Nojoto: Largest Storytelling Platform
kadamsachiien9220
  • 167Stories
  • 137Followers
  • 1.0KLove
    12Views

Kadam Sachiien

  • Popular
  • Latest
  • Video
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

आयुष्यात मिळवायचा असेल तर आईबापाचा पाठिंबा मिळवा कारण हाच सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो पण आईबापाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत सोबत राहतो.

©Kadam Sachiien #Hopeless
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

आपल्या प्रेतावर किती माणसं येणार आहेत ह्याने काही फरक पडत नाही, अनेकांना वाटतं ते फार महत्वाचं आहे. पण तसं नसतं. त्या गर्दीत निरोप देताना कितींचे हात जड झाले आणि कितीजणांना नंतर आयुष्यात आपल्या असण्यानसण्याने फरक पडणार आहे ते महत्वाचं आहे. शेवटच्या क्षणी फक्त तितकीच माणसं सोबत लागतात. खरं तर फक्त शेवटच्या नाही तर प्रत्येक क्षणी. आपल्यामुळे ज्याला वा जिला फरक पडतो अश्या केवळ एका व्यक्तिपुढे ती गर्दी फिकी पडते. ती व्यक्ती होता आलं पाहिजे कुणासाठी तरी.. तोरणदारी गेलं नाही तरी चालतं पण मरणदारी अवश्य जावं म्हणतात. थोडक्यात कुणाच्या सुखात नाही पण दु:खात कायम साथ करावी. हे कायम लक्षात रहायला हवं. 

           ®© सचin #alone
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

अगोदर माणूस चांगला का वाईट हे स्वभावातून, सहवासातून समजत होते पण आता व्यवहारातून समजते.

®©सचin

9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोनतीन वर्षे तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिन्त असतो. या प्रपंच्यामध्ये आपली आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिती नाही. याकरिता, आपण आयुष्याचा एक क्षणसुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात, व्यतीत करावा.
  
®©सचin #Onam2020
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी                      ®©सचin #shadesoflife
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

भिखारी मी आज भिक मागतो.प्रितीची भिक घालणे ,न घालणे ही बात तुझ्या खुशीची

®©माही
😰😥😰😥 #CalmingNature
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

ती येत होती
तो जात होता
या दोघांना नेहमी वाटायचं की
आपण ऐकमेकांना भेटावं
पण ते शक्य नव्हतं

कारण 
ती--रात्र होती
तो--दिवस होता..

शुभरात्रि
®©सचin●●M.. #Stars&Me
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

मैत्री हे एक असं नातं आहे. त्यात कोणतीही कास्ट पाहिली जात नाही...!

"मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

®©सचin #happyfriendshipday
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

उद्या..दि.२९जुलै २०२०.... दहावी (S,S,C,)चा online..निकाल..आहे .सर्व पास होणा-या विद्यार्थ्यांना  भावी वाटचालीस...खुपखुप  शुभेच्छा ! 

नापास विद्यार्थी  मित्रांनो...बचेंगे तो ओर लढेंगे..अशी भूमिका घ्या..

कोणत्याही परिस्थितित..चुकीचा निर्णय  नकोच. पालकांनी तुम्हांला १५,१६वर्ष जिव लावलाय..इथुन पुढेही लावतिल यात शंकाच नाही...
आपलाच..
(सचिन कदम) #cousinsday
9fcc713dacaff24ed661b7d0a8f474e4

Kadam Sachiien

रातराणीचा सुगंध...
नभात दरवळला
चंद्र पुढे जाता जाता...
हळूच मागे वळला...

चांदणीला मोठा प्रश्न पडला,
"रातराणी वर तर...
चंद्र..नाही ना भाळला"..?

®©सचin #MoonHiding
loader
Home
Explore
Events
Notification
Profile