Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshkharat5703
  • 355Stories
  • 1.6KFollowers
  • 6.5KLove
    1.8LacViews

कवी - के. गणेश

झिजते माझीे लेखणी.. पाहता डोळ्यात तुझ्या पाणी.!

https://www.facebook.com/k.Ganesh007

  • Popular
  • Latest
  • Video
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

White ।। दिवसेंदिवस ।।
-----------------------
बहरात,झाडाला आलेली पालवी,
त्याकाळची सतेज असणारी हिरवी पानें,
आता एकेक पिवळी होऊन, आपसूक गळून पडताहेत झाडावरून.
कधी एकाच फांदीवर, उगवलेली,सोबत वाढलेली, इतरत्र विस्कटून पडली आहेत.
कांहीं वेळाने वारा ही,भरकटून टाकेल त्यांना.
शिशिर ऋतू तसा पानगळतीचा, हुरहूर वाढविणारा.
मुसाफिरी जशी पानांची,तसी असते आपल्या मनाची ही.
नातवाचं चिमूटभर बोट पकडून, आधार घेत मंदिरापर्यंत जायच वय झालंय आता.
वळसा घेत फेरी मारताना,सावळा देव मंद हसतोय माझ्या कडे पाहून 
संक्रमण अविभाज्य असतं ऋतूच,
पण त्यात झाड जस असतं तग धरुन
तसं समाधान आपण ही पसरु द्यावं आपण आपल्या चेहऱ्यावरून.
--------++------------
सुनील लोणकर जालना 
७/११/२४

©कवी - के. गणेश #GoodMorning
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

... दिपावली शुभ चिंतन..
--------------------------------
तसं एरव्ही एखादी भेटवस्तू, शुभेच्छा, याशिवाय परस्परांना आपण देतो काय?
मनी सदभाव जागृत,हेच आपले संचित.
अपरिहार्यतेच्या रेट्यान इथपर्यंत आलेल्या आयुष्याकडे बघावं आपलेपणानं,
पुढ काळोखान व्यापून राहिलेल अमर्याद आभाळ असेल,अशी भिती मनी का बाळगावी?
खरंतर उत्तर रात्रीच्या गर्भात असतात वेध, ऊद्या सकाळचे.
शुक्रतारा घनतमीच शोभून दिसतो.
गारव्यातलं कोवळ ऊन्ह हवंहवंसं वाटणार आहे.
ऋतुतील सृजन,संक्रमण भावणार आहे.
भरुन येणाऱ्या आभाळासारखी आठवणींची साठवण हवी.
आनंद, सुखदुःख,वेदना विरह रुपी भाव लाटेने,भरती ओहोटी ही जिवन रुपी समुद्र शांत असावा, दुःखाची अशी पाठराखण हवी.
दिपोत्सव,तमातून प्रकाशाकडे.
दिव्याने पेटतो दिवा,ऊजेड होतो अजून नवा.
काहीतरी ईश्वरी प्रयोजन,
त्याशिवाय का आपण होतो,आहोत आजतागायत संलग्न...
आपणांस स्थैर्य तथा स्वस्थता लाभो...
शुभेच्छा,शुभ दिपावली...
----------------------------
सुनील व सौ ज्योती लोणकर परिवार जालना 🙏🏻९२७००९४००४...

©कवी - के. गणेश #Diwali 
happy

#Diwali happy

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

केवढा आधार | आजच्या घडीला ||
उद्याच्या पिढीला | संविधान ||

जिंदगीचं आपुल्या | खणखणतं नाणं | 
सुखाचं गाणं | संविधान ||

हुकमी देशात | स्वाभिमानी बाणा |
उंचाविते माना | संविधान ||

महिलेचा खांदा | पुरुषासमान |
हक्काची कमान | संविधान ||

शाळेत शिकाया | पहिलेच पान |
आमुचा अभिमान | संविधान ||

दुष्काळी राज्यात | गरिबांची आशा |
भाकरीची भाषा | संविधान ||

सगळ्यांना देतंया | सारखा आदर |
बहुजनांची कदर | संविधान ||
_____________________________

©कवी - के. गणेश कविता

#Friend
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

भाषण
#RepublicDay2021
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल..

जसजसे हे दुःख जेव्हा पचत जाते
अडचणीवर मात करणे सुचत जाते

ऐतखाऊ जीवनाला त्याग मित्रा
भोगल्यावर वेदना पण रुचत जाते

भाकरी अन तेल चटणी गोड  मानू
हाव सुद्धा सरण अपुले रचत जाते

बंगल्याला रंग चढता लाल हिरवा
झोपडी ती का उगा रे? खचत जाते

झिंगलेल्या आज इथल्या माणसांना
बघ गणेशा सरळ इच्छा लुचत जाते
--------------------------------
© कवी गणेश खरात
     ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल..

आजची ही हार माझी अंत नाही
खेळतो मी जीवनाशी खंत नाही

तत्व सारे पाळतो मी वागताना
दाखवाया बेगडी मी संत नाही

झुंजला जो वेदनेच्या कारणांशी
गौतमाची ती कथा रे, दंत नाही

वेळ जाते, वेळ येते सावल्यांची
धावणारा काळ सुद्धा संथ नाही

उधळतो मी रोज आता शब्द माझे
वाटतो पण, मी तसा धनवंत नाही
""""""'''''"""""""""""""""""""
     © कवी के. गणेश
        ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल
#sorrow
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल


आज साऱ्या फुगवट्यांचा भास आहे
बातमीला संशयाचा वास आहे

रंगवूनी आकड्यांचे खेळ सारे
ढापलेल्या आशयाला फास आहे

रोजगारी कोंडली हो जायबंदी
कोरडा रे भाकरीचा घास आहे

माध्यमेही आजची हो वांझ झाली
गाय व्याली भोंगळी ती कास आहे

वास्तवाचे भान नाही वाहिनीला
मालकाच्या दावणीला दास आहे
------------------------
             © कवी के. गणेश
               ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल

#AloneInCity
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल

हसावे असे की, खुलासा असावा
मनाला मनाचा, दिलासा असावा

घडावे असे की, रमावे तुझ्यातच
जिवाला सुगावा जरासा असावा

गुलाबी हिवाळा, शहारे तनाला
उबेला उन्हाचा, कवडसा असावा

जुळावे असे की, मिळावे जिवाने
सुगंधी लळा हा, हवासा असावा

जगावे असे की, नको ते दिखावे
तुझ्याही गळ्याला, उसासा असावा
__________________________
                  कवी के. गणेश
                   ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल

#NatureLove
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

उंच मोठ्या आशयाची गझल होते
कोंडलेल्या भावनांची मजल होते

©कवी - के. गणेश #Bicycle
loader
Home
Explore
Events
Notification
Profile