Nojoto: Largest Storytelling Platform
rajeshmule3577
  • 6Stories
  • 29Followers
  • 58Love
    35Views

rajesh mule

  • Popular
  • Latest
  • Video
ceff72cda39c9ecdfbc199f68916f5df

rajesh mule

तेंव्हा डियर शाळा...!!

डियर शाळा सांग ना काय शिकू?
तुझ्या वर्तनवादी पद्धतीतून कस शिकू?
जिथ गुरूजी शिकवतात त्यांच्याच मनासारख
तुझ्या भिंती दगडाच्या नको वागुस दगडासारख
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू?

ही भूक भाकरीची असती तर रेशनिंग
किडक धान्य खाऊन शमली असती
"असर" चा असर होऊन गुणवत्ता वाढेना 
अन् दफ्तराच ओझे कमी करता होईना 
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकु? कसा शिकू?

लावली जाती शिस्त त्यासाठी शिक्षा 
ठरवतात आमची गुणवत्ता ह्या सत्र परीक्षा
अन तेव्हा बक्षीसांचे अमिषही सोबतीला
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू?

गृहपाठ, पाठांतरमुळे आकलन दुरच 
यात मायबापाला वाटतय लेकरू अभ्यासू झालय
पण माझ पुढे पाठ मागे सपाट अस ज्ञानाला रूप आलय
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू?

गुरूजी तुमचा मार अन् अपमान शिकणंच थांबवतात
कारण तेंव्हा आमच्या मेंदूच्या भावनाच भांबवतात
भावना होतात जोरात अन् आम्ही मात्र त्याच स्तरात
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू?

प्रश्न न विचारू देण अन शैक्षिणिक वातावरण नसणं
आम्हाला हेच हायस वाटणं
तरीही आपला 'प्रगत शैक्षिणीक महाराष्ट्र' 
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू?

झाल गेल ते विसरून जाऊ 
विद्यार्थीकेंद्री नवशिक्षणाच विश्व नव्याने उभारु
शिकेल मी स्वयंप्रेरणेतुन स्वतः च्या अभिव्यक्त वचनाने
तयार होतील संधीप्रधान शाळा माझ्या ज्ञानरचनेने 
तेंव्हा ती माझी डियर शाळा तूच असशील !!
____________________________
   ( राजेश नंदा व्ही. मुळे) Dear Shala

Dear Shala

ceff72cda39c9ecdfbc199f68916f5df

rajesh mule

कवी ता

कवी ता

ceff72cda39c9ecdfbc199f68916f5df

rajesh mule

माही शाळा...तुझी स्कुल

माह्या शाळेतलं शिक्षण 
तुझ्या स्कुलातलं एज्युकेशन 
मिळतं नाही ना सारखं 
तेंव्हा माही शाळा अन तुझी स्कुल
यातलं अंतर मला दिसलं....

तुझ्या गेटावर गार्ड जायला स्कुल बस 
अन शिकवायला गोड बोलणाऱ्या बाई 
मला लय आवडलं कारण 
माझ्या शाळचं मोडक तोडक गेट 
बाई सर त्यांच्या सरकारी कामात 
तेंव्हा माही शाळा अन तुझी स्कुलयातलं अंतर मला दिसलं....

माही माय सांगत व्हती की शाळची बस 
बिल्डिंग, काही नसलं तरी शिकलं पाहिजे
पण आमच्या वर्गात आम्ही शिकायचं
तर गुरुजींनी च गायब असायचं 
तेंव्हा माही शाळा अन तुझी स्कुल
यातलं अंतर मला जरा स्पष्टच दिसायचं...

मव्हा बाप एकदा तुह्या शाळत कामाला आला हुता 
सांगत हुता तुझे वर्ग फारच दिखावेदार
बसायला, शिकवायला मोठं मोठ्या टीवह्या 
प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या खोल्या  
आमच्या वर्गात मात्र गोंधळा शिवाय दुसरं काहीच दिखावेदार नसायचं 
तेंव्हा माही शाळा अन तुझी स्कुल यातलं अंतर मला दिसायचं...


माहीत नाही गड्या तुह्या सारख मला कधी 
शिकायला मिळलं
अन तुझ्या माझ्यातल हे दोन किनाऱ्यावरच 
अंतर केंव्हा संपल, 
तेंव्हा तरी हीच अपेक्षा
  माही शाळा अन तुझी स्कुल एकच असेलं....

     राजेश नंदा व्ही.मुळे
 (दोन शाळांच्या बांधावरण)









 

ceff72cda39c9ecdfbc199f68916f5df

rajesh mule

 चित्र आपोआप पूर्ण होतं
जोडताना कणाला कण !

चित्र आपोआप पूर्ण होतं जोडताना कणाला कण ! #nojotophoto

ceff72cda39c9ecdfbc199f68916f5df

rajesh mule

....तू

....तू

ceff72cda39c9ecdfbc199f68916f5df

rajesh mule

टपोऱ्या डोळ्याची मैत्रीण....

तू आलीस तुझे लक्ष्य घेऊन 
नवे जुने रस्ते धुंडाळाया
चालत राहा मन लंबकाच्या पुढ्यानं
मन देत जाईल पर्याय- पर्याय #टपोऱ्या_डोळ्याची_मैत्रीण


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile