Nojoto: Largest Storytelling Platform
malharshelar3605
  • 122Stories
  • 87Followers
  • 741Love
    17Views

Malhar Shelar

Follow me on Instagram @Kaviakshar

  • Popular
  • Latest
  • Video
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

श्वासात होता, रुक्मिणीच्या डोळ्यात होता कृष्ण.. 
डोहात होता, राधेच्या मोहात होता कृष्ण.. 

दारात होता, ओसरीत होता कृष्ण.. 
पूनव राती घुमल्या बासरीत होता कृष्ण.. 

कुरुक्षेत्रात होता, रणांगणात होता कृष्ण.. 
गांदीवाने सोडल्या प्रत्येक बाणात होता कृष्ण.. 

कौरवात होता, "साही" पांडवात होता कृष्ण.. 
युगांयुगे झुंजला असा झंझावात होता कृष्ण.. 

अवसेच्या रातीत होता, चांदण्यात होता कृष्ण.. 
देवकीच्या अंजणात, यशोदेच्या अंगणात होता कृष्ण.. 

बलरामाच्या बळात , कालिया मर्दनात होता कृष्ण.. 
सुदामाच्या पोह्यात , गोपिकांच्या वृंदावनात होता कृष्ण..

ध्येयात होता, भारत धर्मात होता कृष्ण.. 
माझ्या अंतरात, हो माझ्यात होता कृष्ण.. 

#अक्षर

©Malhar Shelar #Krishna
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

पाणीपती पडलेला रक्ताचा हर एक थेंब.. राष्ट्ररक्षणार्थ.. आणि ह्या राष्ट्राच्या एकसंधतेसाठी लढला.. झगडला..!! 
राष्ट्ररक्षण.. राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्र आईच्या गर्भातून इथल्या कैक मरहट्टया मनगटात आजही जिवंत आहे..!!

पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा त्रिवार त्रिवार मुजरा।।

©Malhar Shelar पानिपत!

पानिपत!

a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

हमारे है जो, वो जमाने है.. 
साल गुजरते थे, साल गुजरते रहेंगे.. 

#अक्षर

©Malhar Shelar #bye2020
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

जमाने के लिए मैं क्या कुछ हो जाता हूं.. 
मेरी माँ मुझे चूमती है, मैं ठीक हो जाता हूं..

#अक्षर

©Malhar Shelar #MothersDay
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

आयुष्याच्या रणांगणात रोज झुंझार अर्जुनासारखा  लढणारा पुरुष.. आत खोल मात्र कर्ण असतो..!! 

तिला तुमच्यातला कर्ण दिसला पाहिजे बस.. इतकंच..!! 

#Soultagged

©Malhar Shelar #Dussehra2020
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

ऐलतीरी चा कान्हा, पैलतीरीची राधा.. 
यमुनेच्या डोहाला सावळ्या प्रेमाची बाधा.. 

#अक्षर

©Malhar Shelar #Krishna
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

उगाच कातरवेळ झाली, 
उछला बस तेरा नाम ही.. 

हिरमुसुन गेली घरटी सारी, 
उदास सी लगती है शाम भी..!! 

#अक्षर

©Malhar Shelar
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

काय सांगू? तुझ्यासाठी काय काय झालो..
तू वीट झालीस, मी विठ्ठलाचे पाय झालो.. 

#अक्षर #lord_krishna
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

काही आठवणी चुकून राहिल्या होत्या.. 
अश्याच रातींसवे फुकून टाकल्या होत्या.. 

#अक्षर
a48193bb938279a9505277daf05e7c63

Malhar Shelar

आठवांची माळ होत गेलो 
मागे सोडला काळ होत गेलो.. 

जरी का सोडले तू घर माझे 
मी तुझे आभाळ होत गेलो.. 

#अक्षर #alonesoul
loader
Home
Explore
Events
Notification
Profile