Nojoto: Largest Storytelling Platform
rajendrkumarbhos6191
  • 676Stories
  • 136Followers
  • 8.2KLove
    4.6LacViews

Rajendrakumar Jagannath Bhosale

अध्यक्ष,वार करी दल ,(WKD,Ind)

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

आदिनाथ अंशू आवडे सर्वांगावरती बभूत सापडे

निसर्गातील जीवसृष्टीचा अंत माझ्याच रंगात बदल होऊ संथ

नेई निरोप कबुत्र शांतीदूत रंग राखाडी शौभे आदीभूत

©Rajendrakumar Jagannath Bhosale #Bhai_Dooj
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

इस्लामपूर मतदाराच्या हृदयातील 
 जयंतराव पाटील नेता लय भारी || धृ ||

 विद्याविभूषित शुध्द चारित्र्य प्रज्ञा वान 
किसान कष्टकरी जनतेमध्ये बहुमान 
 विरोधक ही देतात साहेबाना सन्मान 
 विकसित केली वळव्याची खोरी ।। ।

विजय पथाचा शिलेदार आमचा लोकनेता
 बहुजन कंठ गर्जतात तूच आमचा त्राता 
काळजातूनी हाक देते आज भारतमाता 
बहुमताने निवडून देऊ तुतारी  ll 211

कटिबद्ध हे महिलांसाठी सबलीकरण 
न्याय सत्यवादी नेता जपे स्वाभिमान
 संघर्षाने विश्वासाने समाज उद्धरण
  बहुमत देण्या करु मतदान  सारी ll ३ll
कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले 
९७६७७७७१०८

©Rajendrakumar Jagannath Bhosale #happy_diwali
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग 115

पाण्याविना  जीव नाही, प्रपंच सर्वत्र पाही 
कर्मा मध्ये देव राही, संसारात ll धृ ll

त्रिगुण जो त्यागुनिया, निर्गुण जो जाणोनीया 
सोहं नाद जाणोनीया, मोक्ष रेघे ll 1ll 

 सर्वत्र भरून उरे , त्या काळालां  जो स्मरे,
  पैलतिरी जाती सारे,राजे म्हणे ll 2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #GoodMorning
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

White ज्यांनी पूर्वजांच्या तत्त्वांचा कडीपत्ता केला 
त्यांचा कडीपत्ता व्हायला वेळ लागत नाही 

अजून वेळ गेली नाही त्या द्रष्ट्या विचाराची 
कर बदल सोंग टाकून सत्य स्वीकारण्याची

अर्धवट स्वार्थी माणसावर नको ठेवू विश्वास 
पैशासाठी बेगडी विचार हाच त्यांचा ध्यास 
  
स्वतः आहेस कोण, जाणून घे, उमजून घे
जन माणसातील खरा माणूस समजून घे,

दैव घडवण्या प्रयत्नाची ठिणगी विजवू नको 
धुंद परक्याच्या सावलीतून झाड लावू नको 

त्या पुरोगामी पूर्वजा प्रमाने करा आचार 
घराघरात पोहचवा लोकशाहीचा विचार

©Rajendrakumar Jagannath Bhosale #good_night
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

White दिवाळी तील लाडू दगड झाले, किंवा भुरा येऊ लागत की 
हाक यायची अण्णा  दिवाळी न्या नातवाला 
अण्णा धोतऱ्याच्या सोग्यात मिळेल तो जिन्नस 
घरी घेऊन यायचे दगडाने फोडून वाळत घालायचे 
वास कमी झाला की  नातवंडांना द्यायचे 
न उडालेल्या फाटाक्या शोधून त्यातील दारू बाहेर कादून 
विस्तवावर टाकून आवाजाचा आनंद घ्यायचा 
चुलता मुंबई मधी हमाल, गावी येताना मांजरपॉट कापडाचा 
तागा आणायचा त्यातच  शिपाच्या घरातील लाकड फोडून, गोठा साफ करुन कपडे शिवून मिळायचे एक हात लांब तर एक हात आखूड 
शिक्षणाने परिस्थिती बदलली, घटने १७वे कलम बाबासाहेबांनी घातला तेव्हा कुठं पोर शिकू लागली हॉस्टेल च्या कच्च्या भाकऱ्या खाऊन, दिव्यावर अभ्यास करी कधी कधी आईच्या भाकऱ्या भाजत असताना अभ्यास होई एकदा आईचा स्वयंपाक झाला आईने पेटत लाकूड विझवल ',"अग आई काय केलंस माझं गणित च्या शेवटच्या पायरीला आलो तेव्हा आई म्हणाली बाबा भाकरी झाल्या उद्या ची चिंता हाय  सैपाकाची......

©Rajendrakumar Jagannath Bhosale #love_shayari
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

दुसऱ्यास दोष काढी, अधोगती स्वतः ओढी 
कर्मगती चक्र फेडी, याच देही ll धृll 

 घेऊनी सोंग संताचे  ,करी ढोंग दैवत्वाचे 
साप विषयदरीचे, चहू बाजू ll १ll 

धर सत्कर्माची कास, हरीहराचा जप ध्यास 
संपेल संचीत रास, राजे म्हणे ll २ll 

कवी गायक, संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

©Rajendrakumar Jagannath Bhosale #GoodMorning
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

श्री मळाई माझी  माय माऊली 
देई कृपेची सावली ll धृ ll 

कमळभैरी बंधू जोडीला 
 वसतसे जखिनवाडीला 
देवीने भस्मासुर मारीला 
शिव रक्षा करण्याला 
जगनमाता माय धावली ll 1ll 

अठरापगड जाती जमाती 
उत्सवात दिवटे धरती 
ढोल ,हलगी वाजवती 
हार जागर दुपारती
जमली सारे भक्त मंडळी ll 2ll 

कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले 
मो क्र 9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_quotes
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

स्वप्न पहिली पंचायत राज्याची 
लक्तर झाली जाती जमातीची 

मांगाची दोर घेतली गरवारे नी 
चपला बूट विकल्या बाटानी 

ग्राम संकल्पना फक्त कागदावर 
इथ लोकशाही फक्त नोटांवर 

 सत्ता संपत्ती फक्त क्षेत्रपालाकडे 
घाम मोलमजुरी उरली  मजुराकडे 

अर्थ नाड्या भांडवलदारा कडे 
सत्तेच्या चाव्या मूठभरांकडे 

गांधीजींची माकडे झाली चार 
मोबाईल मुळे गुंगलेत  फार 

वाट पाहतो नव्या विचाराची,
शुद्ध आचाराची, सूव्यवस्थेची

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_qoute
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

अभंग क्र११२

जाणतेन कर ध्यान, निर्मोही जप मौन 
अपरोक्ष घेई ज्ञान, मोक्ष रेघे ll धृll 

शत रिपु त्यागोनिया, दसेंद्रिये भोगोनिया 
अष्ठसिध्दी अव्हेरूनी, व्रत करी ll १ll 

एका नित्य धरी आरी, गुंफी निर्गुणाची दोरी 
   सद्गुरू कृपा करी, राजे म्हणे ll २ll

कवी गायक, संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

©Rajendrakumar Jagannath Bhosale #Sad_Status
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

वादळात भीमज्योत झाली या मंद
बाबांच्या विचारांचा जडवा तुम्ही छंद
भीम जयंतीला मला झालाय आनंद...॥ धृ ॥

राजकीय विचाराने जनता झालीधुंद
बेगडी विचारांचे वाटे पुढारी पुंड
पुरोगामी सैनिकांना अडवतात गुंड
राजकीय सत्तेसाठी जमवून झुंड ॥1॥

फुले शाहू आंबेडकरी विचारांचा लढा
तेव्हा सुटेल अस्थिरतेचा तिढा
समानतेच्या रथाचा घ्या वेढा
परिवर्तनाच्या चळवळीचा शिकवू धडा ॥2
.  
. पंचशील त्रिशरण  बोधी सत्व 
आचारूनी जाणुया बुद्ध तत्व.        
  विज्ञानिष्ठ जीवनी करु कर्तृत्व    
   जागृत सजग बनू   वाढवू महत्व ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile