Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2765846455
  • 560Stories
  • 165Followers
  • 6.9KLove
    1.2LacViews

शब्दवेडा किशोर

Am actor,singer,writer,editing asistant and director

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#व्रण  
कितीही सोंगे धरली जरी 
वण त्या वेदना विसरत नाही 
तो काळ..ती वेळ..ती माणसं..
कधीही व्रण ते चेहरे विसरत नाही..
साधु संताचा आव आणला जरी
भक्तिमार्गही व्रणाच्या खुणा जपतो
परमार्थातात तल्लीन झाला तरी
ह्दयात तो व्रण मात्र अडकूनच राहतो
मनाच्या जखमा अन् त्यावरच्या खपल्यांचे व्रण 
काळजात कायम अडकून राहतील
जरी ती माणसही उरली नाही
तरी त्यांनी दिलेले हर क्षणांचे व्रण 
ते ओझं ओढायला लावतील
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #व्रण
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#आकाशी चंद्र चांदण्या....
स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी 
धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही
अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे 
प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे 
जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे
खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो 
जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला
मरणाला मात्र मी घाबरतो आहे
काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन्
पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप
उगाच डोळे मी ताठारतो आहे
असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास
तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ
मीच विसरलो आहे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आकाशी_चंद्र_चांदण्या
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#पत्रास कारण की....
देवा लिहीतो तुजला मी पत्र....
पत्रास कारण की,
तुझ्या अस्तित्वाच्या खुणा म्हणे दिसतात चराचरी
तरी का आढळती मग या जगी दिन दुबळे
गरिब लाचार अन् भिखारी
कुठे घडतात तारुण्यात चुका अन चोऱ्या
तर कुठे घडती पापं सारी
कुणाचे भोग भोगत बाल्य फिरते दारोदारी
कुणी जन्मते सुंदर स्वरूप कुणी जन्मानेच असे व्यंग कुरूप
कुणाच्या अंगी असे नानाविध कलांचा संगम 
कुणी मानतो व्यसनांनाच अपुला धर्म
कुणा मिळते वारसाहक्कात
सोनं चांदी अन् सात पिढ्याची संपत्ती
कुणाचा पूर्ण जन्म जाई चुकवण्यात देवा
मागल्या जन्माची उधारी
कळे ना मज तुझी लीला ही न्यारी
अशी कशी असते रे देवा तुझी
ही अजब दुनियादारी....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पत्रास_कारण_की_बोलायची_हिंमत_नाही
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#प्रित तुझी माझी..
प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी
प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी 
अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली
कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली 
मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले
कोणता अल्लड अवखळ हा किनारा
वादळ हे कोणते माझ्या मनी उठले 
घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी
नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी 
विश्वासाने मी तुझ्यात माझ्या
जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं
सात जन्मासाठी मी माझं पाऊल
तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #प्रेम_हे
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#फिरुनी नवा जन्मेन मी....
   - शब्दवेडा किशोर
*कवितेचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.*
कोवळी ती माझ्या आयुष्य अस्ताची झुळुक
मज अनाहूतपणे बिलगुन गेली होती
मावळतीचा तो सुगंध वा-याचा होता मजभोवती
तयाचे ती झुळूक बोट धरून निघून गेली होती
नशीबाने होते छाटलेले तेव्हा ते पंख माझे सोनेरी गळून गेले होते
अन् रूतलेल्या काट्यांनी मग आपसुक मला अखंडीत जपले होते
काटेरी रस्त्यावरची माझी ही आयुष्यप्रवासाची यात्रा झाली होती
तिथेही माझ्या मातीनं जन्मभर माझी सोबत केली होती
अनाहूतपणे मग अचानक एक सचिन कोरडे नावाचं
सुवर्णफुल उमललं अन् शब्दलेखणी नावाच्या सुंदर
सुवर्णकळीमध्ये मज पामरास आसरा मिळाला
शब्दलेखणी नावाची सुवर्णकळी आजही माझ्या
सुवर्णासम त्या आयुष्यपाकळ्यांना जपते आहे
अन् रोज नव्याने जगाला ते ओरडून सांगते आहे
पुन्हा तू नव्यानं उमलणार अन् धरेचं ते सौंदर्य
अखंडपणे जपणार हेच मला सांगत आहे
तिच्या साक्षगंधाने सांगतो मी तुम्हाला की
घेऊनी श्वास पुन्हा नव्याने आयुष्याचे सप्तसुर छेडीन मी
अस्त जरी माझा झाला तरीही पुन्हा अंकुर होऊनी
फिरुनी नवा जन्मेन मी..
