Nojoto: Largest Storytelling Platform
thekingofhearts6512
  • 135Stories
  • 195Followers
  • 1.1KLove
    253Views

Raju Gaikwad

M S C cs

  • Popular
  • Latest
  • Video
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

बेघर होऊन बरसणारा,पावसाला एक छत द्या
एकटा आयुष्य जगणाराला,सोबतीचा हात द्या

मनाला लागणारा शब्द,जेव्हा तलवार बनते ना
तेव्हा त्या धारदार जिभेला,सुरेख असे गीत द्या

ह्रदयी वाळवंट घेऊन,यातनेच जहाज बनवलं
अख्खा वाळवंट हिरवागार होईल,असं खत द्या

मला या जगी एकच,माणुसकीचा धर्म पाहिजे
जिथे माणुकीचा धर्म आहे अशी एक जात द्या

देशाला लुबाडून खाणारे गिधाडे ओळखा बर
जो बंधुभाव जपेल ना,त्यालाच योग्य मत द्या



राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
  #mohabbat
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

खुद की हसी भी अब खुद की नहीं रही
दर्द की सीमा हररोज बढती जा रही है

कविराज

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

मनाच ओझं कमी करण्यासाठी,कुणाकडे गेलो नाही
दुःख सांगून मी कुणाकडे,मदत मागायला गेलो नाही

नियतिने दिलेले केव्हाच,समाप्त करून टाकले आहे
दिलेले दान मागायला,याच्या त्याच्याकडे गेलो नाही

माझाच अंत करण्यासाठी,टपलेले गिधाडे पाहतो मी
शत्रूला मारण्यासाठी,मी कुण्याचा टोळीत गेलो नाही

हे विश्व माझे आहे,हा नभ माझा आहे,सारे दुःख माझे
सुखाचा यादीत माझं नाव,शोधायला कधी गेलो नाही

गुलामीचा बाजार मांडायला,माणसं गोळा झाली होती
मी माणसाशी माणुसकीचा,सौदा करायला गेलो नाही

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
  #sunrisesunset
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

भीम नसता तर....
या देशातलं संविधान नसत
अन संविधान नसत तर
चहावाला पंतप्रधान नसता
महिलाना पन्नास टक्के आरक्षण नसतं
तुझं माझं जीवन बेकार झालं असत

भीम नसता तर.....
या देशातलं संविधान नसत
अन संविधान नसत तर
समान अधिकार नसता
घरासमोर कार नसती
सोन्याची पहाट नसती
गुलामीच जगणं असत
तुझं माझं जीवन बेकार असत....

भीम नसता तर....
पाण्यासाठी सत्याग्रह झाला नसता
पाण्यासाठी तरसलो असता
तू माणूस असून देखील
माणूस झाला नसता
हे जीवन गुलामाच असत
तुझं माझं जीवन बेकार असत.....

भीम नसता तर....
या देशाच संविधान नसत
अन संविधान नसत तर
स्त्री घरातच असती
घराबाहेर पडली नसती
पुरुषां बरोबर चालली नसती
स्त्री च दुःख कधी संपलं नसत
तुझं माझं जीवन बेकार असत...

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

जिंदगीच्या वाटेवर लाख
अडथळे बघूनी आलो
पुन्हा नव्याने जगण्यासाठी
नवा जन्म घेऊनी आलो

धडपडलो पडलो,पुन्हा उठलो
पण कधी हारलो नाही
जे मला हवं आहे 
ती शर्यत आजून जिंकलो नाही

त्या घामाच्या प्रत्येक थेंबात
मेहनत दिसायला पाहिजे
मित्रा तुझ्या भी नावाचा
एक इतिहास असायला पाहिजे

स्वतःमध्ये बदल करत रहा
लोक तुला बघून जळतील
तुझ्यात झालेला बदल बघून
लोक स्वतः मध्ये बदल करतील

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad #lonely
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

जिंदगीच्या वाटेवर लाख
अडथळे बघूनी आलो
पुन्हा नव्याने जगण्यासाठी
नवा जन्म घेऊनी आलो

धडपडलो पडलो,पुन्हा उठलो
पण कधी हारलो नाही
जे मला हवं आहे 
ती शर्यत आजून जिंकलो नाही

त्या घामाच्या प्रत्येक थेंबात
मेहनत दिसायला पाहिजे
मित्रा तुझ्या भी नावाचा
एक इतिहास असायला पाहिजे

स्वतःमध्ये बदल करत रहा
लोक तुला बघून जळतील
तुझ्यात झालेला बदल बघून
लोक स्वतः मध्ये बदल करतील

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

माझ्या प्रेमाची कुणाला,कदर नाही
आई सारखा बायकोचा,पदर नाही

डोईवर एक हात,प्रेमाचा हवा होता
मायेच पांघरून घ्यायला,चादर नाही

हे उसनवारीचे जगणे,नको गालिब
माझ्या मृत्यूची यमाला,खबर नाही

हे जगणं चिल्लर,होऊन बसल आहे
दारिद्र्याच्या घरात,कुणी कुबेर नाही

हवं तिथं जाळा,का जागा शोधतात
या पृथ्वीवर मी एकटाच,अमर नाही

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad #bornfire
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

दिशाहीन झालेली वाट,नव्या वर्षात शोधू
नव्या जोमाने आयुष्याला,नव्या रंग आणू

नव्या स्वप्नांना...नवा आकार द्यायचा आहे
नवी स्वप्न पूर्ण करण्यासाठी,लढायचं आहे

उत्साह एक दोन दिवसांचा,काय कामाचा
केलेला संकल्प,लवकर नाही  विसरायचा

जुने दुःख,जुन्या आठवणींचा विसर व्हावा
नव्या वर्षाच्या आनंद कायम मनी राहावा

जुन्या वर्षाला आनंदाने निरोप देण्यासाठी
तयार आहेत नव्या,वर्षाच्या स्वागतासाठी

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad #newyear
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

रोज दीड जीबी डेटा
संपवण्याचा नादात
आयुष्य संपत चाललं आहे
जसा जसा मोबाईल स्क्रोल
होत जाईल
तसा तसा दिवस पुढे पुढे जात आहे

पोटासाठी जसा आटा लागतो
मानसिक सुखासाठी जसा
रोज डेटा लागतो
बाटा अन टाटा होण्यासाठी
मेहनतीच्या पाच जीबी डेटा
उडवावा लागतो

स्मार्ट फोनच्या या जमान्यात
भूक मात्र हार्ड राहिली
गरिबीची चार्जिंग संपवण्यासाठी
नशीबाची लाईट
दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडली

मोबाईल मध्ये जसा जसा अँप्स
डॉउनलोड होत आहे
तसा तसा शरीराच्या प्रत्येक पार्ट
हळूहळू निकामी होत आहे
इंटरनेटच्या या खेळात
माणूस पण ऑफलाईन सारखा
निरुपयोगी झाला आहे

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad #boat
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

कुछ हासिल कर लिया तो,
आगे की जिंदगी हसीन होगी
अगर कुछ ना कर पाये तो,
लोगो की हसी जिने नहीं देगी

लोगो ने ताने मार मार कर..
मुझको परेशान कर दिया है
कुछ न करने की उमीद मुझे 
अपनी औकात दिखा रही है

यु ही आवरा घुमनसे किसींको,
कुछ भी नही हासिल होता
मेहनत करनेवाला कभी मुझे..
हारा हुवा दिखाई नहीं देता

अगर इरादे मजबूत हो तो,वक्त भी
साथ देता नजर आता है
जो वक्त को नहीं समज पाता,
वो सबसे पिछे ही दिखाई देता है

हार और जितनी की आदत को,
दिल मे सजाकर रखना है
जितनी बार हारा हु,उतनी बार
जित का माहोल बनाना है

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad #DilKiAwaaz
loader
Home
Explore
Events
Notification
Profile