Nojoto: Largest Storytelling Platform
rajendrakumarshe9173
  • 307Stories
  • 177Followers
  • 2.9KLove
    10.8KViews

Rajendrakumar Shelke

  • Popular
  • Latest
  • Video
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

White 
विषय - लोभ.
*****************************
लोभ नसावा कधी 
कोणास कशाचा,  
      मातीत मिसळून जातो        
 हा देह चंदनाचा. 

मिळेल त्या भाकरीवर    
  आनंद मनी शोधावा,     
कष्टाचा मेवा नेहमी 
अंतरी असाच असावा.
       
      नको त्या गोष्टीसाठी        
स्वतःलाच विसरतो,
अखेर प्रलोभनांना 
बळी  का पडतो.?

    माणूस असा घडावा.     
     मृत्यूनंतरही त्याचा,        
अंतरंग तो पाहता 
सन्मान होई चारित्र्याचा...!
--------------------
राजेंद्रकुमार शेळके .
- नारायणगाव, पुणे .

©Rajendrakumar Shelke #Sad_Status
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

White सत्तेतल्या  पदांचा
 बाजार असा मांडला,
नारा आहे जय शिवाजी,
हाती फक्त निजामशाही.
 निवडणुकीत या  रावणाला
शोधून काढू पाहे.
-------------------------------
कवी.राजेंद्रकुमार शेळके.
- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke #Dussehra
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

White   *हायकू*

असा रंगला          
                      खेळ हा सावल्यांचा                            
  या निसर्गाचा.       
  -----------------------------
    राजेंद्रकुमार शेळके.
नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke #sunset_time
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

#mothernature
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

✨🌺✨  एक मनोगत ✨🌺✨
_*जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात... सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की अपोआप सुटतात.*_
_*समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात.*_
_*प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही... काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात...*_
✨🌺✨ *_संस्कारधारा_*✨🌺✨

©Rajendrakumar Shelke
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

#dharm
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke



शब्दांचा तू दास! कृपा त्या प्रभूची! 
शान भंडाऱ्याची!!तुझ्या सवे!!१!!

कीर्तनात मिळे! ज्ञानाचा प्रकाश! 
तुकोबाचा अंश! ठायी ठायी!!२!!

इंद्रायणी काठी! भंडारा डोंगर!
घेई खांद्यावर! भार सारा!!३!!

ध्यास तुकोबांचा! मनोमनी दाटे!! 
वाटेवरी काटे! सन्मार्गाच्या !!४!!

चिखलात रुजे! पंकज नावाचे! 
कमळ देवाचे!ज्ञानामृत!!५!!

       कवी -  राजेंद्रकुमार शेळके.
         -- नारायणगाव,पुणे.

©Rajendrakumar Shelke
  #delicate  to Pankaj Gawade

#delicate to Pankaj Gawade

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

*का असा खेळ मांडला..!*

*मी एकटाच आलो नाही*
*मला युगाचीही साथ आहे,*
*सावध अशा तुफानाची*
*हि तर सुरुवात आहे.*
-- राजेंद्रकुमार

राज्यातील माझ्या लाखो शेतकरी बांधव,भूमिपुत्रांना या लेखाद्वारे मी आवाहन करत आहे की,आता तरी आपण आपले डोळे उघडा, राजकिय नेत्यांना, मेंढ्यांच्या वेषात वावरणाऱ्या सफेद लांडग्यांना व काही ठराविक प्रसार माध्यमांना संघटित होऊन त्यांची लायकी वेळेतच दाखवा.अन्यथा माझा बळीराजा आज भिकाऱ्या पेक्षाही दयनीय अवस्थेत आहे. प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अगोदरच जुगाड बांधलं आहे. यांनी पॉर्न फिल्म बनविली,त्यांनी पैसे खाल्ले,याला निलंबित केला, त्याची उचलबांगडी केली, या खासदार - आमदारांचे निलंबन केले,याला         आरक्षण पाहिजे त्याला आरक्षण पाहिजे.जो उठतोय तो उपोषणाला बसतोय.कोणाला काहीच कळत नाही.सगळे वजीर यांच्याच हातात.शेवटी त्यांना जे पाहिजे ते साध्य करतात अन यातच सारे राज्य अधोगतीला जात आहे.खरंतर विकासाकडे वाटचाल करायच्या ऐवजी आपण आज अजूनच खड्ड्यात पडत चाललो आहे. भिकारी आजही भीक मागूनच खातो,मेंढ्यांच्या वेशात वावरणारे सफेद बगळे आजही आपला खिसा भरत आहे.श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय,तर गरीब भिकेला लागला आहे आणि मध्यम वर्गीय नोकरदार वर्ग  मात्र भिक मागूही शकत नाही  अन् जगुही शकत नाही.एकीकडे बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल भावाने विकताना किंवा रस्त्यावर फेकून देताना त्याने कष्टाने कमविलेल्या मालासाठी  आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगली जातात.बिचाऱ्या भूमिपुत्रांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. त्यावेळी प्रसार माध्यमे मात्र महत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून विषय वेगवेगळ्या प्रकारे हाताळताना दिसतात.
भूमीपुत्रांनो हरितक्रांतीच्या देशात  बळीराजाची आजची परिस्थिती पहिली तर डोळ्यांनी बघवत नाही, तोंडातून शब्द निघत नाही.पण राजकीय पक्षांनी व प्रसार माध्यमांनी मात्र यांचा खेळ राजकीय पटलावर असा मांडला आहे की त्यात सारी प्यादे  यांच्याच हातात आहे.युवा नेतृत्व, भावी सरपंच, भावी चेअरमन, भावी मेंबर, युवा आयडाॅल, आमचे काळीज, दोस्तीच्या दुनियेतला राजा,गावच वैभव,भूषण दिलदार राजा,या ना अनेक उपाधी पायी कित्येकांनी  आपल्या पिढ्या बरबाद केल्या आहेत. मूर्खानो राजकारण्यांना फक्त तुमचा वापर करायचा आहे. ते तुमच्यासाठी कधीच नाही.प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं तर फक्त घराणेशाही दिसत आहे.मग तुम्ही काय फक्त खाण्यावारी अन्  पैशापायी स्वतःची अब्रू चव्हाट्यावर आणता.तुमच्यात स्वाभिमान असेल तर स्वतःच वलय निर्माण करा.जातीय राजकारण करून किंवा नुसत्या उड्या मारून कोणी माणूस बनत नाही.जर आपण या गोष्टींकडे वेळेवर लक्ष दिले असते तर आज बळीराजावर अशी परिस्थिती आली नसती....माय बाप सरकार वेळ मिळाला तर इकडे पण थोडे लक्ष द्या....
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात काय अवस्था झाली आहे बळीराजाची....कुठे नेऊन ठेवला आहे माझा बळीराजा....आज महाराष्ट्रात शेतमालाचे बाजारभाव मातीमोल झाले आहेत. सध्या कोणत्याही शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाहीत. शेतमाल अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे.यापासून शेतकर्यांचे व त्यांच्या मुलांचे लक्ष विचलित करून प्रसार माध्यमे वेगळाच राजकीय आखाडा रंगवण्यात दंग आहेत. हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. प्रसार माध्यमे मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत व स्वतःचा टी आर पी वाढविण्यासाठी नको त्या गोष्टींकडे समाजातील सर्वांचं लक्ष विचलित करत आहे.हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांनी समाजातील विघातक,अन्यायकारक गोष्टींवर तोडगा काढून विदारक सत्य समाजापुढे आणले पाहिजे अशी भावना जेंव्हा निर्माण होईल त्याचवेळेस खऱ्या अर्थाने समाज सुरक्षित होईल व प्रसार माध्यमे लोकशाहीचा आधार बनतील असे  मला प्रामाणिक पणे वाटते.सर्वाना मनापासून एकच विनंती आहे कि या लेखनाच्या माध्यमातून माझ्या बळीराजाला पुन्हा सोन्याचे दिवस येवो व हा माझा महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होऊन या मातीला योग्य न्याय मिळावा व माझा भूमिपुत्र पुन्हा ताठमानेने उभा राहो. हि सदिच्छा.
*जय जवान! जय किसन*
-------------------------------------------------------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  - नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke #sadak
e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke



चेहरा

 

माणसाचा चेहरा पाहता

नाही इथे कसला भरवसा,

त्याला पाहताना

हसतो पहा आरसा.

 

फसतात सारे इथे

रंग पाहून माणसाचे,

ना खरे ना खोटे

कळे अंतरंग चेहऱ्याचे.

 

जीवनाचा आज इथे

खरा तमाशा झाला,

पण राजू तुला माणसातला

माणूस नाही कळला.

 

राजेंद्रकुमार शेळके.

                               नारायणगाव,पुणे.

©Rajendrakumar Shelke
  चेहरा

चेहरा #Poetry

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

loader
Home
Explore
Events
Notification
Profile