फिरुनी नवा जन्मेन मी..

©शब्दवेडा किशोर #शब्दलेखणी
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#देह नश्वर आत्मा तोचि असे अंशईश्वर....
कुणी आधी कुणी नंतर देवाकडून जन्म घेऊनी पुन्हा
निजधामाला जातसे परी एक तो आत्मा अमर
जन्म न घेतो नाश न होतो एकच आत्मा असे चराचर
मनात माझ्या असेल अत्तर गंध पखरतो तोच निरंतर
म्हणून हसतो मला पाहुनी अनोळखी असे कुणी पत्थर
स्पर्शाचे हो कसे आकलन कुठून येती शब्दांचे ते अमाप घन
जीवास चेतना कशी मिळे ती जरा करावे याचे
सम सकलांनी चिंतन
ओठावरचे हसू ते लाघवी क्षीण वेदना ती करी मानवी
कशी समजते अलगद उरी सलणारी वेदना
दुजा कुणाची बात सहज जाणवी अपुल्या मना
आत्म्याचे ते आत्म्याशी अतुट असे विलक्षण बंधन
कुणा न कळले कोण चिरंतन परमात्मा जो देही वसतो
सहज सोडतो तो हे देही बंधन मुक्ती मिळते मग ती देहाला
भोग वेदना त्या साऱ्या असे आत्म्याला
हा देह सोडुनी जाई आत्मा दुसऱ्या देही पुन्हा जगणे असे
नित्य निरंतर ते आत्म्याला
परमात्म्याशी तदाकार जर झाला आत्मा नसे मग तयास अंतर
तरी कदाचित मिळेल मुक्ती आत्मा परमात्मा मिटेल मग अंतर
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #काया_विठ्ठल_आत्मा_पांडूरंग
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#फिरुनी नवा जन्मेन मी....
कोवळी ती माझ्या आयुष्य अस्ताची झुळुक
मज अनाहूतपणे बिलगुन गेली
मावळतीचा तो सुगंध वाऱ्याचा होता मजभोवती
तयाचे ती झुळूक बोट धरून निघून गेली
नशीबाने होते छाटलेले तेव्हा ते
पंख माझे सोनेरी गळून गेले
अन् रूतलेल्या काट्यांनी मग
आपसुक मला अखंडीत जपले
काटेरी रस्त्यावरची माझी ही
आयुष्यप्रवासाची यात्रा झाली
तिथेही माझ्या मातीनं जन्मभर
माझी सोबत केली
आजही माझ्या सुवर्णासम त्या
आयुष्यपाकळ्यांना ती जपते आहे
अन् रोज नव्याने मग जगाला
ती ओरडून सांगते आहे
पुन्हा तू नव्यानं उमलणार अन्
धरेचं ते सौंदर्य अखंडपणे जपणार
तिच्या साक्षगंधाने मी
शब्दवेडा किशोर सांगतो तुम्हाला की
घेऊनी श्वास पुन्हा नव्याने
आयुष्याचे सप्तसुर छेडीन मी
अस्त जरी माझा झाला तरीही पुन्हा
अंकुर होऊनी फिरुनी नवा जन्मेन मी
फिरुनी नवा जन्मेन मी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #फिरुनी_नवा_जन्मेन_मी
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#स्वप्नातलं गाव
गाव तुटत चाललंय एका एका श्वासागणिक
अंतर मनांचं मनांशी वाढत चाललंय एका एका पावलागणिक 
मिटत चालल्या पाऊलवाटा पुसून पाऊलखुणा
अरे माणसा तुझ्या हातून घडला असा कोणता गुन्हा
पोखरलेल्या घरात उरले नात्यांचे अवशेष
सोयरसुतकाइतकेच राहिले भावकीचे लवलेश
नावापुरतं फक्त उरलं गाव फक्त
आठवणी लिहीलेल्या डायरीच्या पानांवर
नाती गोती विरत गेली हल्ली मन नसतं थाऱ्यावर 
घरासहित माणसंदेखील पुसट होत गेली
मनामध्ये आठवणींची तुफान गर्दी झाली 
उरल्या सुरल्या आठवणींचं बांधुन गाठोडं
रोज मी जगून घेतो गाव थोडं थोडं
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #हरवलेला_गाव
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#पांडूरंगा विठ्ठला..मायबापा विठला....
असूनि जवळी प्रिय अर्धांगिनी रूक्मिणी
मुरलीतूनी उमटती सूर श्रीकृष्ण-राधा नामाचा ध्वनी
याहूनी अन्य काय हवे प्रेमा  
पतितपावन भक्तीस उतरूनी चाखिलीस तु शबरीची उष्टी बोरे रामा
भक्तांवरी ठेवलंस प्रेम ते अनुपम अन्य मिळते का कुठल्या धामा 
हाकेसरसी धावत आला तु जगजेठी राहिलास उभा तु
विटेवरी चंद्रभागेच्या वाळवंटी
तुझ्या प्रिय त्या भक्त पुंडलिकासाठी
प्रेमापोटी येते नाव ओठी जय जय पुंडलिक हरी वासुदेव हरी
हंबरडा ऐकूनी धावत येई वासरू मायेकडे 
धेनू येऊनी आपसुक पान्हावतात मग तिचेही वात्सल्याचे कढे
तसा तु निरंतर उभा जन्म शिंपितोस भक्तादारी
स्व-कृपेच्या आशीर्वादाचे सडे
प्रेमाची भाषा असे अद्भूत व निराळी 
अंतरीच्या हाकेची ती कहाणी
असे अशी आगळीवेगळी
मी असे मुढ अल्पमती
बालक काय महिमा वर्णू
तुझा माझ्या देवाधिदेवा
श्री पांडूरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
माझ्या अल्प भक्तिलाच गोड मानून
माझ्या ओटीत तुझ्या
आशीर्वादाचा सागर भरभरून तु द्यावा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #देव_माझा_विठोबा
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#देह कुडी एक रंग....
देह कुडी एक रंग जयास
असे तयास विठ्ठलरूपी आत्म्याचाही संग
हाडामासाचा तिथं पिंजरा केला
आत सुंदर राघु बैसविला
राघु मोठा ग्यानी ज्ञानी 
बोली बोले मंजुळ वाणी 
एके समयी अनाहूतपणे राघु उडूनिया दुरदेशी गेला 
तयाचा पिंजरा मग मातीत लोटला 
चार घटका तयाचिया नामाचा शोक आप्तांनी केला 
काळाच्या पडद्याआड कुडीचा पिंजरा जव लोटला
तव प्रत्येकजण तयास विसरूनी तयामागे उरलेल्या
संपत्तीवर तुटुनिया पडला 
जन्मा जो येणार तो एक दिवस भाग्यरेषेच्या
भाकीतावर मरणासही सामोरं गेला
तयामागे कुणीच फार शोक ना केला 
कुडीतुन पंचप्राण जाण्याच्या काही क्षणभरातच
माघारी उरलेल्यांनी तयाच्या संपत्तीचा लोभ धरावा
अन् रागरुसवा करावा
हाच मग नवा पायंडा पडला
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #देह_कुडी_एक_रंग_जयास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile