना टाळताना पाहिला...

मी एक चंद्र त्या रात्री उजळताना पाहिला...

स्वप्नील हुद्दार








.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White दिवसभर दूर राहतेस अशी माझ्यापासून, 
अन् रात्र झाली की कशी छळतेस तू...

मी लिहीत राहतो अख्खी कादंबरी तुझ्यावर,
पण त्याच्याच दोन ओळीत रमतेस तू...

स्वप्नील हुद्दार 














.

©Swapnil Huddar #sad_shayari
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White किती विरह सोसावे लागले, सुचण्याआधी एका ओळीला,
इतकं सोपं नसतं पुन्हा उमलणं, कोमेजणाऱ्या कळीला...

स्वप्नील हुद्दार 













.

©Swapnil Huddar #Sad_Status
loader
Home
Explore
Events
Notification
Profile