Nojoto: Largest Storytelling Platform
kavitapardeshi5082
  • 36Stories
  • 6Followers
  • 314Love
    798Views

कविता पुराणिक

Education - M.A English , Hobbies - Singing , Writing , Sahitya

  • Popular
  • Latest
  • Video
9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

मौनाचा  अर्थ कळला  की,
 शब्दांमधील मतितार्थ उमजतो.

©कविता पुराणिक #Likho
9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे  टिपता  आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीप्रेम

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गाकडून शिकता आली की, गतस्मृतीमधील कटू आठवणी दूर करून सहजीवनातील सुरेल लाघवी क्षण अलवारपणे जपता येतात.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप पावते.
 आणि मग उरते ती केवळ विरक्ती.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

निरपेक्ष निखळ आनंदी मन हे सगुण साकार ईश्वराची खरी परिभाषा असते.

©कविता पुराणिक  मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

उदंड निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती लाभण्यासाठी ईश्वराची सुंदर योजना असावी लागते. 
प्रेमाची अतूट साथ हे तुमचे मनोबल द्विगुणित करण्याचे ऊर्जा स्थान असते.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

कधी होत असे पाऊस धारा रिमझिमणारी माझी स्वरा सहजच सांगून जाते मला जगण्याचा स्वच्छंदी अर्थ खरा

©कविता पुराणिक स्वर तरंग

स्वर तरंग #मराठीकविता

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

तुझ्या आठवणीत सारे शब्द ओठातच विरून जातात. मनामधील भाव नकळत डोळ्यांमध्ये दाटून येतात.

©कविता पुराणिक
  मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीकविता

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

प्रेम म्हणजे जणू आयुष्यातला सुंदर महोत्सव. अहंकार लोप होऊन स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न उरणे.
 म्हणजे खरी निरपेक्ष प्रेममयी भावना.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile