Nojoto: Largest Storytelling Platform
pournimamohol1872
  • 43Stories
  • 29Followers
  • 600Love
    20.2KViews

Pournima Mohol

Teacher,poetess writer

  • Popular
  • Latest
  • Video
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

White 

      बंध रक्षणाचे 

डोक्यावर भावाची छत्र छाया ,
पक्क्या धाग्याची माया....
झुला बहिणीचा जाई पक्षांसम आकाश भेदाया,
जिच्या पाठी उभा भाऊराया...

श्रावण पौर्णिमेचा सण,
बहिणीचे माहेर 
भावाचे आंगण...
बालपणीच्या आठवणींचे कोंदण,
माय बापाच्या संस्कारांचे शिंपण....

असा रक्षा बंधनाचा  गोडवा,
जपतो नात्यातील ओलावा...
कधी ना अंतर ना दुरावा,
ओवाळते बहीण लाडक्या भावा...

रक्षाबंधनाचा वारसा जपावा,
बंगालच्या ताईला देशबांधवांनी न्याय द्यावा,
द्रौपदीस बंधू शोभे नारायणाचा जयघोष सर्वत्र  दुमदुमावा,
अन् विकृतीचा लोप व्हावा...

# पौर्णिमा मोहोळ
18-08-2024

©Pournima Mohol
  #raksha_bandhan_2024
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

White आठवणीतला पाऊस

पाऊस होता कधी मला हवा हवासा ,
तुझ्या संगतीत इंद्रधनुचा कवडसा
भिजून तुझ्या प्रेमात                   (पौर्णिमा)        
मी न्हाऊन निघत होते,
तू सोडून जाता केवळ अश्रुंचेच
पाट वाहत होते,
वाटलेच नव्हते 
पाऊस असा कधी हरवून जाईल,
तू दूर जाताच वेदनेची वीज 
चमकून जाईल....             P. Mohol
पाऊस आता उरलाय 
फक्त माझ्या डोळ्यांत
अन् तुझ्या आठवणी पावसातल्या
माझ्या हृदयात....
#Pournimq Mohol
28-07-2024

©Pournima Mohol #sad_shayari
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

White आज मेरे शहर में बारिश हुई
और उनके शहर में भी,
फर्क सिर्फ इतना था कि
इधर घटा आंखों से बरस रही थी और उधर आसमान से....
#Pournima Mohol

©Pournima Mohol
  #love_shayari
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

White आज मेरे शहर में बारिश हुई
और उनके शहर में भी,
फर्क सिर्फ इतना था के यहाँ घटा आंखों से बरस रही थी और वहाँ आसमान से.....
#Pournima Mohol

©Pournima Mohol
  #love_shayari
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol


अवकाळी
अवकाळी तो बरसून गेला  पडझड करून गेला  घराची
आणि मनाचीही...

आला आणि मागे खुणा सोडून गेला
त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही ....

कोणी म्हणे निसर्ग कोपला,
कोणी म्हणे माणूस चुकला,
अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही...

अवकाळीच खोपटात पाणी शिरले
अन् डोळ्यांतून वाहू लागले,
अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही ,
पिके नासली आणि माणुसकीही ....


घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? 
पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक  तग धरेल काय...?

म्हणून येताना काळ वेळ बघून ये ,
अवकाळी बरसू नको...

काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती...

प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना,
सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना....

# Pournima Mohol
16-05-2024
7:00a.m.
Copyrites reserved

©Pournima Mohol
  #Barsaat
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

अवकाळी
अवकाळी तो बरसून गेला  पडझड करून गेला  घराची
आणि मनाचीही...

आला आणि मागे खुणा सोडून गेला
त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही ....

कोणी म्हणे निसर्ग कोपला,
कोणी म्हणे माणूस चुकला,
अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही...

अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही ,
पिके नासली आणि माणुसकीही ....

घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? 
पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक  तग धरेल काय...?

म्हणून येताना काळ वेळ बघून ये ,
अवकाळी बरसू नको...

काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती...

प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना,
सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना....

# Pournima Mohol
16-05-2024
7:00a.m.
Copyrites reserved

©Pournima Mohol
  #Barsaat
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

Dear December,

Wearing the crown of the
show stopper of the year,
Bidding a farewell with smile and tear,
There you come with shiver and quiver...

With the bells ringing in the churches and the chapel,
the gifts of  the Santa and the prayers of the Raphael...

With the Christmas tree of Bethlehem,
Mother Mary and Jesus Christ
Come Lord Amen .. 
 
With the building of a snowman 
wiping the sins of the whole year, dear December sliding in the sleigh of reindeers we could hear 
the jingle of the New year... 

# Pournima Mohol
25-12-2023

Merry Christmas and Happy New year

©Pournima Mohol
  #christmascelebration
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

Eternal Lullaby

Soothing breeze 
and silent nights
forgotten lulls come to my mind...

That childhood peace
Life at ease
Those lullabies sung
Sound sleep and dreams... 

Now I could feel rough rattling storm
Frozen lullabies
and voices harsh... 

Now my  luxurious couch pricks me
and dream comes rare, 
for now the childhood fairy tales have shaped up to 
night mare...

Time has fleeted
Lulls forgotten
yet chants in my mind
that Lullaby eternal... 

That motherly Lullaby eternal.... 

#Pournimas
Poetry
From Pournimas desk 29-11-2023

©Pournima Mohol
  #onenight
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

तमाचा अंधार, 
षड्रिपूंचे वादळ, 
तशात माझी 
जीवन नौका ,
हेलकावणे अटळ...
वाऱ्या सम 
वेग मनाचा
आवरता आवरेना,
देवालयातला देव 
मज कुठे दिसेना...
मनाची होता 
गुंता गुंत ,
आठवले मज संत,
तुका,सावता,गोरा,चोखा अन् ज्ञानिया सारखे महंत ...           
 सत्व गुणांचे मग मेघ दाटले ,
काम ,क्रोध वाहून गेले,
लोभ ,मोह,मद,
मत्सर मातीत निमाले...
मज आता दिसू लागले ज्ञानाचे स्वयं प्रकाशित किरण,
सत्वाने स्वत्व शमले
चढले स्थितप्रज्ञतेचे स्फुरण...
 #Pournima Mohol 
21-08-2023
12:20 a.m

©Pournima Mohol
  #ChaltiHawaa
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol


जेव्हा शब्द मुके होतात 
तेव्हा लेखणीही थांबते
डोळ्यातून व्यक्त होताच
लेखणीतील ओळ थेंब झेलते...
मुक्याच भावना साऱ्या 
व्यक्त होतात मुक्याने
पाट वाहतात मग 
मनातील अबोल ओझ्याने...
  नयन वाचून 
 अंतरंग मी लिहीत जाते
नीरव शांततेत स्वतःला ओळखत जाते
मनाशी मनाचा संवाद करत जाते...
मुक्या झालेल्या शब्दांना मग मनात येतो महापूर
झरा वाहतो मग शब्दांचा 
पण ओठांवर असते तरीही 
एक अबोल धून...

एक अबोल धून
जेव्हा शब्द मुके होतात......
#Pournima Mohol
11-06-2023.
04:00p.m.

©Pournima Mohol
  #merikHushi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile