Nojoto: Largest Storytelling Platform
thevyankateshkul8905
  • 25Stories
  • 18Followers
  • 295Love
    519Views

THE VYANKATESH KULKARNI

  • Popular
  • Latest
  • Video
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

निरोप तुझा..
अवकाशातील सप्तरंगातून एक रंग मज वदतो आहे
 नयन तुझे हे दिसे स्वच्छ परी, ह्दयआसवे भरतो आहे
काय मिळाले सांग तू मजला
 इतुका लावुनी जीव जनी या..
होती तुजला एक अपेक्षा 
प्रेम मिळावे आर्त मनी या..
रम्य नभातील सुंदर रंगा तुज कळाले बघ माझे भावमन
प्रेम घेऊनी जग हे सोडीन नकोच मजला संपत्ती धन
निखळ शुद्ध बघ प्रेम हे माझे नेशील का तू तिजपाशी रे
तुझ्या कणाचे फुलं करोनी देशील का तू तिजपाशी 
परी ,
कळून चुकले मजला सारे दुरव्याचेच वाहते वारे..
मुळीच नसावे जगी तुझ्या मी हेच असावे सत्य खरे..
सांग जाऊनी तिजला आता..
 तिजसाठी ही अखेर कविता..
सूर पुन्हा उमटविण्यासाठी 
नसेल तिजला कुठला भाता..
गोड भासली साथ तुझी ती साथ हृदयी राहणार आहे 
रंग ठेऊनी तुजपासून मी दूर निघूनी जाणार आहे..
रंग ठेऊनी तुजपासून मी दूर निघूनी जाणार आहे...
💖 सायंकाळच्या कविता 💖
✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️

©THE VYANKATESH KULKARNI #leaf
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

खूप दिवस झाले
खूप दिवस झाले तरीही आठवणीच बोलत आहेत
शब्द तुझे ते श्रवण करण्या कर्ण आतुर झाले आहेत
काय अचानक झाले तुजला 
काहीच मजला कळले नाही
का ऐसी तू वागत आहेस 
कणभर ही मज वळले नाही
सोडून गेलीस मजसी जेंव्हा गर्द सांज ही भरली होती
संदेशतील ओळ वाचता भावभावना सरली होती
दूर जाते शब्द तुझे ते
 दूर मजसी सोडून गेले
भाव माझे कुचंबूनी तू 
सांग सोबत काय न्हेले
ठाऊक नाही मजसी तुझिया मनात नक्की काय आहे
परी,
 तुझ्या विषयी हृदयी माझ्या 
भाव शुद्ध अन् सात्विक आहे..
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #SAD
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

हिवाळा
हिवाळ्यातील तिन्ही सांज ही खूपच शितल स्पर्शत आहे
 गेला वरून आलो मी बघ संदेश गगनी गर्जत आहे 
अवकाशी या धुंद पघ मुक्त पाखरू हिंडत आहे
 गोल फिरुनी झेप घेत मेघा आड दडत आहे
अवती भवती बाळांचा तो आनंद गगनी मावत नव्हता 
प्रत्येक बाल्या हाती मांजा अन् अवकाशी तो पतंग होता 
तांबूस निळसर धुंद नभी या पक्षांचा मग संघ चालतो 
समोर झुलत्या पतंगा पाहून पक्षांना मग प्रश्न भासतो 
की कोण बरे हा आला आहे अवकाशी या नवीन पक्षी
 देहावरती आहे याच्या सुंदर सुंदर रंगीत नक्षी 
गोड दृश्य हे पाहत असता सांज गर्द भरून आली 
उद्या पुन्हा मी येणार आहे असे सांगूनी बुडूनी गेली..
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #nightsky
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

..नभ दाटून आले..

©THE VYANKATESH KULKARNI
  #WoSadak
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

..चातक..
पाऊस ओसरला तरीही आठवांना पूर आहे
 शब्द तुझे ते ऐकण्यासाठी मन हे माझे आतुर आहे
 एकच इच्छा होती हृदयी एक फोन तू करशील मजला
 अजून किती या यंत्रावर मी ऐकू गीते आणिक गजला
 आकस्मित बघ भेट ही आपली परी
 सिद्ध काय आहे ठाऊक नाही 
इतुका काळ लोटूनी सुद्धा मजसाठी तू भाऊक नाही
एक गोष्ट मम सांगच आता काय तुझिया मनात आहे
 बाकी सारे फुलांपरी अन् मीच असा का वनात आहे
रुक्ष वनी या चातका..सम अजूनही मन हे शांतच आहे
चातकप्रेमी वरुणही आला
 परी 
तुजविषयी मज खंतच आहे..
 पण इतुके सारे असूनही देखील एक गोष्ट मी जाणोनी आहे 
सभोवतालच्या बंदिशांनी तुझे आर्तमन बांधुनी आहे..
सभोवतालच्या बंदिशांनी तुझे आर्तमन बांधुनी आहे..
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #SAD
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

तिन्हीसांज ही..
दिवसामधला तिसरा प्रहर
 घेऊन आली तिन्हीसांज ही 
शुभ्र नभवर रंग उधळण्या
 सज्ज झाली तिन्हीसांज ही
परतुनी जात्या पक्षांचा तो 
किलबिलाट सुमधुर होता
आसमंत जणू या पक्षांचा 
सुंदर निरोप घेत होता
फिकट गुलाबी अवकाशी या 
मंद चांदणे दिसू लागले
धुंध वाऱ्यासोबत मग ते
 वेलवृक्ष ही झुलू लागले 
दिवे लागले भवती साऱ्या
 सृष्टी सारी सुंदर झाली 
अन् या दिवसाचे श्रेय घेऊनी 
तिन्हीसांज ही बुडूनी गेली..
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #Hum
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

तु मी आणि समुद्र
रिक्त नभाला पाहत मी समुद्रकिनारी बसलो होतो 
त्या दिवसांच्या आठवात मी खूपच गुंतूनी गेलो होतो
आठवात मी मग्न असता शांत वारा वाहत होता
कायम भरत्या अवकाशी या फिरता एकही पक्षी न्हवता
त्या दिवसातील सायंकाळी सोबत बघ तू माझ्याहोतीस
उधाणलेल्या सागरात या रंगीत स्वप्ने पाहत होतीस
सागरातले खारे जल ते हातामध्ये भरुनी घेतेस 
अति उत्साहित होऊनी जल ते सर्वांगावर उधळून घेतेस
लुप्त झाल्या सर्व आठवणी मागे काहीच उरले नाही
सुन्न असत्या अवकाशाचा मन हे नुसते पाहत राही
आज माझ्या मनापरी तो आसमंत शांत होता
घोंघवणारा वारा देखील शांत निवांत वाहत होता..
सतत सतावी आठवणी या अंत मी याचा शोधत आहे
परी मनातील हा संथ कोपरा वाट तुझी बघ पाहत आहे
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #OneSeason
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

थांब पाखरा
थांब पाखरा नकोसी जाऊस हातावरूनी दूर उडूनी रे 
थांब पाखरा..
जात असता उडूनी दूर तू मन हे तुज बघ पाहत राही
शिवाय तुझिया भवती बघ या दुसरे सुंदर कुणीच नाही 
थांब पाखरा..
क्षणभर बसुनी हातावरती आस लाऊनी निघुनी जातोस
कळते का तुज शांत जीवाला ओढ लाऊनी निघुनी जातोस 
थांब पाखरा..
धुंद थंड या सायंकाळी मायेची बघ ऊब तुला रे
या सृष्टीवर दिधले आहे स्मित रम्य बघ रूप तुला रे
थांब पाखरा..
थांब पाखरा नकोसी जाऊस हातावरूनी दूर उडूनी रे
एका सुंदर चित्रासम या हातावरती रंग भरुनी रे 
थांब पाखरा..
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #TiTLi
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

एक काळ तो सुंदर होता..
एक काळ तो सुदंर होता 
प्रत्येकाच्या हातावरती एक हात तो घट्टच होता
दुरावा हा शब्द गटात न बसणारा होता
नात्याशिवाय दुसरा विषयच न्हवता
तो काळ फक्त सुंदरच होता..
घरी येत्या माणसांना पोटभर जेवण देत होता
घरी येत्या पाहुण्यांचे वाकून आशीर्वाद घेत होता
अमर्यादित मुक्कामाला त्याचा कधीच नकार न्हवता
तोच काळ सर्वांचा खराखुरा आधार होता
परी,
आज ती साथ नाही आज ती बात नाही
सर्व जवळ आहेत पण कोणीच जवळ नाही
चांगल्याची किंमत आहे, कळतंय पण वळत नाही
समोर उभा हा आपला माणूस परी, 
चहीऱ्यावरती तेज नाही
मनात इच्छा खूप आहे पण कृतीतून ते उतरत नाही
तीच माणसं तेच चहिरे पण , बुध्दी जुळऊन घेत नाही
इतका बदल होऊ शकतो?विचार सुद्धा करवत नाही
आज सगळे आहेत पण सगळ्यांच्यात सगळे नाहीत
काळ बदलत चालला आहे अजून बदलणार आहे
काळ बदलत चालला आहे अजून बदलणार आहे
पण जाता जाता एक सांगतो ☝️ की,
मनुष्यजन्म हा एकच आहे
 मनुष्यजन्म हा एकदाच आहे..
©️✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️©️
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #chai
b1ec514340b90105beec91bbc296837f

THE VYANKATESH KULKARNI

जाऊ नको दूर बाबा..
अबोल होती एक परी ती कधीच कुणाशी बोलत नसे
काय वर्णू मी तिचे वर्णन विषयाला या शब्द नसे
तरीही मनी या वाटूनी जाते थोडेसे बोलावे तिच्याशी
काय आहे मनातील त्या खोल खोल गाभाऱ्याशी
पाहत असता तिच्याकडे मज खूप काही दिसून गेले
अस्थिर तिच्या त्या नयनांनी मग पाण्याचे हे प्याले भरले
थरथरणाऱ्या अनामिकेने नयन तिचे मी पुसू लागलो 
काय झाले सांग मज मी प्रश्न तिला हा पुसू लागलो 
उदास असत्या चहिऱ्याने ती खूप काही मज सांगत होती 
शब्द तिचे ते ऐकत असता चंचलता मम भासत होती
 घरात तुम्ही नसता बाबा खूप भय मम भासत असे
 एकांता या घाबरून मी कोपऱ्यात मग गप्प बसे
खुळखुळणारी भातुकली हीशांत स्थिर ती पडून असते
 तिच्या न माझ्या शिवाय घरी या खेळायला कोणीच नसते
 मनातील ते शब्द परीचे शब्द परिचे हृदय माझे जाळत होते
 नयन स्वतःवर जणू अश्रूंचे मोतीच मोती माळत होते
 ती ही चिमुकल्या तीही चाफेकळीने नयन माझे पुसू लागली 
माझे अश्रू पाहून मग ती गोड चिमुकली हसू लागली
 इतकी माया पाहून मम अश्रू अनावर झाले होते 
अपर्यायी मन हे माझे त्याच अश्रूत न्हाले होते 
अश्रूच बहुदा माझे तिला सर्व काही सांगून गेले 
म्हणून मुकले कोवळे फुलते ते
 शांत निरागस निजूनी गेले..
💖✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️💖
💖 सायंकाळच्या कविता 💖

©THE VYANKATESH KULKARNI #HappyDaughtersDay2020
loader
Home
Explore
Events
Notification
Profile