Nojoto: Largest Storytelling Platform
shashikantkoli3232
  • 54Stories
  • 2.2KFollowers
  • 694Love
    81.3KViews

Shashikant Koli

poet,lyricist, Writer,

  • Popular
  • Latest
  • Video
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

Shashikant kolo

©Shashikant Koli
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

घरी फुलांचे नाते जुई नि जाई असते 
ताई म्हणजे असते दुसरी आई असते

©Shashikant Koli
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

तळमळ तळमळ झाली आहे 
पुन्हा होरपळ झाली आहे 

प्रवास संपत नाही माझा 
उगा धावपळ झाली आहे 

शंकेची ठिणगी पडलेली 
ठिणगी वादळ झाली आहे

अजून ही ती आहे माझी 
त्याची केवळ झाली आहे 

- शशिकांत कोळी (शशी)

©Shashikant Koli #SunSet
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

जोडलेले तोडण्याचा त्रास होतो 
हो मला या वागण्याचा त्रास होतो 

वेळ आली की सरळ जावे निघोनी
थांबल्याने थांबण्याचा त्रास होतो 

शक्य होते पण अता ते शक्य नाही 
शक्यतो हे सांगण्याचा त्रास होतो 

जे जसे आहे खरे ते स्पष्ट बोला 
फक्त खोटे बोलण्याचा त्रास होतो 

एवढे कळणार का त्या टाचणीला 
की 'फुगाही' फोडण्याचा त्रास होतो 

हात जोडुन मागण्याने सर्व मिळते ?
काय मागू, मागण्याचा त्रास होतो

-शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli #Drops
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

अभंग....

अभंग.... #Poetry

9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल 
जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल 

तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे 
या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल 

एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे
की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल 

कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली 
अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल 

अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी 
पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल 

ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे 
अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 
या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल 

-शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli आषाढी एकादशी

आषाढी एकादशी #Shayari

9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

शांत आहे एक जत्रा आतली
ऐकली मी शांतता माझ्यातली

दोन टोकांवर नको थांबायला
वेळ नाही चांगली दोघातली

ती पुन्हा आली फिरुन माझ्याकडे
बंधने तोडून संसारातली

ती खरेतर चांगली आहे तशी
मात्र अडचण सांगते प्रेमातली 

केवढी हिरमुसुन गेली राधिका 
एक इच्छा राहिली कृष्णातली

- शशिकांत कोळी (शशी)

©Shashikant Koli #Night
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

काय होणार आहे भिती वाटते 
एक इच्छा जणू एकटी वाटते

पांघराया दिली आठवण चांगली 
पण मिठी का मला पोरकी वाटते

शब्द माझा तुझा वेगळा वेगळा 
ओळ माझी तुझी सारखी वाटते

एक मी एक तू एकटे राहिलो 
आणि दूनिया मला एकटी वाटते 

फार नाजुक किती बाहुली वाटते 
लेक माझी मला माउली वाटते

-शशिकांत कोळी (शशी)

©Shashikant Koli #WallTexture
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

प्रेम वाढू लागल्यावर भांडणे टाळा
एकमेकांना पुढे इतकेच सांभाळा

काय केल्याने तुला आली शिसारी ही
काय केल्याने तुझा जाईल कंटाळा

घेतली तलवार हाती शांततेसाठी 
मौन होउन एकदा तर शांतता पाळा 

- शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli #VantinesDay
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

किती शुष्क आहे तुझा चंद्रमा अन किती शुष्क आहे तुझे चांदणे 
कुणा कारणे जीव वेडावला जीव ही तोडला तू कुणा कारणे 

धडकतात लाटा किनाऱ्यावरी या तशी का धडकते तुझी आठवण 
उसळते निथळते पुन्हा तेच घडते नशिबात आहेच फेटाळणे

तुझ्या पैजंनाचा पुन्हा नाद आला पुन्हा जन्म सारेच झंकारले
बिखरलो तरी वेचले जन्म सारे मला भावते हे पुन्हा जन्मणे 

प्रभा कोणत्या या कुठे चाललेल्या कुठे रात्र आहे अशी थांबली 
मला प्रश्न आहे कुणाच्या कृपेने सुरू राहिले रोज तेजाळणे

दिवस चांगला जात आहे कधीचा कशाने मला चांगले वाटले
असे स्वप्न पडते मला रोज हल्ली पुन्हा रात्रभर मग सुरू जागणे 

नदीच्या किनारी भले ओल आहे तरी वाटते का नदी कोरडी 
कुणी बैसलेले किनाऱ्यावरी अन कुणाचे सुरू आसवे ढाळणे

चमत्कार इतका घडू लागला की जमू लागलेले विसरणे तिला 
कसे सांग जमणार आहे मला पण मनातून अवघे तुला काढणे

©Shashikant Koli
loader
Home
Explore
Events
Notification
Profile