Nojoto: Largest Storytelling Platform
monika2318417777175
  • 49Stories
  • 29Followers
  • 585Love
    1.6LacViews

Monika

  • Popular
  • Latest
  • Video
ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

राजा आमचा महान

राजा आमचा महान #Motivational

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

आयुष्याचे गणित

आयुष्याचे गणित #Motivational

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

शब्द धन असे सोबती

शब्द धन असे सोबती #Love

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

#प्रीत तुझी माझी
ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

रंगा रंगा ने व्यापलेला तू
किती सुंदर निसर्ग तू
रंग बेरंगी फुल मनाला भाळतात
त्यात रम्य होऊन पाहावी  वाटतात

डोंगराची ती मोठी वस्ती
त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी
नद्या नाले ओढे धुंद हवा
कधी जाऊन समोर पहा
झाडाच्या वेळीवर झुलत राहावं
कधी झऱ्यातून चालून पाहावं

आज ही देई तो तीच थंड गार हवा
एक झाड आज ही लावून पहा
प्रेम करा निसर्गावर त्याच्या
सुंदर अश्या मनमोहक रूपावर


निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे
दाण
पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई
त्याचे गुणगान
हेच सार आहे आपल्या मनात
म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या
सानिध्यात

असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी
आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी
असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान
सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान

1

©Monika
  #निसर्ग
ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

प्रेमाच्या त्या नगरीत सख्या दोघेही
जोडीनं जाऊ
आपल्या नवख्या प्रेमाची ही प्रीत
नव्याने लिहू
हृदय एक आहे आपुल
त्यास एकाच स्पंदनाची साथ
ओलांडून उंबरठा बंधनाचा
लिहू सख्या प्रेमाची नवी बात 

रुसवे फुगवे हे पुरावे आहेत प्रेमाचे
एकमेकांना मनवण्यात असतात बहाणे मनाचे
वाहतो वारा घेऊन आसमंत हा सारा
मनातून वाहतो प्रीतीचा हा झरा
तुलना करणं तस तुझ्याशी कोणालाच
शोभत नाही
तुझ्या सारखे रंग त्या इंद्रधनुष्यात
ही नाही

तशी प्रीत तुझी माझी जगावेगळी 
झुलणाऱ्या वाऱ्याला  सांगते ती कळी
तुला म्हणतात धुंद पवन तर
मी आहे गंध कळी
पाहिलेले स्वप्न सख्या आता सत्यात ते उतरावे
रंग वेडे ते ते इंद्रधनु मग लोचणी मज दिसावे

राधेला ओढ  होती कृष्णाच्या भेटीची
तशीच ओढ लागे जिवा तुझ्या एका भेटीची 
प्रीती ची नाती आहेत ही जन्मातरीची
तुझ्या या छंदात  रेशीम बंधात झाले मी खुली
प्रीत तुझी माझी सख्या खरच आहे जगावेगळी

©Monika
  प्रीत तुझी माझी

प्रीत तुझी माझी #मराठीकविता

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

लेकरांच्या खेळण्यातील बनते ती बाहुली
निल्या सावळ्या आभाळाची बनते ती सावली
दिवसभर यंत्रासारखी राबत असते सतत
अंधार झाल्यावर दिव्या वरळी पायली बनते आई
थकलेल्या पाख्रांसाठी घरट बनते आई

आई असे पहिला संस्कार
तोल जाणाऱ्या लेकराचा
हक्काचा तो आधार
आई टिकवे सार घर
आई घडवते घर
आई घराचा मांगल्य
आई चेतन्याचा स्वर

आईच्या मायेची सर जगात या नाही
सतत साऱ्याना माया ती देत राही
आई लाभे ज्याला त्याच्या गाठी
असे जन्माची पुण्याई
आई विना पोरका जो असे
त्याची माय माझी विठाई

नाही होऊ शकत आपण ऋणमुक्त
नाही फेडू शकत तिचे आपण पांग
तिच्या मायेचा हात सतत डोक्यावर असावा
आई आहे पहिला संस्कार
लेकराच्या तोंडातील पहिला उच्चार

©Monika
  #आई
ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

प्रश्न उत्तराचा खेळ आयुष्याचा साथी होता
घडलेला हा मेळ प्रत्येकदा दुरावण्यासाठीच होता
निशब्द मन माझं आज गहिरा सागर होता
चेतलेल्या जाणीवांचा विझला संवाद होता 
विचलित मनाच्या कप्प्यात प्रश्नाच्या गाठी होत्या
निवांत वाटत असल्या तरी पिडल्या उत्तरासाठी होत्या

©Monika विझला सवांद

विझला सवांद #मराठीकविता

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

अबोल क्षणाचे होतो आपण अबोल सोबती
कुठे कळलं होत क्षणाची भेट जन्माची गाठ होती
मनात होणाऱ्या असंख्य हालचालीना शब्द च नव्हते
ते वेक्त करताना
मी भारले होते तुझ्या न झालेल्या स्पर्शाने
तुझ्या त्या हालचाली अनाहुतपणे मला
तुझ्या कडे खेचत होत्या,
बहरलं नात दिवसागणिक आपलं
नवी उमेद, नवीन अपेक्षा, नवं जग त्याने हळू हळू गाठलं
अशीच असू दे तुझी माझी सोबत
क्षणभर ही नको आपल्यात दुराव्याची संगत
मनाच्या तलाशी जाऊन ते रुतत
प्रेमाच नात तर खरच असंच असत

©Monika #सुंदर नाते
ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

तू माझ्या नशिबात आहेस की नाही माहित नाही मला पण खरं सांगू कधी बाप्पा पुढे हात जोडले ना तर तुला च मागायला आवडत मला....माहित नाही मला हक्क आहे की नाही पण तुझी काळजी करायला आवडत मला...तुझ्या वर प्रेम करणं बरोबर आहे की नाही माहित मला पण तुझ्या वर प्रेम करणं आवडत मला.... रोज रात्री झोपी गेल्यावर फक्त एक च स्वप्न असत या माझ्या डोळ्यासमोर आपण सोबत असण्याचा... काही क्षणासाठी मन आनंदी होत.. पण डोळे उघडताच तू नसतो तेथे.. मग काय परत निराशा,कधी तो क्षण येईल जेव्हा आपण सोबत असू, आपण सोबत असणार की नाही हा प्रश्न माझ्या मनात सतत आहे. तरी पण हे स्वप्न पाहायला मला आवडत खूप की तु माझा आहे,कधी कधी कस काही घडतं, त्यामुळे मला वाटत मी खोट्या आशेवर जगत आहे. तू कधी माझा नव्हताच मी उगीच तुला माझा म्हणून त्रास तर देत नाही ना हा विचार येताच मग अश्रू आपोआप त्यांची वाट शोधतात.खरं सांगू अजून ही कळत नाही तू माझा आहे की नाही.

©Monika
  तू माझा आहेस की नाही

तू माझा आहेस की नाही #मराठीविचार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile