Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6718378530
  • 9Stories
  • 1Followers
  • 60Love
    168Views

क्षितिज

  • Popular
  • Latest
  • Video
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

प्रत्येक माणसाची नसतात स्वप्न मोठी
भीमासमान यावा जन्मास लेक पोटी
आले निघून गेले कित्येक लोक येथे
स्मरणात फक्त आहे भिमराव नाव ओठी

©क्षितिज #BhimraoRamjiAmbedkar
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

सून-सासूचे गऱ्हाणे सांगण्याला अर्थ नाही
वारला तो ताव नुसता आणण्याला अर्थ नाही.

फक्त असती कोंडवाडे आज वाघाच्या नशीबी
मांजराच्या त्या गुवाचा जिंकण्याला अर्थ नाही.

लोकशाही ढासळू दे हुकुमशाही आसळू दे
ज्येष्ठ असतो ज्येष्ठ येथे आज याला अर्थ नाही.

हे सनातन कर्मकांडे संसदेला भारताच्या
धर्मनिरपक्ष देश भारत सांगण्याला अर्थ नाही.

झुंड खाकी झोंबली तर भरवसा येथे कुणाचा
माणसाला हक्क आहे,सांगण्याला अर्थ नाही.

जाग आली जर तुला एल्गार कर तू पँथरासम
खंत भक्तीने जगाच्या लोळण्याला अर्थ नाही.

©क्षितिज 
  ##ला अर्थ नाही.

##ला अर्थ नाही. #मराठीशायरी

c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

साधारण लोग धर्म को सत्य मानते है,
बुद्धिमान झूठ और
शासक हथियार l

©क्षितिज
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

डोळ्यात आसवांना का शोधते बहाणे
कांदा समोर असता ती टाळते पहाणे.

लग्नात सात फेरे घेते जरी तयाशी
माझेच नाव घेती सारे तिचे उखाणे.

इतका प्रभाव माझा झाला कसा तिच्यावर
उरले कुणीच नाही माझ्याहुनी शहाणे.

विद्वान संत सारे वारीस काल गेले
मसणी दलाल बसले खोलून रे दुकाने.

विसरून जा म्हणालो आता तरी क्षितीजा
संसार थाट त्याचा जा नांद तू सुखाने.

©क्षितिज
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

पाऊस फार झाला आभाळ फाटल्यावर
धुरके ढगातली ही डोळ्यात दाटल्यावर.
ती हुंदकेच देते खांद्यावरून माझ्या,
वाटे असेच व्हावे ती रोज भेटल्यावर.

©क्षितिज
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

सारेच धाव घेती शोधायला सुखाला,
शोधून सापडेना का माझिया दुःखाला.

प्रिये उगीच आता दगदग कशास करते
एकेक अंग माझे तू  काढ गं विकाला.

©क्षितिज
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

का ओरडून सांगे ती माय लेकराले
उरला समाज नाही थोडी मदत कराले
भोंग्यात गुंग झाले इथले अबोल प्राणी
माणूस तो असोनी जाते गवत चराले

©क्षितिज
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

सरपण...
पोटात कावळ्यांनी भलताच सूर केला 
सरपण चुलीत जाता डोळ्यात धूर गेला

पाण्यात पार भिजल्या काड्या सुक्या सुकेल्या
तांदूळ पीठ सारे वाहून पूर नेला

उज्ज्वल योजनेला बघ सबसिडी मिळाली
खाता रिता अकाली त्याने जरूर केला

आश्वासने मिळाली साहेब फार तेव्हा 
निवडून आज येता चकणाच चूर केला

आभाळ भेदती रे पेट्रोल भाव सारे
क्षितिजावरी सवारी मांडून टूर नेला

नाहीत दूर आता शतके डिझेलचीही 
ओकून आग सारी माणूस धूर केला

का वागतो असा रे माझा प्रधानमंत्री
दावून मुंग मजला हिसकून तूर नेला.

©क्षितिज
c686f8c0f094e5ceb2c6777684c8dd0a

क्षितिज

नाती...

घेऊन चंद्र पाहे ती आपल्याच हाती
केलं मलाच तीने जिवनात धूळ माती.

सोडून मी तुला रे जाणार ना कधीही
आश्वासनेच नुसती बिलगून सांज राती.

लग्नात बोलवूनी नवऱ्यास सांगते ती 
ही नामशेष झाली जीवनातली प्रजाती.

काळीज फाटले पण जिव लावला तिच्यावर
ती सांगते जगाला मैत्रीण फक्त होती.

गेली अशी उडूनी वाऱ्यास थांग नाही
सांगू कसा कुणाला ती आपलीच होती.

डोळ्यातले अश्रू आता वाट शोधते रे
एकांत सापडेना थकलो जपून नाती.

देहात प्राण नाही उरली सडीक हाडे
फुगवून सांगते बघ छप्पन इंच छाती.

का रीत ही जगाची इतकी भकास झाली
मसणात हासणारी ही जन्मली प्रजाती.
                        
वृत्त- आनंद कंद
लगावली - (गागालगा लगागा गागालगा लगागा)

©क्षितिज


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile