Nojoto: Largest Storytelling Platform
prasadshendage5325
  • 46Stories
  • 104Followers
  • 268Love
    175Views

Prasaad Shendage

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

  • Popular
  • Latest
  • Video
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

होता होता,
राहूनी जाते,
मनासारखे काही....
होईल कधीतरी मनासारखे,
पण जगासारखे नाही....

©Prasaad Shendage
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

शब्दांत गुंतुनी जाता,
मज भान कशाचे नसते...
गर्दीत स्तब्ध हा देह,
शब्दांचे वादळ नुसते....
भाबड्या मनाच्या ओळी,
भाबड्या भावना टीपते....
मग अशीच होते कविता,
जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss.

©Prasaad Shendage #जेव्हाभानकशाचेनसते#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

कोवळ्या पंखास माझ्या,
उडण्याचे बळं दिले...
बेभान माझ्या आयुष्याला,
जगण्याचे भानं दिले.....
त्याग तुमचा खूप मोठा,
आयुष्य सारे
 आम्हांसाठी खर्च केले...
कसे सांगू ,काय सांगू,
येते भरून डोळ्यांत पाणी,
शब्दांत नाही मावणार,
मनातले सारं काही...
मनातले सारं काही....

©Prasaad Shendage
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

आकार,उकार, मात्रा,वेलांटी,
ह्या फक्त शब्दांना असतात...
पण..,
भावना मात्र साध्या आणि
सरळ असतात.....

©Prasaad Shendage #शब्दभावना#सुचलेल्या ओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

क्षण.. सुखाचे सोबती,
क्षण.. दुःखाचे सारथी...
क्षण.. मृगजळाचा टिळा,
क्षण.. लावतो हा लळा...
क्षण.. भावनांचा पसारा,
क्षण.. वेदनांचा निवारा...
क्षण.. भाबडा हा दिलासा,
क्षण.. सारखा हा  हवासा...
सुचलेल्या ओळी..✍️

©Prasaad Shendage #क्षण#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

ह्या मनाचे भाव भोळे,
अंतरीचे घाव ओले...
ओथंबून बघ आले वरती,
मनातले ते शब्द सारे...!!
प्रसाद शेंडगे..✍️

©Prasaad Shendage #भाव #सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

ऊन कोवळे गालावरती,
नजरेत धुक्याचे सावट होते...
किलबिल भोवती पक्षांची ही,
मृगजळ मनाला भावत होते....

सुचलेल्या ओळी..✍️

©Prasaad Shendage #धुक्यातलेऊन#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
#CalmingNature
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

आसमंत आणि अंत,
ह्या जिवा नसे उसंत...
शब्द कोरले उरांत,
ना दुःख ना कसलीही खंत...!!

©Prasaad Shendage # आसमंत आणि अंत # सुचलेल्या ओळी. #प्रसाद शेंडगे.✍️#

#bestfrnds

# आसमंत आणि अंत # सुचलेल्या ओळी. प्रसाद शेंडगे.✍️# bestfrnds

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

होता होता,
राहूनी जाते,
मनासारखे काही....
होईल कधीतरी मनासारखे,
पण जगासारखे नाही....!!

प्रसाद शेंडगे.✍️

©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

दाह पेटला,
उरात आता,
डोळ्यांत उभा अंगार....
भेदून टाक तु,
क्षणात आता,
हा धगधगता अंधार.... 

प्रसाद शेंडगे..✍️

©Prasaad Shendage
loader
Home
Explore
Events
Notification
Profile